एक्स्प्लोर

Sameer Wankhede: सलग दुसऱ्या दिवशी सीबीआयकडून समीर वानखेडेंची 5 तास चौकशी, बाहेर येताच म्हणाले...

Sameer Wankhede: सीबीआयने आयआरएस अधिकारी समीर वानखेडे यांची सलग दोन दिवस प्रत्येक पाच तास चौकशी केली.

Sameer Wankhede CBI: आर्यन खान प्रकरणात 25 कोटींची खंडणी केल्याप्रकरणी सीबीआयने (CBI) सलग दुसऱ्या दिवशी तत्कालीन एनसीबी अधिकारी (NCB) आणि आयआरएस अधिकारी समीर वानखेडे (Sameer Wankhede) यांची पाच तास चौकशी केली.  चौकशी संपल्यानंतर सत्यमेव जयते म्हणत समीर वानखेडे सीबीआय कार्यालयातून बाहेर पडले. शनिवारीदेखील सीबीआयने वानखेडे यांची चौकशी केली होती. शनिवारीदेखील 5 तास चौकशी झाली होती. वानखेडे यांनी हायकोर्टात दाखल केलेल्या याचिकेवर सीबीआय सोमवारी आपलं म्हणणं सादर करणार आहे. 

एनसीबीने समीर वानखेडे यांच्याविरोधात तक्रार दाखल केली. त्यानंतर सीबीआयने त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला. गुन्हा दाखल केल्यानंतर सीबीआयने वानखेडे यांचे निवासस्थान आणि इतर संबंधित ठिकाणांवर छापेमारी केली. या कारवाई विरोधात वानखेडे यांनी दिल्ली हायकोर्टाच्या निर्देशानुसार, मुंबई हायकोर्टात याचिका दाखल केली आहे. शुक्रवारी 19 मे रोजी झालेल्या सुनावणीत हायकोर्टाने वानखेडेंना 22  मे पर्यंत अटक न करण्याचे निर्देश दिले होते. त्यानंतर शनिवार-रविवारी वानखेडे यांची सलग दोन दिवस पाच तास चौकशी करण्यात आली. 

आर्यन खान प्रकरण आणि बेहिशोबी मालमत्ता यासंबंधी सीबीआयने आर्यन खान यांच्यावर प्रश्नांची सरबत्ती केल्याची माहिती सूत्रांनी दिली. समीर वानखेडे यांच्या चौकशीसाठी दिल्लीतून देखील सीबीआयची टीम दाखल झाली आहे. वानखेडेंची प्रॉपर्टी, महागड्या गाड्या आणि परदेश वाऱ्यांवरील खर्च यावर त्यांना प्रश्न विचारण्यात आल्याची माहिती आहे. आज, रविवारी दिवसभरात 5 तास चौकशी झाली. चौकशी संपल्यानंतर  कोणतीही प्रतिक्रिया न देता वानखेडे रवाना झाले. सीबीआय कार्यालयातून बाहेर आल्यानंतर त्यांनी 'सत्यमेव जयते' एवढंच म्हटले. 

हायकोर्टात सीबीआय आपलं म्हणणं सादर करणार

वानखेडे यांनी दाखल केलेल्या रिट याचिकेवर सोमवारी सुनावणी होणार आहे. सोमवारी सीबीआय वानखेडे यांच्या चौकशीबाबत कोर्टात आपलं म्हणणं सादर करणार आहे.  वानखेडे यांनी चौकशीत सहकार्य करावे असं सांगताना हायकोर्टाने त्यांना 22 मे पर्यंत अटक करू नये असे निर्देश दिले. दोन दिवस झालेल्या चौकशीनंतर सीबीआय उद्या कोर्टात आपली भूमिका स्पष्ट करणार आहे. त्याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. 

या प्रश्नांची सरबत्ती?

सीबीआयने समीर वानखेडे यांच्यावर आर्यन खान केसमधील वादग्रस्त घडामोडी, 50 लाख रुपये कथितरित्या स्वीकारल्याचा आरोप, ज्ञानेश्वर सिंह यांच्याशी वादग्रस्त संवाद आणि खुद्द NCBच्या SITनं सादर केलेला अहवाल या सगळ्यांवरून वानखेडेंवर प्रश्नांची सरबत्ती करण्यात आली असल्याची चर्चा आहे. आर्यन खानला सोडवण्यासाठी शाहरुख खानकडे 25 कोटी रुपये मागितल्याचा वानखेडे यांच्यावर आरोप आहे.

इतर संबंधित बातम्या:

महत्त्वाच्या बातम्या

Anantrao Thopate: अनंतराव थोपटेंची शोकसभा लांबल्याने नाटकाचा प्रयोग दोन तास खोळंबला; 'बालगंधर्व'मध्ये प्रेक्षकांचा संताप, पुण्यात नेमकं काय घडलं?
अनंतराव थोपटेंची शोकसभा लांबल्याने नाटकाचा प्रयोग दोन तास खोळंबला; 'बालगंधर्व'मध्ये प्रेक्षकांचा संताप, पुण्यात नेमकं काय घडलं?
Beed Crime : लग्नानंतर बायको गर्भवती राहिली, रुग्णालयात उपचारादरम्यान भयावह सत्य समोर आलं; बीडच्या माजलगावमध्ये नवऱ्यासह आई-वडील अन् सासू-सासर्‍यावर गुन्हे दाखल
लग्नानंतर बायको गर्भवती राहिली, रुग्णालयात उपचारादरम्यान भयावह सत्य समोर आलं; बीडच्या माजलगावमध्ये नवऱ्यासह आई-वडील अन् सासू-सासर्‍यावर गुन्हे दाखल
Mohan Bhagwat: 'पाकिस्तानसोबत भारताने संवादाची दारे उघडीच ठेवावीत'; संघाचे सरकार्यवाह दत्तात्रय होसाबळेंच्या वक्तव्याचं मोहन भागवतांकडून समर्थन, म्हणाले...
'पाकिस्तानसोबत भारताने संवादाची दारे उघडीच ठेवावीत'; संघाचे सरकार्यवाह दत्तात्रय होसाबळेंच्या वक्तव्याचं मोहन भागवतांकडून समर्थन, म्हणाले...
Maharashtra Live News: रोहित पवारांच्या अन्नत्याग आंदोलनाचा आज तिसरा दिवस; आंदोलन थांबवण्यासाठी सरकारचे प्रयत्न सुरू
Maharashtra Live News: रोहित पवारांच्या अन्नत्याग आंदोलनाचा आज तिसरा दिवस; आंदोलन थांबवण्यासाठी सरकारचे प्रयत्न सुरू

व्हिडीओ

Mountaineer Umesh Zirpe On Majha Katta : यावेळीची मोहीम कशी होती? झिरपेंनी सांगितला थरारक अनुभव
Women Power : महिलांनी घेतला निर्धार अन् बदललं गावाचं चित्र; 'महिला शक्ती कमांडो'ची यशोगाथा | Special Report
Jamun & Drought : जांभळाचा सडा आणि दुष्काळाचा इशारा? निसर्ग काय सांगतोय? | Special Report
Crime Patrol Style Theft Special Report : 'क्राईम पेट्रोल' पाहून रचला चेन स्नॅचिंगचा कट; पोलिसांनी मुसक्या आवळल्या
Jalgaon MLC Election Special Report : नाशकातील बंडखोरी मिटली, पण जळगावचा पेच कायम! शिवसेनेच्या रेश्मा काळे 'नॉट रिचेबल'!

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Uddhav Thackeray Shivsena UBT MP Meeting Mumbai: एकीकडे ऑपरेशन टायगरची चर्चा, दुसरीकडे उद्धव ठाकरेंनी आज बोलावली खासदारांची बैठक; कोणकोण उपस्थित राहणार?
एकीकडे ऑपरेशन टायगरची चर्चा, दुसरीकडे उद्धव ठाकरेंनी आज बोलावली खासदारांची बैठक; कोणकोण उपस्थित राहणार?
Rohit Pawar Protest : रोहित पवारांचा आक्रमक पवित्रा, तिसऱ्या दिवशीही अन्नत्याग आंदोलन सुरूच राहणार; वडील राजेंद्र पवार म्हणाले, 'मी रोहितचा बाप असलो तरी....',
रोहित पवारांचा आक्रमक पवित्रा, तिसऱ्या दिवशीही अन्नत्याग आंदोलन सुरूच राहणार; वडील राजेंद्र पवार म्हणाले, 'मी रोहितचा बाप असलो तरी त्याला शेतकऱ्यांच्या ओटीत टाकलंय',
India vs Afghanistan, 1st ODI: टीम इंडियाची अफगाणिस्तानविरुद्ध शानदार विजयी सलामी, गिलची 'कॅप्टन' इनिंग, केएल राहुलने कळस चढवला; गुरबाजचे विक्रमी शतक व्यर्थ
टीम इंडियाची अफगाणिस्तानविरुद्ध शानदार विजयी सलामी, गिलची 'कॅप्टन' इनिंग, केएल राहुलने कळस चढवला; गुरबाजचे विक्रमी शतक व्यर्थ
Rohit Sharma Video: रोहित शर्माचा दुर्दैवाचा फेरा सुरुच, दुखापतीतून सावरून आला, पहिल्याच ओव्हरमध्ये मनगटाच्या वेदनेनं तळमळला, पुन्हा उभा राहिला, पण जम बसण्यापूर्वीच रन आऊटने घात केला
Video: रोहित शर्माचा दुर्दैवाचा फेरा सुरुच, दुखापतीतून सावरून परतला, पहिल्याच ओव्हरमध्ये मनगटाच्या वेदनेनं तळमळला, पुन्हा उभा राहिला, पण जम बसण्यापूर्वीच रन आऊटने घात केला
होर्मुझमधून जाणाऱ्या जहाजांचे आदेशांचे पालन करा, नाकेबंदी तोडल्यास कारवाई केली जाईल; आंतरराष्ट्रीय पाण्यातही अमेरिकेचा भारताला सज्जड दम, तीन दिवसात अमेरिकेनं केलेल्या हल्ल्यात तीन भारतीयांचा मृत्यू
होर्मुझमधून जाणाऱ्या जहाजांचे आदेशांचे पालन करा, नाकेबंदी तोडल्यास कारवाई केली जाईल; आंतरराष्ट्रीय पाण्यातही अमेरिकेचा भारताला सज्जड दम, तीन दिवसात अमेरिकेनं केलेल्या हल्ल्यात तीन भारतीयांचा मृत्यू
लातूरमध्ये तीन गाड्यांचा भीषण अपघात; दुचाकीवर पत्नी-पत्नीचा मृत्यू, वॅगनॉरमधील 1 ठार, 2 जखमी
लातूरमध्ये तीन गाड्यांचा भीषण अपघात; दुचाकीवर पत्नी-पत्नीचा मृत्यू, वॅगनॉरमधील 1 ठार, 2 जखमी
India vs Afghanistan, 1st ODI: अफगाणिस्तानचे टीम इंडियासमोर 195 धावांचे आव्हान; गुरनूर ब्रार अन् हर्ष दुबे पदार्पणातच 3-3 विकेट घेत चमकले; गुरबाजने 48 चेंडूत शतक ठोकत 21 वर्षांचा विक्रम मोडला
अफगाणिस्तानचे टीम इंडियासमोर 195 धावांचे आव्हान; गुरनूर ब्रार अन् हर्ष दुबे पदार्पणातच 3-3 विकेट घेत चमकले; गुरबाजने 48 चेंडूत शतक ठोकत 21 वर्षांचा विक्रम मोडला
देवेंद्र फडणवीस म्हणाले, फोटोची गरज नाही, आम्ही त्यांना प्रपोजल दिलंय; पुण्यातील राजकीय वर्तुळात चर्चा
देवेंद्र फडणवीस म्हणाले, फोटोची गरज नाही, आम्ही त्यांना प्रपोजल दिलंय; पुण्यातील राजकीय वर्तुळात चर्चा
Embed widget