एक्स्प्लोर

सोलापुरात RTI कार्यकर्त्याला संपवण्यासाठी वाळू माफियांचा मास्टरप्लॅन

सोलापूर : वाळू माफिया किती मस्तवाल झाले आहे याचा प्रत्यय सोलापुरातील एका घटनेवरुन समोर आलं आहे. अवैध वाळू उपशाला विरोध करणाऱ्या माहिती अधिकार कार्यकर्त्याचा काटा काढण्यासाठी वाळू माफियांनी त्याच्या सहकारी महिलेला सुपारी दिली आहे. थोडी-थोडकी नव्हे तर तब्बल 50 लाख रोख, दहा एकर जमीन आणि दरमहा पाच लाखांचं मानधन. माहिती अधिकार कार्यकर्ते शरद कोळी गेल्या अनेक वर्षांपासून सोलापूरमधील वाळू माफियांविरोधात लढा देत आहेत. नुकत्याच झालेल्या हल्ल्यामुळे शरद कोळी यांना पोलिस संरक्षण आहे. त्यामुळे त्यांना फसवून मारण्याचा माफियांचा प्रयत्न सुरु आहे. या संपूर्ण प्रकरणाची सोलापूर ग्रामीण पोलिस चौकशी करत आहे. शरद कोळी यांना एकांतात गाठून त्यांची हत्या करण्याच्या उद्देशाने वाळू माफिया शरद कोळींच्या सहकारी मिनाक्षी टेळे यांच्या घरी पोहोचले. मुलाबाळांला जीवे मारण्याची धमकी देऊन, शरद कोळी यांना एकांतात बोलवण्याची मागणी वाळू माफियांनी मिनाक्षी टेळे यांच्याकडे केली. इतकंच नाही तर या कामाचा मोबदला म्हणून 50 लाख रुपये, 10 एकर जमीन आणि आयुष्यभर दरमहा 5 लाखांचं मानधनाचं आमिष दाखवलं. मिनाक्षी टेळे या मंद्रूपच्या शिवसेना अध्यक्ष आहेत. शरद कोळी हेदेखील शिवसेनेचे पदाधिकारी आहेत. कोळीला विश्वासात घेऊन एकांतात बोलावण्यासाठी मिनाक्षी टेळे यांना वाळू माफियांनी सुपारी देण्याचा प्रयत्न केला. त्या महिलेने याविरोधात पोलिसात तक्रार दिली आहे. स्थानिक पोलिस ठाण्याने दखल न घेतल्याने त्यांनी थेट पोलिस अधीक्षकांना निवेदन दिलं आहे. शरद कोळी दहा वर्षांपासून वाळू माफियांविरोधात लढत आहेत. कोणत्याही अमिषाला ते बळी पडत नसल्याने अखेर त्याला मारण्यासाठी माफियांनी सुपारी देण्याचा आटापिटा सुरु केला आहे. 2012 साली आणि गेल्या महिन्यात माफियांनी कोळींवर प्राणघातक हल्ला केला होता. कोळींना सध्या पोलिस संरक्षण देण्यात आलं आहे. पण पोलिस आणि महसूल प्रशासन वाळू माफियांना अभय देत असल्याचा आरोप कोळी यांनी केला आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Video: पुण्यात छात्रों की गूंज, नेहा म्हणाली, मला सगळे शिव्या देतात; राहुल गांधींनी सांगितला स्वत:चा अनुभव
Video: पुण्यात छात्रों की गूंज, नेहा म्हणाली, मला सगळे शिव्या देतात; राहुल गांधींनी सांगितला स्वत:चा अनुभव
भाजपवाला दिसला की कॉलर पकडायची अन्...; बारामतीतून संजय राऊतांचा हल्लाबोल, रामरक्षा आंदोलनात गोंधळ
भाजपवाला दिसला की कॉलर पकडायची अन्...; बारामतीतून संजय राऊतांचा हल्लाबोल, रामरक्षा आंदोलनात गोंधळ
बाजारात साखर महागली, भाव कडाडले; कृषीमंत्री दत्तात्रय भरणे म्हणाले, शेतकऱ्यांना फायदा होईल
बाजारात साखर महागली, भाव कडाडले; कृषीमंत्री दत्तात्रय भरणे म्हणाले, शेतकऱ्यांना फायदा होईल
देशात सर्वाधिक साखर उत्पादन करणारी राज्य कोणती? महाराष्ट्राचा कितवा नंबर? जाणून घ्या संपूर्ण यादी 
देशात सर्वाधिक साखर उत्पादन करणारी राज्य कोणती? महाराष्ट्राचा कितवा नंबर? जाणून घ्या संपूर्ण यादी 

व्हिडीओ

Chhatrapati Sambhajinagar News: मुलगा आणि वडिलांमध्ये नेमका वाद काय होता, तपासातून कारण काय समोर आलं?; DCP नवले यांनी A टू Z सांगितलं!
Rahul Gandhi Pune : राहुल गांधींच्या कार्यक्रमासाठी जोरदार तयारी, बाराशे पोलिस तैनात
Mahabaleshwar Tourist News: धुक्यात हरवलं महाबळेश्वर; सह्याद्रीच्या हिरवाईने पर्यटकांना घातली भुरळ
Abhijeet Dipke On School : शाळेत धडक, नियम किती कडक? | Special Report ABP Majha
Prithviraj Chavan On NCP : पृथ्वीराज चव्हाणांचा दावा, तापली राजकीय हवा | Special Report ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Bhuleshwarcha Raja : मुंबईतील भुलेश्वरच्या राजाच्या आगमन मिरवणुकीत अपघात,आगमन मिरवणुकीत घडला प्रकार, तीन जण जखमी
मुंबईतील भुलेश्वरच्या राजाच्या आगमन मिरवणुकीत दुर्घटना, अपघातात तीन जण जखमी
बाजारात साखर महागली, भाव कडाडले; कृषीमंत्री दत्तात्रय भरणे म्हणाले, शेतकऱ्यांना फायदा होईल
बाजारात साखर महागली, भाव कडाडले; कृषीमंत्री दत्तात्रय भरणे म्हणाले, शेतकऱ्यांना फायदा होईल
Video: पुण्यात छात्रों की गूंज, नेहा म्हणाली, मला सगळे शिव्या देतात; राहुल गांधींनी सांगितला स्वत:चा अनुभव
Video: पुण्यात छात्रों की गूंज, नेहा म्हणाली, मला सगळे शिव्या देतात; राहुल गांधींनी सांगितला स्वत:चा अनुभव
Rahul Gandhi: ही गोष्ट निशाची नाही, सर्व आदिवासी विद्यार्थ्यांची, संपूर्ण देशाची महाराष्ट्राची, राहुल गांधींसमोर विद्यार्थिनीनं अडचणींचा पाढा वाचला 
आदिवासी विकास विभागाचे मंत्री म्हणतात आय एम सॉरी, निशानं राहुल गांधींसमोर धडाधड समस्या मांडल्या
ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 ऑगस्ट 2026 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 ऑगस्ट 2026 | शनिवार
मुंबईतून संभाजीनगरला आलो, पण ती डिफेंडर माझी नाही; बंडू जाधव म्हणाले, माझं कुणाला बघवणा झालंय
मुंबईतून संभाजीनगरला आलो, पण ती डिफेंडर माझी नाही; बंडू जाधव म्हणाले, माझं कुणाला बघवणा झालंय
भाजपवाला दिसला की कॉलर पकडायची अन्...; बारामतीतून संजय राऊतांचा हल्लाबोल, रामरक्षा आंदोलनात गोंधळ
भाजपवाला दिसला की कॉलर पकडायची अन्...; बारामतीतून संजय राऊतांचा हल्लाबोल, रामरक्षा आंदोलनात गोंधळ
पाकिस्तानाने पाकव्याप्त काश्मीरात रिपोर्टिंग करणाऱ्या पत्रकाराला थेट दहशतवादी यादीत टाकलं! कोणत्याही खटल्याशिवाय कारवाई, बँक खाती सील अन् प्रवासावर सुद्धा बंदी
पाकिस्तानाने पाकव्याप्त काश्मीरात रिपोर्टिंग करणाऱ्या पत्रकाराला थेट दहशतवादी यादीत टाकलं! कोणत्याही खटल्याशिवाय कारवाई, बँक खाती सील अन् प्रवासावर सुद्धा बंदी
Embed widget