एक्स्प्लोर
संभाजी ब्रिगेडच्या जिल्हाध्यक्षाला दहा लाखांची खंडणी घेताना अटक
संभाजी ब्रिगेडच्या जिल्हाध्यक्षाला दहा लाख रुपयांची खंडणी घेताना इस्लामपूर पोलिसांनी अटक केली आहे. सुयोग गजानन औंधकर असे त्याचे नाव आहे.

सांगली : सांगलीतल्या इस्लामपूरमधील संभाजी ब्रिगेडच्या जिल्हाध्यक्षाला दहा लाख रुपयांची खंडणी घेताना इस्लामपूर पोलिसांनी अटक केली आहे. सुयोग गजानन औंधकर असे त्याचे नाव आहे. तो सहकारी संस्थांच्या सहायक निबंधक कार्यालयात येऊन अधिकाऱ्यांकडून दहा लाख रुपयांची खंडणी मागत होता. त्याच वेळी इस्लामपूर पोलिसांनी औंधकरला रंगेहात पकडले. "साखर कारखाना निवडणुकीतील उमेदवार अर्जांची प्रसिद्धी नोटीस बोर्डावर का लावली नाही, यात तुम्ही तुमच्या पदाचा गैरवापर केला आहे. अशी माहिती 'माहितीच्या अधिकारा'त मिळवली आहे." असे सांगत 10 लाखांची खंडणी स्वीकारताना सुयोग औंधकर पोलिसांच्या हाती सापडला आहे. इस्लामपूरचे पोलीस उपअधीक्षक कृष्णत पिंगळे यांच्या पथकाने शुक्रवारी रात्री ही कारवाई केली. औंधकरसोबत माहिती अधिकार कार्यकर्ता कृष्णा विश्वनाथ जंगम हादेखील यामध्ये सामील असल्याचे निष्पन्न झाले आहे. याप्रकरणी इस्लामपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. औंधकरने सहायक निबंधक आणि सहायक निवडणूक निर्णय अधिकारी अमोल डफळेकडे पैशाची मागणी केली होती. डफळे शुक्रवारी 10 लाख रुपये खंडणी म्हणून औंधकरला देणार होता. पोलीस उप अधीक्षक पिंगळे यांना याबाबत माहिती मिळाली. त्यानंतर पिंगळे यांच्या पथकाने सापळा रचून औंधकरला अटक केली. त्यानंतर औंधकरचा साथीदार कृष्णा जंगम यालाही रात्री वाळवा येथून अटक करण्यात आली आहे.
आणखी वाचा
महत्त्वाच्या बातम्या
छत्रपती संभाजी नगर
मुंबई
व्यापार-उद्योग
राजकारण























