Baramati Lok Sabha : इंदापूरचे आमदार दत्तात्रय भरणे (Dattatray Bharne) यांचा शिवीगाळ केलेला व्हिडीओ कर्जत जामखेडचे आमदार रोहित पवार यांनी ट्विट केला आहे. यावरून सध्या राज्याचे वातावरण तापले असून शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर हल्लाबोल केला आहे. 


महाराष्ट्रातील 11 मतदारसंघात आज मतदान प्रक्रिया सुरू आहे. बारामतीत होत असलेल्या  मतदानाच्या पार्श्वभूमीवर भरणेंचा त्यांच्या कार्यकर्त्यांसोबत वाद झाला. तुम्हाला माझ्याशिवाय कुणीही नाही. तो बारामती अॅग्रोचा (Baramati Agro) कुणीही येणार नाही, असे दत्तात्रय भरणे म्हणत असल्याचे व्हिडिओत दिसून येत आहे. दत्तात्रय भरणे हे उपमुख्यमंत्री अजित पवारांसोबत असून बारामती लोकसभा मतदारसंघात ते सुनेत्रा पवांरासाठी प्रचार करत आहेत. 


फडणवीस तुम्ही टुकार आणि नेभळट गृहमंत्री आहात - संजय राऊत


यावरून संजय राऊत यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर हल्लाबोल केला आहे. संजय राऊत (Sanjay Raut) यांनी एक्स या माध्यमावर  पोस्ट करत म्हटले आहे की, ही दादागिरी कोणाच्या जीवावर सूरू आहे? मतदान केंद्रावर धमक्या देणे, शिव्या देणे. गावात कसा राहतो ते बघून घेतो ही भाषा कोणाच्या जीवावर सुरु आहे? फडणवीस तुम्ही टुकार आणि नेभळट गृहमंत्री आहात.  महाराष्ट्राची तुम्ही वाट लावलीत. मराठी माणूस तुम्हाला माफ करणार नाही हे लक्षात ठेवा, असे संजय राऊत यांनी म्हटले आहे.  


काय म्हणाले रोहित पवार? 


दत्तात्रय भरणे (Dattatray Bharne) यांचा व्हिडिओ शेअर करत रोहित पवारांनी एक्स माध्यमावर म्हटले आहे की, "केवळ दडपशाहीपुढं न झुकता स्वाभिमानाने बुथवर काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना अजितदादा मित्र मंडळाचे सदस्य, माजी मंत्री आणि इंदापूरचे आमदार हे कशा अर्वाच्च भाषेत शिवीगाळ करतात आणि धमकी देतात ते या व्हिडीओत बघा. विशेष म्हणजे, ज्यांच्याशी ते असं वागतात ही त्यांचीच भावकी आणि बारा बलुतेदारांपैकी एक आहे. ही चिडचिड खूप काही सांगून जाते. पण आजच्या लढाईत स्वाभिमानी कार्यकर्ता आणि मतदार कोणत्याही धमक्यांना आणि दपडशाहीला भीक घालणार नाही, असे टीका रोहित पवारांनी केली आहे. 


इतर महत्वाच्या बातम्या 


"माझ्याशिवाय कोणीच नाही, बारामती अॅग्रोचं कुणी येणार नाही"; आमदार दत्तात्रय भरणेंचा शिवीगाळचा VIDEO रोहित पवारांकडून ट्वीट


दत्ता मामांनी शिवीगाळ केली, भेटीला आलेल्या सुप्रियांना आपबिती सांगताना नाना गवळी ढसाढसा रडले