एक्स्प्लोर

माणुसकीला सलाम... सांगलीत हिंदू महिलेवर मुस्लिम कार्यकर्त्यांनी केलं हिंदू पद्धतीनं अंत्यसंस्कार

कोरोनाने माणुसकीच्या भिंती तोडून टाकल्या आहेत. कोरोनाने मृत्यू झाल्यानंतर अंत्यसंस्कार कसे करायचे? हा सवाल असतोच. सांगलीच्या मदनी चॅरिटेबल ट्रस्ट आणि जमियत उलेमा ए हिंदने पुढाकार घेत हिंदू पध्दतीने एका मृत महिलेचे अंतिम संस्कार करत आपलं कर्तव्य पार पाडलं. 

सांगली :  कोरोनाच्या काळात मृत्यूमुखी पडणाऱ्या मृतदेहांचे अंतिम संस्कार पार पडणं म्हणजे एक दिव्यच झालं आहे.  मरणा अगोदर बेड मिळत नाही आणि मरणानंतर अंत्यसंस्कार करण्यात अडचण अशा विवंचनेत अनेक जण सापडलेत. कोरोना मृतांच्या नातेवाईकांना त्यांच्या कुटुंबातील सदस्य समजून सामाजिक कार्यकर्ते पुढं येत आहेत. त्यातीलच सामाजिक संघटना म्हणजे मदनी चॅरिटेबल ट्रस्ट सांगली आणि जमियत उलेमा ए हिंद.

या संघटनेच्या कार्यकर्त्यांनी कोरोनाच्या संकटात आपलं सामाजिक काम सुरूच ठेवलंय.  जिथं कोरोनाने कुठल्याही जाती धर्माची व्यक्ती मयत झाली की, दफनविधी, अंत्यसंस्कार करण्यासाठी सहसा कोण पुढं येत नाहीत. अशीच घटना नागजमध्ये घडलीय. नागजमध्ये एका आजारी असलेल्या महिला रुग्णाला मिरजमध्ये बेडसाठी फिरावे लागले.  अखेर क्रीडा संकुल मिरज इथल्या कोविड सेंटर मध्ये बेड मिळाल्यानंतर उपचार सुरू असताना तिचा शनिवारी सायंकाळी पाच वाजता मृत्यू झाला. 

नागज इथं मृतदेह नेण्याची तयारी झाली पण गावातल्या लोकांनी मृतदेह आणू नका तिकडेच अत्यसंस्कार करा असा निरोप दिला. आता अंत्यसंस्कार पार पडण्याचे दिव्य होते. मृतांच्या नातेवाईकांना मदनी ट्रस्ट आणि जमियत उलेमा ए हिंद या संघटनेच्या कार्यकर्त्यांचा संपर्क करून दिला गेला. मदनी ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष यांच्यासह कार्यकर्त्यांनी क्रीडासंकुल इथल्या कोविड सेंटर मध्ये जाऊन सदर महिलेचा मृतदेह ताब्यात घेण्याचे सोपस्कार पार पाडून हिंदू पद्धतीने मिरजेतील पंढरपूर रस्त्यावर असलेल्या स्मशान भूमीत अत्यसंस्कार केले.

आतापर्यंत कोरोनाच्या काळात दीडशेहून अधिक मृतदेहाचे दफनविधी आणि नऊ मृतदेहाचे अंत्यसंस्कार या दोन्ही संघटनेच्या वतीने कोणताही मोबदला न घेता करण्यात आले आहे. कोरोनाने जाती धर्माच्या भिंती पार मोडून काढल्या आहेत . या संघटनांनी सामाजिक ऐक्य अजूनही जिवंत असल्याचे दाखवून देत प्रत्यक्षात काम करत ऐक्य आणखी वृद्धिंगत केलं आहे. मरणाआधी आणि मरणानंतर मृतदेहाची हेळसांड होत असताना अंत्यसंस्कार आणि दफनविधी करून रमजानच्या पवित्र महिन्यात सांगलीच्या मदनी चॅरिटेबल ट्रस्ट आणि जमियत उलेमा ए हिंदने पुण्याई कमवत सामाजिक ऐक्याचे दर्शनही घडवलं आहे. 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Bhiwandi : भावाचं अपहरण केलं, बहिणीला बोलावून दोन वेळा सामूहिक बलात्कार, भिवंडीत सहा नराधमांवर गुन्हा
भावाचं अपहरण केलं, बहिणीला बोलावून दोन वेळा सामूहिक बलात्कार, भिवंडीत सहा नराधमांवर गुन्हा
कोल्हापुरात अवतरला तब्बल 25 कोटींचा 'आमदार', जगातील सर्वात उंच आणि महागडा रेडा तुम्ही पाहिला का? 
कोल्हापुरात अवतरला तब्बल 25 कोटींचा 'आमदार', जगातील सर्वात उंच आणि महागडा रेडा तुम्ही पाहिला का? 
Navneet Rana : नवनीत राणा हाज़िर हो! ओवैसी बंधूंवरील 15 सेकंदाच्या वक्तव्यावर हैदराबाद न्यायालयाची नोटीस
नवनीत राणा हाज़िर हो! ओवैसी बंधूंवरील 15 सेकंदाच्या वक्तव्यावर हैदराबाद न्यायालयाची नोटीस
Chandrapur Tiger : वाघांची शिकार करणारी बहेलिया टोळी विदर्भात सक्रिय, चार महिन्यात चीनमध्ये 15 वाघांची तस्करी
वाघांची शिकार करणारी बहेलिया टोळी विदर्भात सक्रिय, चार महिन्यात चीनमध्ये 15 वाघांची तस्करी
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Top 70 News  : टॉप 70 बातम्यांचा वेगवान आढावा : 23 Feb 2025 : ABP MajhaIND VS PAK | उद्या दुबईत भारत-पाक भिडणार, रोहितसेना पाकचं पॅकअप करणार?Auto Rickshaw Driver : दुप्पट पैसे देण्यास नकार दिल्याने रिक्षा चालकाचा संताप,4 दिवसांनी गुन्हा दाखलSpecial Report POP Ganesh Murti Issue : पीओपी बंदी, मूर्तिकारांचा विरोध, पालिकेचं नवं पत्रक

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Bhiwandi : भावाचं अपहरण केलं, बहिणीला बोलावून दोन वेळा सामूहिक बलात्कार, भिवंडीत सहा नराधमांवर गुन्हा
भावाचं अपहरण केलं, बहिणीला बोलावून दोन वेळा सामूहिक बलात्कार, भिवंडीत सहा नराधमांवर गुन्हा
कोल्हापुरात अवतरला तब्बल 25 कोटींचा 'आमदार', जगातील सर्वात उंच आणि महागडा रेडा तुम्ही पाहिला का? 
कोल्हापुरात अवतरला तब्बल 25 कोटींचा 'आमदार', जगातील सर्वात उंच आणि महागडा रेडा तुम्ही पाहिला का? 
Navneet Rana : नवनीत राणा हाज़िर हो! ओवैसी बंधूंवरील 15 सेकंदाच्या वक्तव्यावर हैदराबाद न्यायालयाची नोटीस
नवनीत राणा हाज़िर हो! ओवैसी बंधूंवरील 15 सेकंदाच्या वक्तव्यावर हैदराबाद न्यायालयाची नोटीस
Chandrapur Tiger : वाघांची शिकार करणारी बहेलिया टोळी विदर्भात सक्रिय, चार महिन्यात चीनमध्ये 15 वाघांची तस्करी
वाघांची शिकार करणारी बहेलिया टोळी विदर्भात सक्रिय, चार महिन्यात चीनमध्ये 15 वाघांची तस्करी
Video : चित्त्यापेक्षाच्या चपळाईने कांगारू हवेत झेपावला अन् कॅच पकडला; अ‍ॅलेक्स कॅरीनं घेतलेला कॅच 'इंग्रज' बघतच राहिले!
चित्त्यापेक्षाच्या चपळाईने कांगारू हवेत झेपावला अन् कॅच पकडला; अ‍ॅलेक्स कॅरीनं घेतलेला कॅच 'इंग्रज' बघतच राहिले!
उपायुक्तांच्या निवासस्थानातून रोकड आणि डायमंड चोरीला; तलावात युद्धपातळीवर शोधमोहीम, यंत्रणा लागली कामाला
उपायुक्तांच्या निवासस्थानातून रोकड आणि डायमंड चोरीला; तलावात युद्धपातळीवर शोधमोहीम, यंत्रणा लागली कामाला
अरविंद केजरीवालांच्या 'शीशमहल'ची चर्चा, पण भाजपशासित 'या' राज्यात वनसंवर्धनाच्या पैशातून आयफोन, लॅपटॉप, फ्रीज खरेदीची लयलूट; कॅगचे ताशेरे
अरविंद केजरीवालांच्या 'शीशमहल'ची चर्चा, पण भाजपशासित 'या' राज्यात वनसंवर्धनाच्या पैशातून आयफोन, लॅपटॉप, फ्रीज खरेदीची लयलूट; कॅगचे ताशेरे
Telangana SLBC Tunnel Accident : तेलंगणामध्ये निर्माणाधीन बोगद्याच्या 14 किमी आत 3 मीटर भाग कोसळला; 6 ते 8 मजूर अडकल्याची भीती
तेलंगणामध्ये निर्माणाधीन बोगद्याच्या 14 किमी आत 3 मीटर भाग कोसळला; 6 ते 8 मजूर अडकल्याची भीती
Embed widget