Sanjay Raut : सचिन वाझेला पुन्हा मुंबई पोलीस दलात नियुक्त करण्यासाठी मुख्यमंत्र्यांचा दबाव होता असा जबाब माजी मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी ईडीला दिला आहे. त्याला आता शिवसेना खासदास संजय राऊत यांनी प्रतिक्रीया दिली आहे. परमबीर सिंहावर खंडणीपासून अपहरणापर्यंत अनेक गुन्हे दाखल आहेत. आरोपी आपल्या बचावासाठी अशी नावे घेत असतो असा टोला संजय राऊत यांनी लगावला आहे.
संजय राऊत यांनी आज माध्यमांसोबत संवाद साधला. यावेळी त्यांनी अनेक मुद्द्यांवर आपले मत मांडले. संजय राऊत म्हणाले, परमबीर सिंह मुख्यमंत्र्यांचे नाव घेत असतील तर घेऊ द्या. त्याचा काही उपयोग होणार नाही. कारण आरोपी आपल्या बचावासाठी अशी नावे घेत असतो. याबरोबरच विरोधी पक्षांनी याचं कितीही भांडवल केलं तरी त्याचाही काही उपयोग होणार नाही, असा टोला संजय राऊत यांनी यावेळी लगावला.
सचिन वाझेला पुन्हा मुंबई पोलीस दलात नियुक्त करण्यासाठी दबाव होता असा जबाब परमबीर सिंह यांनी काल ईडीला दिला आहे. यासाठी तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांचा दबाव होता. शिवाय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी स्पष्ट सूचना दिली होती असा जबाब परमबीर सिंह यांनी ईडीला दिला आहे. त्याशिवाय बदल्यांची यादी परिवहन मंत्री अनिल परब स्वत: घेऊन येत असल्याचेही परमबीर सिंह यांनी म्हटले होते. ईडीने दाखल केलेल्या आरोपपत्रात ही माहिती समोर आली आहे.
दरम्यान, काल संजय राऊत यांचे निकटवर्तीय प्रवीण राऊत यांना ईडीनं अटक केली आहे. एचडीआयएलमधील 1 हजार 34 कोटी रुपयांच्या पत्रा चाळ जमीन घोटाळ्यात सहभाग असल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. या प्रकरणात त्यांना 9 फेब्रुवारीपर्यंत ईडी कोठडी सुनावण्यात आलीय. यावर बोलताना संजय राऊत म्हणाले, "राजकीय विरोधकांच्या नातेवाईकांवर कारवाया होत असतात. आम्ही 2024 पर्यंत त्या सहन करून घेऊ. ही कारवाई राजकीय सुडबुद्धीने करण्यात आली आहे.
भाजप आमदार नितेश राणे यांच्यासंदर्भात बोलताना संजय राऊत म्हणाले, राज्यात कायद्याचं राज्य आहे. कायदा सर्वांना समान आहे. जर त्यांना अन्याय झालाय असं वाटत असेल तर त्यांनी न्यायालयात जावे." संजय राऊत यांनी यावेळी काल कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांच्या संसदेतील भाषणाचं कौतुक केलं. पंतप्रधानांनी त्यांचं भाषण एकायला पाहिजे होतं. विरोधकांचं भाषण एकण्याची आपल्याकडे परंपरा आहे"
मत्वाच्या बातम्या
Anil Deshmukh : ...म्हणून गृहमंत्रीपदाचा राजीनामा दिला, ईडीच्या आरोपपत्रात अनिल देशमुखांचा जबाब
शिवसेना नेते संजय राऊत यांचे निकटवर्तीय प्रवीण राऊत यांना 9 फेब्रुवारीपर्यंत ईडी कोठडी