एक्स्प्लोर

Akhilesh Yadav Mumbai Visit : अखिलेश यादव मुंबईत आले, पण शरद पवारांची भेट न घेताच परतले; का?

Akhilesh Yadav Mumbai Visit : समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव मुंबईत आले, पण विरोधी पक्षआच्या नेत्यांच्या भेटी न घेताच परतले. यावरुन सध्या राजकीय वर्तुळात चर्चा रंगल्या आहेत.

Akhilesh Yadav Mumbai Visit : समाजवादी पक्षाचे (Samajwadi Party) अध्यक्ष आणि उत्तर प्रदेशचे (Uttar Pradesh) माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव (Akhilesh Yadav) सोमवारी मुंबई दौऱ्यावर आलेले. आपल्या या मुंबई दौऱ्यादरम्यान अखिलेश यादव मुंबईत विरोधी पक्षाच्या नेत्यांच्या भेटी घेणार असल्याचं बोललं जात होतं. परंतु, त्यांनी कोणत्याही विरोधी पक्षाच्या नेत्याची भेट घेतली नाही. यावर अखिलेश यादव यांचा हा खाजगी दौरा होता, हा कोणाताही राजकीय दौरा नव्हता. त्यामुळे त्यांनी कोणत्याही राजकीय भेटी-गाठी घेतल्या नसल्याचं समाजवादी पक्षाच्या पदाधिकाऱ्यानं सांगितलं. तसेच, अखिलेश यादव यांनीही याच मुद्द्यावरुन माध्यमांवर नाराजी व्यक्त केली. 

समाजवादी पक्षाच्या नेत्यानं सांगितलं की, अखिलेश यादव यांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (NCP) अध्यक्ष शरद पवार यांच्यासोबत कोणतीही नियोजित बैठक नव्हती. भाजपला घेरण्यासाठी शरद पवार विरोधी पक्षांची एकजूट करण्याचा प्रयत्न करत आहेत. यामध्ये अखिलेश यादवही त्यांच्यासोबत आहे. या पार्श्वभूमीवर मुंबई दौऱ्यावर आलेले अखिलेश यादव शरद पवारांची भेट घेणार असल्याचं बोललं जात होतं. पण अखिलेश यादव यांची भेट वैयक्तिक होती आणि त्यांनी कोणत्याही राजकीय कार्यक्रमात भाग घेतला नाही. मुंबईतील पक्षाच्या काही कार्यकर्त्यांनी ते मुक्कामी असलेल्या हॉटेलमध्ये जात भेट घेतली, असं समाजवादी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितलं. 

एका कौटुंबिक कार्यक्रमासाठी मुंबईत, विरोधी पक्षाच्या नेत्यांना भेटणार असल्याच्या बातम्या चुकीच्या : अखिलेश यादव 

टोमॅटोचे भाव कडाडल्याची बातमी दाखवली तरी सध्याच्या केंद्र सरकारमध्ये हलकल्लोळ माजतो, अशी टीका समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव यांनी आपल्या मुंबई दौऱ्यात केली आहे. एका कौटुंबिक कार्यक्रमासाठी मुंबईत येऊनही मी विरोधी पक्षाच्या नेत्यांना भेटणार असल्याच्या बातम्या प्रसिद्ध होत असल्याची तक्रार त्यांनी केली आहे. सध्या महागाई प्रचंड वाढली असल्याचा आरोप करून अखिलेश यादव म्हणाले की, डाळतांदळापासून पेट्रोलपर्यंत प्रत्येक वस्तू महागल्या आहेत. पण दडपशाही इतकी आहे की, उत्तर प्रदेशात कोणी टोमॅटोचा भाव विचारला तरी त्याला पोलीस अटक करतात. देशातला शेतकरी एक ना अनेक समस्यांनी त्रस्त आहे. आणि त्यामुळंच अर्थव्यवस्था डगमगत असल्याचा आरोप अखिलेश यांनी केला. भाजप समाजात तोडफोड करण्याचं राजकारण करत असल्याचा आरोपही त्यांनी केला.

दुसरीकडे आपल्या मुंबई दौऱ्यात अखिलेश यादव यांनी राज्यातील सपा नेत्यांची भेट घेतली. "भाजपची रणनीती काय आहे, कधी कधी कोणालाच कळत नाही. भाजप असे काम करते, पक्ष फोडते, फूट पाडते, त्यांचा वाटा हिसकावून घेते.", असं अखिलेश यादव कार्यकर्त्यांशी बोलताना म्हणाले. 

भाजपवर आरोप

अखिलेश यादव म्हणाले की, भारतीय जनता पक्ष अशा प्रकारे पक्षामध्ये फूट पाडून पुढे जात आहे. दरम्यान, भाजपविरोधात विरोधकांची एकजूट करण्याची कसरत सातत्यानं सुरू आहे. यासंदर्भात 23 जून रोजी पाटण्यात अनेक पक्षांची बैठक झाली. मात्र यानंतर महाराष्ट्रात राष्ट्रवादीत फूट पडली आणि अजित पवार भाजपच्या साथीनं सरकारमध्ये सहभागी झाले. 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Baba Siddique Murder Case: बाबा सिद्दीकींवर गोळ्या झाडणाऱ्या मारेकऱ्याचा कबुलीनामा, पोलिसांची  लांबलचक चार्जशीट, वाचा शब्द जसाच्या तसा
बाबा सिद्दीकींवर गोळ्या झाडणाऱ्या मारेकऱ्याचा कबुलीनामा, पोलिसांची लांबलचक चार्जशीट, वाचा शब्द जसाच्या तसा
Bill Gates Pandemic: जगावर पुन्हा मोठं संकट येणार? चार वर्षांत कोरोनासारखी वैश्विक महामारी येण्याची शक्यता; बिल गेट्स यांचे भाकीत
जगावर पुन्हा मोठं संकट येणार? चार वर्षांत कोरोनासारखी वैश्विक महामारी येण्याची शक्यता; बिल गेट्स यांचे भाकीत
Yavatmal News : 3 लाख शेतकऱ्यांचे 386 कोटी लालफीतशाहित अडकून; विदर्भातील 5 जिल्ह्यातील अतिवृष्टीग्रस्थांना नुकसान भरपाई कधी?
3 लाख शेतकऱ्यांचे 386 कोटी लालफीतशाहित अडकून; विदर्भातील 5 जिल्ह्यातील अतिवृष्टीग्रस्थांना नुकसान भरपाई कधी?
Ajit Pawar: धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यासाठी दबाव वाढला, पालकमंत्री अजित पवार 30 जानेवारीला बीडला जाणार, कार्यकारिणीची महत्त्वाची बैठक
धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यासाठी दबाव वाढला, पालकमंत्री अजित पवार 30 जानेवारीला बीडला जाणार, कार्यकारिणीची महत्त्वाची बैठक
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 12 PM Headlines at 12PM 28 January 2024 दुपारी १२ च्या हेडलाईन्सABP Majha Marathi News Headlines 11 AM TOP Headlines at 11AM 28 January 2024 सकाळी ११ च्या हेडलाईन्सMohit Kamboj On Baba Siddique : सिद्दीकींच्या डायरीमध्ये कंबोज यांचं नाव? कंबोज स्पष्टच बोलले..ABP Majha Marathi News Headlines 10 AM TOP Headlines at 10AM 28 January 2024 सकाळी १० च्या हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Baba Siddique Murder Case: बाबा सिद्दीकींवर गोळ्या झाडणाऱ्या मारेकऱ्याचा कबुलीनामा, पोलिसांची  लांबलचक चार्जशीट, वाचा शब्द जसाच्या तसा
बाबा सिद्दीकींवर गोळ्या झाडणाऱ्या मारेकऱ्याचा कबुलीनामा, पोलिसांची लांबलचक चार्जशीट, वाचा शब्द जसाच्या तसा
Bill Gates Pandemic: जगावर पुन्हा मोठं संकट येणार? चार वर्षांत कोरोनासारखी वैश्विक महामारी येण्याची शक्यता; बिल गेट्स यांचे भाकीत
जगावर पुन्हा मोठं संकट येणार? चार वर्षांत कोरोनासारखी वैश्विक महामारी येण्याची शक्यता; बिल गेट्स यांचे भाकीत
Yavatmal News : 3 लाख शेतकऱ्यांचे 386 कोटी लालफीतशाहित अडकून; विदर्भातील 5 जिल्ह्यातील अतिवृष्टीग्रस्थांना नुकसान भरपाई कधी?
3 लाख शेतकऱ्यांचे 386 कोटी लालफीतशाहित अडकून; विदर्भातील 5 जिल्ह्यातील अतिवृष्टीग्रस्थांना नुकसान भरपाई कधी?
Ajit Pawar: धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यासाठी दबाव वाढला, पालकमंत्री अजित पवार 30 जानेवारीला बीडला जाणार, कार्यकारिणीची महत्त्वाची बैठक
धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यासाठी दबाव वाढला, पालकमंत्री अजित पवार 30 जानेवारीला बीडला जाणार, कार्यकारिणीची महत्त्वाची बैठक
Beed Police: बीडमध्ये पोलिसांसाठी आदेश, आडनाव घ्यायचं नाही, नावाने हाक मारायची; पोलीस अधीक्षक नवनीत कावतांनी फर्मान सोडलं
बीडमधील जातीयवादाला SP कावतांचा सुरुंग, आडनाव घ्यायचं नाही, एकमेकांना नावाने हाक मारा, पोलिसांना आदेश
Baba Siddique vs Mohit Kamboj: बाबा सिद्दीकींनी डायरीत मोहित कंबोज यांचं नाव लिहलं, WhatsApp चॅट केलं अन् पुढच्या काही क्षणांत आक्रित घडलं
बाबा सिद्दीकींनी डायरीत मोहित कंबोज यांचं नाव लिहलं अन् पुढच्या काही क्षणांत धडाधड फायरिंग
धक्कादायक! रात्री गेम खेळत होती, दुसऱ्या दिवशी खोलीत रक्ताच्या थारोळ्यात, नागपूरमध्ये 17 वर्षीय तरुणीचं टोकाचं पाऊल
धक्कादायक! रात्री गेम खेळत होती, दुसऱ्या दिवशी खोलीत रक्ताच्या थारोळ्यात, नागपूरमध्ये 17 वर्षीय तरुणीचं टोकाचं पाऊल
Mohit Kamboj: हत्येच्या दिवशी बाबा सिद्दीकींशी WhatsApp चॅटिंग केल्याची माहिती उघड होताच मोहित कंबोजांचं स्पष्टीकरण, म्हणाले....
बाबा सिद्दीकींच्या डायरीत शेवटचं नाव अन् WhatsApp चॅटिंग; आरोप होताच मोहित कंबोजांचं तातडीने स्पष्टीकरण, म्हणाले...
Embed widget