Sambhaji Raje Chhatrapati : संभाजीराजे छत्रपती यांची मोठी घोषणा, 'स्वराज्य' संघटनेची स्थापना
संभाजीराजे छत्रपती यांनी आज मोठी घोषणा केली आहे. त्यांनी आज 'स्वराज्य' संघटनेची स्थापना केल्याची घोषणा केली.
Sambhaji Raje Chhatrapati : संभाजीराजे छत्रपती यांनी आज मोठी घोषणा केली आहे. त्यांनी आज 'स्वराज्य' संघटनेची स्थापना केल्याची घोषणा केली. लवकरच मी महाराष्ट्राचा दौरा करणार आहे. लोकांना स्वराज्याच्या नावाखाली एकत्र करण्यासाठी दौरा करणार आहे. जनतेला एका छताखाली कसे आणता येईल यासाठी प्रयत्न करणार असल्याचे संभाजीराजे म्हणाले. जिथे अन्याय होतो तिथे लढा देणार आहे. शिवाजी महाराज आणि शाहू महाराजांचे विचार पोहोचवण्यासाठी ही संघटना स्थापन करणार आहे. पुण्यात आज संभाजीराजेंनी
पहिला टप्पा स्वराज्य संघटीत करणे हा आहे. त्यानंतर पुढील निर्णय घेणार आहे. ही संघटना, हे स्वराज्य उद्या राजकीय पक्ष झाला तरी वावगे ठरु नये. त्याला माझी तयारी आहे. पण पहिला टप्प्यात संघटीत होणे गरजेचे आहे. या महिन्यातच महाराष्ट्राच्या दौऱ्याला सुरुवात करणार असल्याचे संभाजीराजे म्हणाले.
अनेकांनी सांगितले पक्ष स्थापन करा. वेगवेगळ्या संघटनांनी सांगितले पक्ष स्थापन करा. या काळात मला चांगले आणि वाईट अनुभव आल्याचे संभाजीराजे म्हणाले. त्यामुळे स्वराज्य संघटनेची स्थापना करण्याचा निर्णय घेतल्याचे त्यांनी सांगितले. येणाऱ्या काळात छत्रपती शिवाजी महाराज आणि शाहू महाराजांच्या विचारांच्या लोकांना एकत्र आणणार आहे. लोकांचे प्रश्न समजून घेण्यासाठी लवकरच महाराष्ट्राचा दौरा करणार आहे. या पाच ते सहा दिवसात अनेक जणांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून सांगितले की आपण स्वतंत्र पक्ष स्थापन करा. माझ्या राजकीय वाटचालीचा पहिला टप्पा स्वराज्य संघटीत करणे हा असल्याचे ते म्हणाले. ही संघटना, राज्यकीय पक्ष झाला तरी त्याला माझी तयारी असल्याचे त्यांनी सांगितले.
5 मे 2017 ला क्रांती मोर्चा ज्यावेळी आझाद मैदानावर आला त्यावेळी स्टेजवर जाण्याचे धाडस कोणी केलं नाही. मी स्वत: स्टेजवर गेलो. यावेळी मी सर्वांना विनंती केली. मग तिथून समाज निघून गेल्याचे संभाजीराजेंनी सांगितले. तिथे जर काही घडले असते तर ते महाराष्ट्राला परवडले नसते. माझी भूमिका ही समाजाच्या हितासाठीच होती असे ते म्हणाले. गेल्या 6 वर्षात मी राष्ट्रपती नियुक्त खासदाराची गरिमा राखली असल्याचे त्यांनी सांगितलं.