Sanjay Raut : शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) आज पुणे दौऱ्यावर आहेत. यावेळी राऊत यांनी राणा दाम्पत्याच्या (Navneet Rana and Ravi Rana) जामिनावर प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी म्हटलं आहे की, 'सध्या राज्यामध्ये दिलासा घोटाळा सुरु आहे. गुन्हे किंवा आरोप केवळ आमच्यावरच सिद्ध होतात, इतरांवरील गुन्हे सिद्ध होत नाहीत.' राणा दांपत्याविरोधात राजद्रोहाचा आरोप सिद्ध होत नाही, असं महत्त्वपूर्ण निरीक्षण राणा दांपत्याला जामीन देताना मुंबई सत्र न्यायालयानं नोंदवलं यावर राऊत यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे.
यावेळी संजय राऊत यांनी शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या औरंगाबादमधील सभेवर प्रतिक्रिया दिली. त्यांनी म्हटलं आहे की, औरंगाबादच्या त्या मैदानात बाळासाहेब ठाकरे यांनी सर्वात आधी सभा घेतली. तेव्हा ही मोठी गर्दी झाली होती. मग राज ठाकरे अथवा अन्य नेत्यांनी घेतल्या, आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सभा घेणार आहेत. याचा अर्थ मनसे जिथे सभा घेतेय तिथे शिवसेना सभा घेतेय असा अर्थ लाऊ नका, असं राऊतांनी म्हटलं आहे.
शिवसेनेच्या औरंगाबादमधील शाखेच्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे औरंगाबादेत सभा घेणार आहेत. 8 जून रोजी उद्धव ठाकरे सभा घेणार असून राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी सभा घेतलेल्या मैदानावरच उद्धव ठाकरे यांची सभा होणार आहे. त्यामुळे राज ठाकरे सभा घेतली त्याचं मैदानावर उद्धव ठाकरे सभा घेणार आहेत, यावरून अनेक चर्चांना उधाण आलं आहे. यावर संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
राऊतांनी म्हटलं आहे की, मराठवाडा सांस्कृतिक मैदानावर याआधीही बाळासाहेब ठाकरे यांच्यासह शिवसेनेच्या अनेक दिग्गज नेत्यांनी सभा घेतल्या आहेत. त्या सभांनाही प्रचंद गर्दी जमली झालेली पाहायला मिळाली. आता तशीच सभा उद्वव ठाकरे घेणार आहेत. आरोप करणाऱ्यांचा जन्म शिवसेनेनंतर झाला. इतिहास असा आहे की, शिवसेनेनं जिथे सभा घडल्या तिथे इतिहास घडला, असंही राऊत यांनी यावेळी सांगितलं आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :