एक्स्प्लोर
सांगलीत 11 आजी-माजी नगरसेवकांचा भाजपात प्रवेश
भाजपात प्रवेश केलेल्यांमध्ये 7 विद्यमान नगरसेवक तर 2 माजी नगरसेवकांचा समावेश आहे.

सांगली: सांगली महापालिकेतील 11 आजी - माजी नगरसेवकांनी आज भाजपात प्रवेश केला. भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्या मुंबईतील शासकीय निवासस्थानी मंत्री चंद्रकांत पाटील, सुभाष देशमुख, सांगलीचे खासदार संजय पाटील, जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुख यांच्या उपस्थितीत हा प्रवेश झाला. या 11 जणांच्या भाजपा प्रवेशामुळे सांगलीमध्ये काँग्रेसला मोठं भगदाड पडले आहे. मात्र राष्ट्रवादीच्या प्रदेशाध्याक्षपदी जयंत पाटील यांची निवड झाल्याने काहीअंशी राष्ट्रवादीतील नगरसेवकांची गळती थांबलेली दिसत आहे. भाजपात प्रवेश केलेल्यांमध्ये 7 विद्यमान नगरसेवक तर 2 माजी नगरसेवकांचा समावेश आहे. मागील अनेक महिन्यांपासून या नगरसेवकांच्या पक्षप्रवेशचा विषय चर्चेत होता. सांगलीत होणाऱ्या भाजपच्या प्रदेश कार्यकारिणीच्या बैठकीत हा पक्ष प्रवेश होणार होता. मात्र कृषीमंत्री पांडुरंग फुंडकर यांच्या निधनाने ही बैठकच रद्द झाल्याने, मुंबईत हा पक्षप्रवेशाचा कार्यक्रम पार पडला.
Before You Go
Bajrang Sonawane On PM Modi Meet : पंतप्रधान मोदींची भेट कशासाठी? खासदार बजरंग सोनवणेंचा खुलासा
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
महाराष्ट्र
महाराष्ट्र
महाराष्ट्र

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion




















