एक्स्प्लोर

मराठा आरक्षणासंदर्भात संभाजीराजेंनी मांडलेली भुमिका मराठा समाजाच्या हिताची : राधाकृष्ण विखे पाटील

मराठा आरक्षण देण्यात महाविकास आघाडी अपयशी ठरल्याने केंद्राकडे बोट दाखवत असून स्वत:च अपयश झाकण्यासाठी आघाडीचा वेळ वाया घालवत आहेत, अशी टीका देखील राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली आहे.

शिर्डी : मराठा आरक्षणा संदर्भात खासदार संभाजीराजे छत्रपतींनी मांडलेली भुमिका मराठा समाजाच्या हिताची आहे.  मात्र नुसते अल्टिमेटम न देता सर्व मराठा संघटनांना सोबत घेऊन भूमिका मांडण्याची गरज असल्याचं मत राधाकृष्ण विखे पाटील यांनी व्यक्त केलं. लोणी गावातील कोविड सेंटरला भेट दिल्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी कोरोनाच्या मृत्यू झालेल्या पत्रकारांच्या कुटुंबियांना राज्य सरकारने कोणती मदत दिली नसून हे केवळ घोषणाबाज सरकार असल्याची टीका केली.

मराठा आरक्षण देण्यात महाविकास आघाडी अपयशी ठरल्याने केंद्राकडे बोट दाखवत असून स्वत:च अपयश झाकण्यासाठी आघाडीचा वेळ वाया घालवत आहेत. सरकारमधील मंत्री जी विधाने करतायत यावरून सरकारचा हेतू प्रामाणिक दिसत नाही, अशी टीका त्यांनी केली. तसेच सकल मराठा समाजाने एका व्यासपीठावर एकत्र यावेळी एकत्रितपणे सरकारवर दबाव आणून आरक्षण आपल्या पदरात पाडून घ्यावे लागेल, असं मत भाजप आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी व्यक्त केलंय. 

संभाजीराजेंनी नवीन पक्ष काढावा हा त्यांचा प्रश्न, मात्र मराठा समाजाने कोणत्याही पक्षाच्या बाजूने आपली भुमिका उभी ‌केली नाही. त्यामुळे सर्वांनी एकत्र येऊन भुमिका घ्यावी असही राधाकृष्ण विखे पाटील यांनी संभाजीराजे यांच्या नवीन पक्ष काढणायच्या वक्तव्यावर स्पष्ट केलंय. 

घोषणाबाज सरकार म्हणून राज्य सरकारचा लौकिक असून कोविडच्या काळात काम करताना अनेक पत्रकारांना प्राण गमवावे लागले. यावर मंत्र्यांनी मदतीची अनेकदा घोषणा केली मात्र अद्याप कोणतीही मदत नाही. याउलट केंद्राने पाठपुरावा करून 5 लाखांची मदत दिली असून पत्रकारांना विमा कवच तसेच मृत पत्रकाराच्या कुटुंबाना देणार का? असा सवाल विखे यांनी विचारलाय. तर म्युकोरमायकोसीस बाधित रुग्णांचा उपचाराचा‌ खर्च पाहता राज्य सरकारने योजनेतून दिलेली मदत अत्यल्प असून यात इंजेक्शनचा खर्च देखील भागणार नाही असं सांगत सरकारची फक्त वाऱ्यावर वरात सुरू असल्याचा टोला महाविकासआघाडी सरकारला लगावलाय. 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Shukla vs Marathi Kalyan Rada : 'मराठी माणसं घाण आहात' तिघांना मारलं; कल्याणच्या सोसायटीत राडा
Shukla vs Marathi Kalyan Rada : 'मराठी माणसं घाण आहात' तिघांना मारलं; कल्याणच्या सोसायटीत राडा
अजित दादांना उपकारांची आठवण करुन देणारी Chhagan Bhujbal यांची मुलाखत  EXCLUSIVE
अजित दादांना उपकारांची आठवण करुन देणारी भुजबळांची स्फोटक मुलाखत
Pravin Swami :नागपूरच्या आमदार निवासात निकृष्ट दर्जाचे जेवण, ठाकरेंच्या आमदारानं केलं शूट
Pravin Swami :नागपूरच्या आमदार निवासात निकृष्ट दर्जाचे जेवण, ठाकरेंच्या आमदारानं केलं शूट
Dinga Dinga Disease VIDEO : लोकांना नाचायला लावणारा नवा आजार- डिंगा डिंगा, आफ्रिकन देशात थैमान
लोकांना नाचायला लावणारा नवा आजार- डिंगा डिंगा, आफ्रिकन देशात थैमान
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Special Report on Delhi Congress protest : संसद भवनाबाहेर राजकारणतला 'दे धक्का'चा अंकSpecial Report Mumbai BJP Protest:कार्यालय,सोनियांच्या पोस्टरवर शाईफेक,भाजप कार्यकर्त्यांकडून दगडफेकSpecial Report Laxman Savadi:कर्नाटक विधानसभेत काँग्रेस आमदाराची मुक्ताफळ,मुंबईवर दावा करेपर्यंत मजलSpecial Report on Mumbai Congress vs BJP : काँग्रेस vs भाजप कार्यकर्ते चिडले, एकमेकांशी भिडले

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Shukla vs Marathi Kalyan Rada : 'मराठी माणसं घाण आहात' तिघांना मारलं; कल्याणच्या सोसायटीत राडा
Shukla vs Marathi Kalyan Rada : 'मराठी माणसं घाण आहात' तिघांना मारलं; कल्याणच्या सोसायटीत राडा
अजित दादांना उपकारांची आठवण करुन देणारी Chhagan Bhujbal यांची मुलाखत  EXCLUSIVE
अजित दादांना उपकारांची आठवण करुन देणारी भुजबळांची स्फोटक मुलाखत
Pravin Swami :नागपूरच्या आमदार निवासात निकृष्ट दर्जाचे जेवण, ठाकरेंच्या आमदारानं केलं शूट
Pravin Swami :नागपूरच्या आमदार निवासात निकृष्ट दर्जाचे जेवण, ठाकरेंच्या आमदारानं केलं शूट
Dinga Dinga Disease VIDEO : लोकांना नाचायला लावणारा नवा आजार- डिंगा डिंगा, आफ्रिकन देशात थैमान
लोकांना नाचायला लावणारा नवा आजार- डिंगा डिंगा, आफ्रिकन देशात थैमान
Aaditya Thackeray :बेळगाव केंद्रशासित झाला पाहिजे,आदित्य ठाकरे यांची मागणी
Aaditya Thackeray :बेळगाव केंद्रशासित झाला पाहिजे,आदित्य ठाकरे यांची मागणी
Nanded Suicide : मुख्याध्यापकाने दिवसाढवळ्या शाळेत दारू ढोसली, बदनामीच्या भीतीने रात्री आत्महत्या केली; नांदेडमधील धक्कादायक घटना
मुख्याध्यापकाने दिवसाढवळ्या शाळेत दारू ढोसली, बदनामीच्या भीतीने रात्री आत्महत्या केली; नांदेडमधील धक्कादायक घटना
छगन भुजबळांचं थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींसह मुख्यमंत्री फडणवीसांना पत्र, नेमकी काय केली मागणी? 
छगन भुजबळांचं थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींसह मुख्यमंत्री फडणवीसांना पत्र, नेमकी काय केली मागणी? 
Devendra Fadanvis Vidhan Sabha Speech : लाडक्या बहिणींना पुढील हफ्ता कधी? फडणवीसांनी भाषणात सांगितलं
Devendra Fadanvis Vidhan Sabha Speech : लाडक्या बहिणींना पुढील हफ्ता कधी? फडणवीसांनी भाषणात सांगितलं
Embed widget