(Source: ECI/ABP News/ABP Majha)
एक तरुण आणि दोन तरुणी, तिघांची एकत्र आत्महत्या, मृतदेहाजवळ चॉकलेट, फुलं आणि हार, तासगाव हादरलं!
Crime News : एक तरुण आणि दोन तरुणींनी विष प्राशन करुन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटन सांगलीतील तासगावमध्ये घडली आहे. प्रेमाच्या त्रिकोणातून आत्महत्य की घातपात? याबाबत परिसरात चर्चेला उधाण आलं आहे.
Sangli Crime News : एक तरुण आणि दोन तरुणींनी विष प्राशन करुन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटन सांगलीतील तासगावमध्ये घडली आहे. प्रेमाच्या त्रिकोणातून आत्महत्य की घातपात? याबाबत परिसरात चर्चेला उधाण आलं आहे. तासगाव तालुक्यातील मणेराजुरी मधील डोंगरावरची येथेही मन सुन्न करणारी घटना घडली आहे.
तासगाव तालुक्यातील मणेराजुरीतील एका डोंगरावर दोन तरुणी आणि एका तरुणाने विषारी द्रव्य पिऊन आत्महत्या केल्याचा प्रकार गुरुवारी सकाळी उघडकीस आला. धक्कादायक बाब म्हणजे, या तिघांच्या मृतदेहाजवळ चॉकलेट्स, पुष्पगुच्छ आणि हार सापडले आहेत. घटनास्थळी द्राक्ष बागेसाठी लागणारी विषारी द्रव्य असणारी बाटली सापडली आहे. त्यामुळे ही आत्महत्या आहे की या तिघांचा घातपात झालाय याचा संशय आहे. या घटनेचा पोलीस तपास करत आहेत. या घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. मृतदेहाशेजारी विषारी द्रव्य असलेली बाटली सापडल्याने ह्या आत्महत्या असाव्यात असा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे.
हरीश हणमंत जमदाडे 24 रा मनेराजुरी, प्रणाली उद्धव पाटील 19 रा मनेराजुरी, शिवानी चंद्रकांत घाडगे रा हतीत ता सांगोला असे आत्महत्या केलेल्या तरुण तरुणीची नावे आहेत. घटनास्थळी डोरमिक्स नावाची द्राक्षबागेवर फवारण्याचे विषारी द्रव्याची बाटली सापडल्याने ह्या आत्महत्या असाव्यात असा पोलिसांचा अंदाज आहे. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन उत्तरीय तपासणीसाठी तासगाव येथील ग्रामीण रुग्णालयात पाठविले आहेत.
तिघांच्या आत्महत्येचा बातमीने तासगाव तालुक्यात एकच खळबळ उडाली.. पोलीस घटनास्थळी दाखल झाले , मृतदेह डोंगराच्या पायथ्याशी आणून उत्तरीय तपासणीसाठी तासगावला नेण्यात आले..यातील तिघेजणही मणेराजूरीमध्ये राहण्यास होते. मात्र मध्यरात्री या तिघांनी डोंगराच्या पायथ्याशी गाडी लावून डोंगरावर जाऊन आत्महत्या का केली? तिघांच्या आत्महत्या मागे प्रेमाचा त्रिकोण आहे का? का त्याचा घातपात झलाय याचा पोलीसाना संशय आहे. डोंगराकडे जाणारा रोड हा सुनसान असल्याने हे तिघेजण मध्यरात्री गाडी घेऊन डोंगराकडे केले. डोंगराच्या पायथ्याला गाडी लावली आणि डोंगरावर जाऊन या तिघांनी आत्महत्या केल्याचे चित्र घटनास्थळी दिसून येतंय. मात्र आत्महत्या मागचे कारण, मृतदेहाशेजारी चॉकलेट्स, पुष्पगुच्छ, दोन हार कशासाठी आणले गेले होते.. नात्यातून किंवा प्रेमाच्या त्रिकोणातुन किंवा लग्नाच्या वादातून ही आत्महत्या आहे, याचा पोलीस तपास करत आहेत.
मराठी लाईव्ह न्यूज सुपरफास्ट पाहा ABP Majha वर, मुंबई, पुणे, नागपूर, औरंगाबाद, मनोरंजन, क्रिकेट, देश-विदेशातील प्रत्येक बातमी सर्वात आधी एबीपी माझावर Live