मुंबई : काही दिवसांपासून समीर वानखेडे (Sameer Wankhede) हे नाव खूप चर्चेत आहे. खासकरुन मुंबईमधील क्रूझ ड्रग्ज प्रकरणानंतर समीर वानखेडे यांचं नाव प्रकाशझोतात आले. मात्र आता आर्यन खान ड्रग्ज प्रकरणाचा तपास समीर वानखेडेंकडून काढण्यात आला आहे. विविध आरोपांनंतर वानखेडेंकडून हा तपास काढण्यात आला आहे.
आर्यन खानसह सहा प्रकरणांचा तपास आता दिल्ली एनसीबी करणार आहे. यामध्ये नवाब मलिक यांचे जावई समीर खान यांच्या प्रकरणाचाही समावेश आहे. अरमान कोहली, इक्बाल कासकर, काश्मीर ड्रग्ज प्रकरणाचा तपासही वानखेडे यांच्याकडून काढून घेण्यात आला आहे. दरम्यान मुंबई एनसीबीच्या विभागीय संचालकपदाची जबाबदारी समीर वानखेडे यांच्याकडे कायम राहणार आहे. मंत्री नवाब मलिक यांनी एनसीबी आणि समीर वानखेडे यांच्यावर गंभीर आरोप केले होते.
Sameer Wankhede समीर वानखेडेंकडून तपास काढला; नवाब मलिक म्हणतात, ही तर सुरुवात...
समीर वानखडे हे मुंबई एनसीबीचे झोनल डायरेक्टर या पदावर होते आणि त्या पदावरच ते राहणार आहेत. मात्र ते आता रिपोर्टिंग दिल्ली एनसीबीच्या अधिकाऱ्यांना करणार आहेत. या सहा प्रकरणाचा तपास दिल्ली एनसीबीचे अधिकारी संजय सिंग यांच्या नेतृत्वाखाली केला जाणार आहे. या सहा प्रकरणा व्यतिरिक्त आधीच्या प्रकरणांचा तपास समीर वानखेडे यांच्याकडेच असणार आहे. मात्र नवीन एखादी कारवाई करण्यासाठी आता त्यांना दिल्ली एनसीबीच्या अधिकाऱ्यांना कळवावे लागणार असून त्यांची परवानगी लागणार आहे.
तर आपल्याला या केसमधून हटवलं गेलं नसून आपणच याचा तपास दिल्ली एनसीबीच्या एसआयटीकडे देण्यात यावा असं रीट पीटिशन दाखल केली होती असं समीर वानखेडे यांनी सांगितलं आहे.
Nawab Malik vs Sameer Wankhede : नवाब मलिकांच्या आरोपांना समीर वानखेडेंचं प्रत्युत्तर
कोण आहेत समीर वानखेडे?
सप्टेंबर 2020 मध्ये त्यांची महसूल गुप्तचर संचालनालयातून एनसीबीवर बदली झाली. अमली पदार्थांशी निगडीत प्रकरणांचे तज्ज्ञ म्हणून त्यांची खास ओळख आहे. आता शाहरुख खानच्या मुलाची चौकशी समीर वानखेडे करत आहेत. सध्या त्यांनी सुरु केलेल्या कारवायाच्या धडाक्यामुळं समीर वानखेडे हे ट्रेंडिंगमध्ये आहेत.
Nawab Malik on Sameer Wankhede : शर्ट 70 हजारांचा तर बूट 2 लाखांचे; समीर वानखेडेंच्या लाईफस्टाईलवर नवाब मलिकांचा निशाणा
समीर वानखेडे यांच्या नेतृत्वात गेल्या दोन वर्षांत त्यांच्या नेतृत्वात एनसीबीने कोट्यवधींच्या ड्रग्स रॅकेटचा पर्दाफाश करण्यात आला आहे. 2004 मधील बॅचचे आयआरएस अधिकारी असलेले समीर वानखेडे हे मूळचे महाराष्ट्रातील. ते आधी मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर महसूल उपायुक्त होते. त्यानंतर त्यांनी बदली आंध्र प्रदेश आणि दिल्लीत देखील काम केलं. आतापर्यंत त्यांनी दोन हजारहून अधिक लोकांविरुद्ध अमली पदार्थविरोधी गुन्हे दाखल केले आहेत. तर जवळपास 17 हजार कोटींहून अधिक रुपयांचं ड्रग्ज जप्त केलं आहे.
बॉलिवूडमध्ये समीर वानखेडे या नावाची वेगळी दहशत आहे. समीर वानखेडे यांनी गायक मिका सिंहला मुंबई एअरपोर्टवर परदेशी करंसीसह पकडलं होतं. त्यांच्या नेतृत्वात त्यांच्या टीमनं अनुराग कश्यप, विवेक ओबेरॉय, राम गोपाल वर्मासह अनेक सेलिब्रिटींच्या घरी छापे मारले आहेत.
बईमध्ये ड्रग्सचा नायनाट करणारे नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोचे अधिकारी समीर वानखेडे यांचा केंद्रीय गृह विभागाकडून विशेष पदक देऊन सन्मान करण्यात आला आहे. समीर वानखेडे यांच्यासह भारतातील 152 आणि महाराष्ट्रातील 11 अधिकाऱ्यांचा यावेळी सन्मान करण्यात आला होता.