1. मुंबई महापालिकेचा अर्थसंकल्प आज ऑनलाईन सादर होणार, निवडणुकीनिमित्त नवी करवाढ किंवा शुल्कवाढ न करण्याकडे सत्ताधारी शिवसेनेचा कल
मुंबई महापालिकेचं बजेट आज ऑनलाईन सादर होणार आहे. त्यामुळं आगामी महापालिका निवडणुकीच्या निमित्तानं आपल्याला काय गिफ्ट मिळणार याकडे मुंबईकरांचं लक्ष लागलं आहे. मुंबई महापालिकेची आगामी निवडणूक लक्षात घेऊन कोणतीही नवी करवाढ किंवा शुल्कवाढ न करण्याकडे सत्ताधारी शिवसेनेचा कल असणार आहे. तसंच मुंबईकर मतदारांना खूश करण्यासाठी मोठ्या प्रकल्पांचीही घोषणा होणार असल्याचं समजतं. खड्डेमुक्त रस्ते, सक्षम आरोग्य यंत्रणा, पूरमुक्त मुंबई यासाठी यंदाच्या अर्थसंकल्प तरतूद केली जाणार असल्याचं कळतंय.
निवडणुकीच्या तोंडावर आज आशियातील सर्वात मोठ्या आणि श्रीमंत महापालिकेचा अर्थसंकल्प सादर होणार आहे. कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर आजही मुंबई महापालिकेचे ऑनलाईन बजेट सादर होणार आहे. यंदाच्या वर्षात महापालिकेच्या अर्थसंकल्पात 3 हजार कोटींपर्यंतची वाढ होण्याची शक्यता आहे.
2. पोलिसांच्या बदल्यांसाठी अनिल परब यादी पाठवायचे, ईडीसमोर अनिल देशमुखांचा जबाब, तर सचिन वाझेंच्या पुनर्नियुक्तीसाठी मुख्यमंत्र्यांसह तीन मंत्र्यांचा दबाव, परमबीर सिंहांचा ईडीला जबाब
3. संतोष परब हल्लाप्रकरणी नितेश राणे यांना दोन दिवसांची पोलीस कोठडी, काल रात्रीचा मुक्काम सावंतवाडी पोलीस ठाण्यात
4. मनमाडच्या शेंडी डोंगरावर ट्रेकिंग करताना खोल दरीत कोसळून दोन गिर्यारोहकांचा मृत्यू, एक जण गंभीर जखमी
5. बंदुकीचा धाक दाखवून पाच दरोडेखोरांकडून 1 कोटींची लूट, मुलुंडमधील अंगडियाच्या कार्यालयातली घटना
पाहा व्हिडीओ : स्मार्ट बुलेटिन : 3 फेब्रुवारी 2022 : गुरुवार
6. नवी मुंबई महानगर पालिकेचा पर्यावरण पूरक निर्णय, 250 इलेक्ट्रिक बस सेवेत दाखल, वर्षाला 65 ते 70 कोटीचा खर्च वाचणार
7. चीन-पाकिस्तान आणि न्यायव्यवस्थेबाबतच्या राहुल गांधी यांच्या वक्तव्यावरुन घमासान, राहुल गांधींना तथ्य माहित नसल्याचा परराष्ट्रमंत्र्यांचा पलटवार, तर कायदा मंत्र्यांकडून माफीची मागणी
8. ज्येष्ठ अभिनेते रमेश देव यांचं निधन, आज अंत्यसंस्कार, मुख्यमंत्र्यांसह दिग्गजांकडून श्रद्धांजली
9. श्रेयस अय्यर, शिखर धवन आणि ऋतुराज गायकवाडसह टीम इंडियाच्या आठ सदस्यांना कोरोनाची लागण; भारत-विंडीज संघांमधली वन डे सामन्यांची मालिका पुढे ढकलण्याची शक्यता
10. अंडर नाईन्टीन विश्वचषकाच्या अंतिम फेरीत भारताचा दिमाखदार प्रवेश, उपांत्य फेरीत ऑस्ट्रेलियाचा 96 धावांनी धुव्वा, शतकवीर कर्णधार यश धूल विजयाचा शिल्पकार
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह | ABP Majha