एक्स्प्लोर

इतिहासावर किती दिवस बोलणार ? : आदित्य ठाकरे

स्वातंत्र्यवीर सावरकरांना भारतरत्न देणे हे भाजपच्या हातात आहे. इतिहासावरच किती दिवस बोलत बसायचं? असा टोलाही आदित्य ठाकरे यांनी संजय राऊत यांना लगावला आहे.

मुंबई : स्वातंत्र्यवीर सावरकरांना भारतरत्न देण्यास विरोध करणाऱ्यांना अंदमानमध्ये सावरकरांनी शिक्षा भोगलेल्या ठिकाणी दोन दिवस पाठवायला हवं, असं मोठं वक्तव्य संजय राऊत यांनी केलं आहे. यावर आदित्य ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. स्वातंत्र्यवीर सावरकरांना भारतरत्न देणे हे भाजपच्या हातात आहे. इतिहासावरच किती दिवस बोलत बसायचं? असा टोलाही आदित्य ठाकरे यांनी संजय राऊत यांना लगावला आहे. आदित्य ठाकरे म्हणाले, दोन वेगळ्या विचारधारा एकत्र येऊन काम करतात यालाच लोकशाही म्हणतात. भारतरत्नं कोणाला द्यायचं हे भाजपच्या हातात आहे त्यांनी द्यावं. मात्र, इतिहासावर किती दिवस बोलणार आहे. शिवसेना आणि काँग्रेस राज्याचा विकास करण्यासाठी एकत्र आली आहे. दरम्यान, आजची अर्थव्यवस्था आणि जीडीपी पाहून ज्यांनी या देशाला स्वातंत्र्य दिले त्यांना अभिमान वाटेल की त्यांना लाज वाटेल हा विचार करणेचे गरजेचे आहे. सध्या इतिहासाकडून प्रेरणा घेणे गरजेच आहे. देशातील समस्या सोडविण्यासाठी सर्वांनी एकत्र येऊन काम केले पाहिजे. Aditya Thackeray | किती दिवस इतिहासात रमणार? आदित्य ठाकरे यांचा सवाल | ABP Majha मुंबईत येत्या 26 जानेवारीपासून प्रायोगिक तत्वावर मुंबईत रात्रजीवन (नाईट लाईफ) सुरु करण्याचा निर्णय आदित्य ठाकरेंनी घेतला आहे. या निर्णयावर प्रतिक्रया देताना आदित्य ठाकरे म्हणाले, मुंबई नाईट लाईफविषयी माहिती न घेता विरोधक बोलत आहेत. आपण जे सुरु करतोय ते नाईट लाईफ नाही, मुंबई 24 तास ही त्यामागची कल्पना आहे. याला नाईट लाईफ किंवा मुंबई 24 तास असे देखील म्हणता येईल. लंडनची नाईटटाईम इकॉनॉमी 5 बिलीयन पाऊंडस् आहे. हॉटेल्स, मॉल खुले राहिले तर बेस्ट, ओला, उबर, टॅक्सी सुरु राहतील. मुंबईत रोजगांर वाढवण्याच्या दृष्टीने 'मुंबई 24 तास' सुरु ठेवणं ही संकल्पना आहे. मॉल, मिल कपाऊंड परिसरात कुठेही रहिवासी परिसर नाही. त्यामुळे, नाईट लाईफचा स्थानिक नागरिकांना याचा त्रास होणार नाही संबंधित बातम्या : भाजपमध्ये आलेल्या नेत्यांमुळं पक्षाला फायदाच झाला, चंद्रकांत पाटील यांचं घूमजाव सावरकरांना भारतरत्न देण्यास विरोध करणाऱ्यांना अंदमानात पाठवा; राऊतांच्या वक्तव्यानं शिवसेना अडचणीत?

महत्त्वाच्या बातम्या

ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 2 ऑगस्ट 2026 | रविवार
ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 2 ऑगस्ट 2026 | रविवार
Abhijeet Dipke: अभिजित दिपकेंच्या वडिलांच्या संपत्तीच्या चौकशीची मागणी करणारे गुजराती अमित तिवारी आहे तरी कोण?
अभिजित दिपकेंच्या वडिलांच्या संपत्तीच्या चौकशीची मागणी करणारे गुजराती अमित तिवारी आहे तरी कोण?
Abhijit Dipke : संजय शिरसाट अन् बच्चू कडू अभिजीत दिपकेंना भेटल्यानंतर महायुतीत नाराजी; रोहित पवार म्हणाले, 'कितीही प्रयत्न केला तरी...'
संजय शिरसाट अन् बच्चू कडू अभिजीत दिपकेंना भेटल्यानंतर महायुतीत नाराजी; रोहित पवार म्हणाले, 'कितीही प्रयत्न केला तरी...'
Tukaram Mundhe : थेट हॉटेलचा परवाना निलंबित का करता? त्यांना नोटीस का देत नाही? तुकाराम मुंढेंनी कायदाच स्पष्ट केला
थेट हॉटेलचा परवाना निलंबित का करता? त्यांना नोटीस का देत नाही? तुकाराम मुंढेंनी कायदाच स्पष्ट केला

व्हिडीओ

Dhananjay Munde On Gym : सर्वच क्षेत्रातलं वजन कमी झालंय, मी जिम करतोय
Tukaram Mundhe at Majha Katta | तुकाराम मुंढे कसे घडले?, डॅशिंग अधिकाऱ्याचा बेधडक कट्टा
Nitesh Rane on Sanjay Raut : संजय राऊत 420, अमित शाहांवर टीका करण्याची त्याची लायकी नाही
Chandrapur Flood : पुराच्या वेढ्यात चंद्र'पूर', वर्धा नदीच्या पाणीपातळीत मोठी वाढ | Special Report
Amit Thackeray : समोर उत्साह...आणि अमित ठाकरे भाषणच विसरले, का होतेय चर्चा? | Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Abhijeet Dipke: अभिजित दिपकेंच्या वडिलांच्या संपत्तीच्या चौकशीची मागणी करणारे गुजराती अमित तिवारी आहे तरी कोण?
अभिजित दिपकेंच्या वडिलांच्या संपत्तीच्या चौकशीची मागणी करणारे गुजराती अमित तिवारी आहे तरी कोण?
केरळ आणि कर्नाटकमध्ये पावसाचे थैमान, भूस्खलनामुळे 11 जणांचा जीव गेला, 8 बेपत्ता; किश्तवारमध्ये ढगफुटीमुळे अनेक घरांमध्ये पाणी शिरले, बद्रीनाथ महामार्ग तब्बल 20 मीटर खचला
केरळ आणि कर्नाटकमध्ये पावसाचे थैमान, भूस्खलनामुळे 11 जणांचा जीव गेला, 8 बेपत्ता; किश्तवारमध्ये ढगफुटीमुळे अनेक घरांमध्ये पाणी शिरले, बद्रीनाथ महामार्ग तब्बल 20 मीटर खचला
Bankipur by-election: बिहार पोटनिवडणुकीचा धडकी भरवणारा एक्झिट पोल, भाजपला विद्यार्थी आंदोलनाचा पहिला फटका बसणार, प्रशांत किशोर इतिहास घडवणार?
बिहार पोटनिवडणुकीचा धडकी भरवणारा एक्झिट पोल, भाजपला विद्यार्थी आंदोलनाचा पहिला फटका बसणार, प्रशांत किशोर इतिहास घडवणार?
Devendra Fadnavis: तज्ज्ञांच्या मते किमान 70 टक्के रोजगाराचे स्वरूप येणाऱ्या दिवसात AI मुळे बदलेल; रोजगार जाणार नाही, पण...; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नेमकं काय म्हणाले?
तज्ज्ञांच्या मते किमान 70 टक्के रोजगाराचे स्वरूप येणाऱ्या दिवसात AI मुळे बदलेल; रोजगार जाणार नाही, पण...; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नेमकं काय म्हणाले?
Team India Sri Lanka Tour: टीम इंडियाचे गुरुजी 'गंभीर' पेचात अडकले! 'श्रीलंकेत करो वा मरो'ची स्थिती, गिलसाठी सुद्धा वाट खडतर
टीम इंडियाचे गुरुजी 'गंभीर' पेचात अडकले! 'श्रीलंकेत करो वा मरो'ची स्थिती, गिलसाठी सुद्धा वाट खडतर
Khadakwasla Dam : पुणेकरांना दिलासा! खडकवासला अन् वरसगाव धरणं फुल भरली; मुठा नदीत विसर्ग सुरू
पुणेकरांना दिलासा! खडकवासला अन् वरसगाव धरणं फुल भरली; मुठा नदीत विसर्ग सुरू
NEET PG 2026: परीक्षा एकाच सत्रात, प्रत्येक प्रश्नासाठी अतिरिक्त वेळ, घराजवळ केंद्र निवडण्याची मुभा; NEET PG 2026 परीक्षेसाठी नियमांमध्ये मोठा बदल
परीक्षा एकाच सत्रात, प्रत्येक प्रश्नासाठी अतिरिक्त वेळ, घराजवळ केंद्र निवडण्याची मुभा; NEET PG 2026 परीक्षेसाठी नियमांमध्ये मोठा बदल
Guhagar Kasturi Cat rare: गुहागरच्या शाळेत जंगलातील दुर्मिळ कस्तुरी मांजर शिरलं, सगळेच अवाक झाले
गुहागरच्या शाळेत जंगलातील दुर्मिळ कस्तुरी मांजर शिरलं, सगळेच अवाक झाले
Embed widget