Nawab Malik on Sameer Wankhede :  मुंबई क्रूझ ड्रग (Mumbai Cruise Drug Case) प्रकरणाला नवं वळण लागलं असून यामुळे राज्यातील राजकारण ढवळून निघालं आहे. सध्या राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडताना दिसतात. नवाब मलिक (Nawab Malik) यांच्याकडून दररोज पत्रकार परिषदा घेऊन या प्रकरणात नवनवे खुलासे केले जातात. आजही नवाब मलिकांनी पत्रकार परिषदेत बोलताना समीन वानखेडेंवर टीकास्त्र डागलं. यावेळी नवा बॉम्ब फोडताना नवाब मलिक म्हणाले की, समीर वानखेडे (Sameer Wankhede) सत्तर हजारांचं शर्ट वापरतात, एक लाख रुपयांची पँट वापरतात आणि दोन लाख रुपयांचे शूज वापरतात, असा आरोप नवाब मलिकांनी केला आहे. 


नवाब मलिकांनी बोलताना म्हटलं की, "समीर वानखेडेंचे सर्व फोटो तुम्ही पाहा. त्यांचे बूट पाहा. louis vuitton चे बूट दोन-दोन, तीन-तीन लाखांचे आहेत, ते जे बदलत असतात. त्यांचे शर्ट पाहाल तर त्यांची किंमत 50 हजारांपासून सुरु होते. टी शर्ट पाहिलं तर त्याची किंमत 30 हजार रुपयांपासून सुरु होते. वानखेडेंच्या हातातील घड्याळं दररोज बदलतात, ज्यांची किंमत 20 हजारांपासून सुरु होते, ती 1 कोटींपर्यंत किमतीची आहेत. एका प्रमाणिक अधिकाऱ्याचं हे राहनीमान? मी प्रार्थना करतो की, देशातील सर्व प्रामाणिक लोकांचं राहणीमान असंच व्हावं."


"समीर वानखेडेंचं शर्ट 70 हजारांचं का आहे? दररोज नवं शर्ट घालून का येतात? वानखेडे तर मोदींपेक्षाही पुढे निघाले. पँट लाख रुपयांची, पट्टा दोन लाखांचा, शूज अडीच लाखांचे. तर घड्याळं 20 लाखांची, 25 लाखांची. जे कपडे समीर वानखेडेंनी या दिवसांत घातले आहेत, त्यांची किंमतच कोट्यवधी रुपयांची आहे. खरंच, प्रामाणिक अधिकारी 10 कोटींचे कपडे परिधान करु शकते. कोणतंही शर्ट त्यांनी पुन्हा घातलेलं आम्ही पाहिलं नाही." , असं नवाब मलिक म्हणाले. 


पाहा व्हिडीओ : नवाब मलिकांचा समीर वानखेडेंच्या पेहरावावर निशाणा 



तेव्हा माझ्यावर कारवाई का केली नाही? नवाब मलिकांचा फडणवीसांना प्रश्न


बॉम्ब फोडण्यासाठी दिवाळीनंतर कशाला वाट पाहाता? माझं अंडरवर्ल्डशी संबंध असल्याचं कुणीचं सिद्ध करु शकत नाही, असं आव्हान नवाब मलिक यांनी देवेंद्र फडणवीस यांना दिलं आहे. माझे अंडरवर्ल्डशी संबंध होते, तर तुम्ही राज्याचे पाच वर्ष मुख्यमंत्री आणि गृहमंत्री होतात, तेव्हा काय केलं? कारवाई का केली नाही? असाही सवाल मलिकांनी उपस्थित केला. नवाब मलिक यांनी मंगळवारी पत्रकार परिषद घेत पुन्हा एकदा आरोपाचा धमाका केलाय.  देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना त्यांनी केलेल्या मोठ्या आरोपाची आठवणही मलिकांनी यावेळी करुन दिली. पंचतारांकित हॉटेलमध्ये तुमच्या कार्यकाळात झालेली पार्टी दिसली नाही का? या पार्टीतील एका टेबलची किंमत 15 लाख रुपये होती. या पार्टीत नक्कीच ड्रग्ज वापरले गेले असतील. ही पार्टी तुम्हाला नाही का दिसली? असा सवाल मलिकांनी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विचारला. यावेळी नवाब मलिक यांनी जावयाचा बचाव केला. शिवाय समीर वानखेडे आणि एनसीबीवर गंभीर आरोप केले. 


महत्त्वाच्या इतर बातम्या :