एक्स्प्लोर

सलून व्यवसायिकांचं कैचीला कुलूप लावून निषेध; पंतप्रधान, मुख्यमंत्र्यांकडे आर्थिक मदतीची मागणी

सरकारने सलून सुरू करण्यास परवानगी दिली असली, तरी अद्याप सर्व प्रकारच्या सेवांना परवानगी मिळालेली नाही. फक्त हेअर कटींगमुळे सलून व्यवसायिकांना दुकान चालवणे कठीण झाले आहे.

मुंबई : देशातील एकूण 102 सलून आणि ब्युटी पार्लर संघटनांनी एकत्र येऊन आज 'सेव्ह सलून इंडिया' मोहिमेत एकत्र सहभागी झाले. सलून व्यवसाय सुरू करण्यास सरकारने परवानगी दिली असली, तरी हजारो सलून व्यवसायिकांनी कैचीला टाळे लावत आपला निषेध नोंदवला आहे. सरकारने लादलेल्या जाचक नियम व अटी-शर्थींमुळे सलूनला टाळे लावण्याची वेळ आली आहे, असा आरोप सलून व ब्युटी पार्लर असोसिएशनने केला आहे. तसेच आर्थिक मदतीची मागणी करणारी हजारोच्या संख्येने मेल मुख्यमंत्री कार्यालयासह पंतप्रधानांना ईमेलद्वारे पाठवली आहेत.

आज सकाळी 10 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत हे मेल पाठवणे सुरू होते. या आंदोलनाबाबत असोसिएशनचे उपाध्यक्ष तुषार चव्हाण यांनी सांगितले की, सेव्ह सलून इंडिया अंतर्गत हे मेल सरकारला पाठवण्यात येत आहे. सरकारने सलून सुरू करण्यास परवानगी दिली असली, तरी अद्याप सर्व प्रकारच्या सेवांना परवानगी मिळालेली नाही. फक्त हेअर कटींगमुळे सलून व्यवसायिकांना दुकान चालवणे कठीण झाले आहे. लॉकडाऊनमुळे 23 मार्चला बंद झालेली सलून्स 28 जूनला सुरू झाली. या काळात 12 आत्महत्या झाल्या आहेत. कारण सरकारने व्यवसायिकांचे हात बांधले, मात्र मदत केली नाही. म्हणूनच आज अडचणीत असलेल्या सलून व्यवसायिकांकडून सरकारला मदतीसाठी साकडे घालण्यात आले.

संघटनेचे सल्लागार उदय टक्के म्हणाले की, सरकारने सलून उद्योगाला आर्थिक पॅकेजची घोषणा करावी अशी संघटनेची मागणी आहे. मागील चार महिने व्यवसाय पूर्णपणे बंद असल्याने एक रुपया सुद्धा सलून मालकाला कमवता आला नाही. त्यामुळे सद्यस्थितीत तोट्यात असलेल्या सलून व्यसायिकांची परिस्थिती पाहून 9 महिन्यासाठी दुकानाचे भाडे माफ करावे. सलून व्यवसायासाठी घेतलेल्या कर्जाचे पुढील 9 महिन्यांपर्यंत कर्जाचे हफ्ते घेऊ नये. तसेच या कालावधीतील व्याज माफ करावे. स्थानिक स्तरावर 9 महिन्यांसाठी वीजबिल आणि करांतून सूट द्यावी. एखाद्या सलूनमध्ये ग्राहकाला किंवा कारागिराला कोरोनाची लागण झाल्यास संबंधित सलून सील करावे. संपूर्ण उद्योगाला शिक्षा देऊ नका,अशी मागणीचे मेल आज सरकारला पाठवून या मागण्या मान्य करण्यात याव्यात अशी विनंती केली गेली आहे.

संबंधित बातम्या :

Beauty Parlor Story | सलून आणि ब्यूटीपार्लर्स चालकांना लॉकडाऊनची मोठी झळ | स्पेशल रिपोर्ट

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Live blog updates: ठाणे जिल्ह्याची भविष्यातील तहान भागवणारे काळू धरण प्रकल्पावरील 10 वर्षांची स्थगिती उठवली
Maharashtra Live blog updates: ठाणे जिल्ह्याची भविष्यातील तहान भागवणारे काळू धरण प्रकल्पावरील 10 वर्षांची स्थगिती उठवली
Nana Patekar: भाजपने नाना पाटेकरांना दिली होती लोकसभेची ऑफर, पण नाना फडणवीसांना म्हणाले, आशिष शेलारांनी काय सांगितलं?
भाजपने नाना पाटेकरांना दिली होती लोकसभेची ऑफर, पण नाना फडणवीसांना म्हणाले, आशिष शेलारांनी काय सांगितलं?
Raju Shetti: राज्यात आजपासून ऊस गळीत हंगाम सुरू अन् शेतकरी आणि कारखानदारांमद्ये संघर्षाची ठिणगी; राजू शेट्टींनी आंदोलनाची दिशा बदलली, कृष्णा साखर कारखान्यावर आज काटा बंद आंदोलन
राज्यात आजपासून ऊस गळीत हंगाम सुरू अन् शेतकरी आणि कारखानदारांमद्ये संघर्षाची ठिणगी; राजू शेट्टींनी आंदोलनाची दिशा बदलली, कृष्णा साखर कारखान्यावर आज काटा बंद आंदोलन
Tukaram Mundhe on Nana Patekar: नाना पाटेकरांनी फोनवर बोललेलं 'ते' शेवटचं वाक्य आज मनाला बोचतंय, तुकाराम मुंढे शोकसभेत सर्वांदेखत भावूक झाले
नाना पाटेकरांनी फोनवर बोललेलं 'ते' शेवटचं वाक्य आज मनाला बोचतंय, तुकाराम मुंढे शोकसभेत सर्वांदेखत भावूक झाले

व्हिडीओ

Shetitil Navdurga : Rekha Rayate | ती स्वतः परदेशात गेली नाही, पण तिच्या 40 गुंठ्यांतली द्राक्षं परदेशात पोहोचली
Sanjay Raut On Amit Shah : अमित शाह यांचे डोळे म्युझियममध्ये ठेवले पाहिजे; संजय राऊत यांची टीका
Shetitil Navdurga | Pooja Gawli | खेळाच्या मैदानातून शेतीच्या बांधावर! कॅनोइंगमध्ये पदकं जिंकली…
Shivsena Pune Election : पुणे पदवीधरची जागा भाजपला सोडल्यानं शिवसेनेत नाराजी
CJP Delhi : सीजेपीच्या दोन नेत्यांना न्यायालयीन कोठडी | Saurabh Das Ashutosh Ranka Judicial Custody

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Hingoli Crime News: माहेरी आल्याने वाद; लाकडी ठोकळ्यानं बायकोला मारलं, सासूलाही मारहाण, घटनेनंतर जावयानं गळ्याला लावला दोर
माहेरी आल्याने वाद; लाकडी ठोकळ्यानं बायकोला मारलं, सासूलाही मारहाण, घटनेनंतर जावयानं गळ्याला लावला दोर
Gokul Election: कोल्हापूरचा गोकुळ गुजरातच्या घशात घालण्याचा महायुतीचा डाव; सतेज पाटलांचा थेट आरोप, महानंदसह तीन राज्यातील दूध संघ ताब्यात घेण्याची कहाणीच सांगितली
कोल्हापूरचा गोकुळ गुजरातच्या घशात घालण्याचा महायुतीचा डाव; सतेज पाटलांचा थेट आरोप, महानंदसह तीन राज्यातील दूध संघ ताब्यात घेण्याची कहाणीच सांगितली
Nana Patekar: भाजपने नाना पाटेकरांना दिली होती लोकसभेची ऑफर, पण नाना फडणवीसांना म्हणाले, आशिष शेलारांनी काय सांगितलं?
भाजपने नाना पाटेकरांना दिली होती लोकसभेची ऑफर, पण नाना फडणवीसांना म्हणाले, आशिष शेलारांनी काय सांगितलं?
Raju Shetti: राज्यात आजपासून ऊस गळीत हंगाम सुरू अन् शेतकरी आणि कारखानदारांमद्ये संघर्षाची ठिणगी; राजू शेट्टींनी आंदोलनाची दिशा बदलली, कृष्णा साखर कारखान्यावर आज काटा बंद आंदोलन
राज्यात आजपासून ऊस गळीत हंगाम सुरू अन् शेतकरी आणि कारखानदारांमद्ये संघर्षाची ठिणगी; राजू शेट्टींनी आंदोलनाची दिशा बदलली, कृष्णा साखर कारखान्यावर आज काटा बंद आंदोलन
Nana Patekar Condolence Meet Jaywant Wadkar: नाना पाटेकरांच्या शोकसभेत जयवंत वाडकरांकडे सगळे पाहतच राहिले, खुर्चीवर न बसता जमिनीवर बसले, नेमकं काय घडलं? VIDEO
नाना पाटेकरांच्या शोकसभेत जयवंत वाडकरांकडे सगळे पाहतच राहिले, खुर्चीवर न बसता जमिनीवर बसले, नेमकं काय घडलं? VIDEO
Pune Water Cut: पुणेकरांनो पाणी जपून वापरा; शहरात आजपासून दर गुरुवारी पूर्ण पाणीकपात; ऑगस्ट 2027 पर्यंत पाणी जपण्याचे महापालिकेचे नियोजन, काय आहे पालिकेचा प्लॅन
पुणेकरांनो पाणी जपून वापरा; शहरात आजपासून दर गुरुवारी पूर्ण पाणीकपात; ऑगस्ट 2027 पर्यंत पाणी जपण्याचे महापालिकेचे नियोजन, काय आहे पालिकेचा प्लॅन
Nana Patekar Death: तुकाराम मुंढे ते वर्षा उसगांवकर; नाना पाटेकरांच्या प्रार्थना सभेत कोण कोण आलं? मराठी कलाकारांकडून आठवणींना उजाळा
तुकाराम मुंढे ते वर्षा उसगांवकर; नाना पाटेकरांच्या प्रार्थना सभेत कोण कोण आलं? मराठी कलाकारांकडून आठवणींना उजाळा
Gunaratna Sadavarte on Pradeep Purnekar case: प्रदीप पूर्णेकरांना संपवण्यात दाढीवाल्या अजगराचा हात? मी ही केस लढायला गेलो तर एकनाथ शिंदे आडवे येतील, गुणरत्न सदावर्तेंचं खळबळजनक वक्तव्य
प्रदीप पूर्णेकरांना संपवण्यात दाढीवाल्या अजगराचा हात? मी ही केस लढायला गेलो तर एकनाथ शिंदे आडवे येतील, गुणरत्न सदावर्तेंचं खळबळजनक वक्तव्य
Embed widget