एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
भारावलेल्या सचिनचं डोंजा गावात जंगी स्वागत
खासदार दत्तक ग्रामयोजनेत सचिननं डोंजा गावची निवड केली आहे.
उस्मानाबाद: मास्टर-ब्लास्टर, भारतरत्न सचिन तेंडुलकर आज दत्तक घेतलेल्या उस्मानबादच्या डोंजा गावच्या दौऱ्यावर आहे. काही वेळापूर्वी हेलिकॉप्टरनं सचिन तेंडुलकर या गावात दाखल झाला.
गावकऱ्यांनीही सचिनचं जंगी स्वागत केलं. खासदार दत्तक ग्रामयोजनेत सचिननं डोंजा गावची निवड केली आहे.
आजच्या दौऱ्यात सचिन या गावात झालेल्या विकासकामांची पाहणी करणार आहे. सचिनला पाहण्यासाठी आजूबाजूच्या परिसरातून मोठी गर्दी होण्याची शक्यता असल्यानं पोलिसांनीही चोख बंदोबस्त तैनात केला आहे.
सचिनने दत्तक घेतलेल्या आंध्रातील गावाचा कायापालट
दरम्यान, डोंजा गावाला भेट देण्यासाठी सचिनही खूप उत्सुक होता. तसा व्हिडीओ ट्विट त्याने सकाळी केला.
सचिन म्हणतो, “डोंजा गाव दत्तक घेतल्यापासून, नेहमी वाटत होतं की गावाला जावं, सर्व लोकांना भेटावं, त्यांच्याबरोबर वेळ काढावा, ती इच्छा आज पूर्ण होत आहे. फार उत्सुकता वाटतेय, आपण लवकरच भेटूया”.
https://twitter.com/sachin_rt/status/943005184300531712
पुट्टमराजू कन्ड्रिगा नंतर डोंजा दत्तक
खासदार आदर्श गाव योजनेअंतर्गत भारताचा मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने आंध्र प्रदेशमधील पुट्टमराजू कन्ड्रिगा गावाचा कायापालट केला. त्यानंतर गेल्या वर्षी सचिनने महाराष्ट्राच्या उस्मानाबाद जिल्ह्यातील डोंजा गाव दत्तक घेतलं.
ही बातमी डोंजा गावात पोहोचताच एकच जल्लोष झाला होता. हलगीच्या तालावर गुलालाची उधळण करत गावकऱ्यांनी आनंद व्यक्त केला.
VIDEO:
संबंधित बातम्या
सचिन तेंडुलकरकडून उस्मानाबादेतील डोंजा गाव दत्तक
सचिनने दत्तक घेतलेलं पहिलं गाव
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रीडा
राजकारण
राजकारण
निवडणूक
Advertisement