एक्स्प्लोर
पवारांच्या सल्ल्यानं संजय राऊत शकुनी मामाची भूमिका पार पाडतात- निलंगेकर

उस्मानाबाद: ‘संजय राऊत संसदेत बसून पवारांच्या सल्यानं शिवसेनेसाठी शकुनी मामाची भूमिका पार पाडतात’, अशी घणाघाती टीका भाजपचे मंत्री संभाजी पाटील निलंगेकरांनी केली आहे. शिवसेनेतले कौरव कोण आणि भाजपाचे पांडव कोण याचीही मांडणी निलंगेकरांनी केली आहे. राऊतांसोबत निलंगेकरांनी शिवसेनेच्या कॅबिनेट मंत्र्यांवर देखील हल्ला चढवला. मंत्रीमंडळाच्या बैठकीत शिवसेनेचे मंत्री चांगल्या निर्णयाची अमंलबजावणी होताना अडथळा निर्माण करतात. अशी टीका ही निलंगेकरांनी केली. ‘मुख्यमंत्र्यांना कोणत्याही परिस्थीत युती हवी होती. पण दिल्लीत काही जण पवारांच्या अवतीभवती बसून हे राजकारणं शिजवतात. व्यक्तीच्या लाभासाठी या लोकांनी विष कालवण्याचं काम केलं आहे.’ अशी टीका निलंगेकरांनी केली. दुसरीकडे शरद पवारांबाबात बोलताना निलंगेकर म्हणाले की, ‘आम्ही न मागताही शरद पवार पाठिंबा देऊन भाजपला अडचणीत आणण्याचा प्रयत्न करतात.’ संबंधित बातम्या: मुख्यमंत्रीपदाचा आदर करतो, व्यक्तीचा नाही : संजय राऊत
राज-उद्धव एकत्र आल्यास इतिहास घडेल, मनोहर जोशींना विश्वास
मुख्यंमंत्र्यांच्या घणाघाती भाषणावर शिवसेनेची पहिली प्रतिक्रिया
भाजपची औकात काय ते 21 तारखेला दाखवू : मुख्यमंत्री शिवसेना-भाजपची युती तुटली, महाराष्ट्रात शिवसेना स्वबळावर लढणारआणखी वाचा
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
मुंबई
बातम्या
क्राईम





















