Wardha Leopard News : शिकारीच्या प्रयत्नात असलेल्या बिबट्याचा शॉक लागून मृत्यू झाल्याची घटना घडली. शिकारच्या प्रयत्नात असलेल्या बिबट्याने विद्युत रोहित्रावर झेप घेतली, यावेळी त्याला विद्युत प्रवाहाचा धक्का बसला, त्यामध्ये बिबट्याचा मृत्यू झाला आहे. सेलू वर्धा जिल्ह्यातील सेलू तालुक्यातील जयपूर इथे ही घटना घडली आहे. 


सकाळी परिसरातील शेतकऱ्यांना ही घटना दिसली. यावेळी शेतकऱ्यांनी मृत अवस्थेत असलेल्या बिबट्याला बघण्यासाठी गर्दी केली होती. जयपूरमध्ये रात्रीच्या सुमारास शिकारीच्या शोधात बिबट्याने विद्युत रोहित्रवर झेप मारली. प्राण्याची शिकार करण्याच्या प्रयत्नात विजेचा धक्क्याने बिबट्या जागीच ठार झाला. 




जयपूरमध्ये नदीकाठी शेतकऱ्यांना शेतीसाठी वीज पुरवठा करणारे रोहित्र बसवले आहे. त्या परिसरात माकड आणि इतर प्राण्यांचा वावर आहे. गुरुवारी सकाळी शेतकरी रोहीत्राजवळ वीज पुरवठा खंडित झाल्याने गेले असता त्यांना डिपीवर बिबट्या मृतावस्थेत आढळून आला. त्यानंतर शेतकऱ्यांनी या घटनेची माहिती वनविभागाला आणि पोलिसांनी दिली. त्यानंतर घटनास्थळी वनविभागाचे अधिकारी, कर्मचारी व पोलीस दाखल झाले. त्यानंतर पंचनामा करण्यात आला. सहाय्यक वनसंरक्षक गजानन बोबडे, वनपरिक्षेत्र अधिकारी अक्षय आगासे, मानद जिवरक्षक कौशल मिश्रा, डॉ. मीना काळे, डॉ. शिल्पा मून, डॉ. भिसेकर, आणि सेलू पोलीस स्टेशनचे पोलीस यांच्या उपस्थितीत पंचनामा करुन मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठवण्यात आला.




तालुक्यात अनेक ठिकाणी बिबट्यांचा वावर वाढला असून या ठिकाणचे शेतकरी धास्तावले आहेत. दरम्यान, बांधकामे करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर जंगलतोड केली जात आहे. कधीकाळी निसर्गाचाच घटक असलेला मानव मोठ्या प्रमाणावर जंगलाची तोड करत असल्याचे दिसत आहे. झपाट्यानं कमी होत चाललेलं जंगल क्षेत्र आणि त्यातली असंतुलित झालेली जैवविविधता या कारणांमुळे अलिकडच्या काळात मानवी वस्तीतील बिबट्यांचा शिरकाव आणि हल्लेही वाढले आहेत. राज्यातील जवळपास सर्वच भागांत बिबट्या आणि मानव संघर्ष सुरु असल्याचे दिसत आहे. 


महत्त्वाच्या बातम्या: