एक्स्प्लोर
खारेगाव टोलनाक्याचा झोल उघड, 13 पट नफा कमवूनही वसुली सुरुच
ठाणे : ठाण्यातील खारेगाव टोलनाक्यावर सुरू असलेल्या झोलझालचा पर्दाफाश झाला आहे. तब्बल तेरा पट नफा कमवून देखील आयआरबी कंपनीकडून खारेगाव टोल नाक्यावर वसुली सुरू असल्याची माहिती समोर येते आहे. आरटीआय कार्यकर्ते चंद्रहास तावडे यांनी मागवलेल्या माहितीमध्ये ही धक्कादायक बाब उघड झाली आहे.
1995 मध्ये आयरबी कंपनीला कशेळी पुलाजवळ दुहेरी पूल उभारून टोलवसुली करण्याचं कंत्राट मिळालं. चंद्रहास तावडे यांच्या माहितीनुसार आयआरबीनं या प्रकल्पासाठी 86 कोटी 31 लाख इतका खर्च केला. मात्र गेल्या 16 वर्षांत कंपनीनं तब्बल 673 कोटी इतका टोल वसूल केला.
संपूर्ण प्रकरण काय आहे?
ठाण्यातील बाळकुममार्गे जुन्या भिवंडी रस्त्यावरील जड वाहनांची वाहतूक कोंडी दुर करण्याकरीता जुन्या कशेळी पुलाजवळ अडीच किलोमीटर लांबीच्या रस्त्याचे बांधा वापरा हस्तांतरीत करा, या तत्वावर 17 कोटींचे कंत्राट 1995 रोजी आयडीयल कंपनीला देवून खारेगाव रस्त्यावरील टोलवसुलीचा परवाना देण्यात आला. 1997 ला हे काम पूर्ण झाल्यानंतर नोव्हेंबर 2005 पर्यंत टोल वसूल करण्यात येणार होता. यासंदर्भात तावडे यांनी माहितीच्या अधिकारात मिळवलेल्या माहितीमध्ये धक्कादायक बाबी उघड झाल्या.
1998 ते 2001 पर्यंत किती टोल वसुली झाली याची माहितीच शासनाकडे उपलब्ध नाही. तर जानेवारी 2001 पासून मार्च 2005 पर्यंत 61 कोटी 47 लाख 81 हजार इतका टोल वसूल केल्याचे ठेकेदाराने शासनास कळवले. या रस्त्याचे पुन्हा नूतनीकरण करण्यासाठी सप्टेंबर 1998 मध्ये दुसरा करार करून या कामाची किंमत 69 कोटी होती. हीच किंमत जून 2017 पर्यंत पथकराद्वारे वसूल करावयाची होती. याप्रमाणे प्रकल्प किंमत एकत्रित केल्यास या रस्त्याच्या बांधकामासाठी एकूण 86 कोटी 31 लाख इतका खर्च कंत्राटदाराने केला.
या दोन्ही करारानुसार एप्रिल 2005 ते सप्टेंबर 2016 पर्यंत कंत्राटदाराने टोलद्वारे 612 कोटी वसूल केले आहेत. म्हणजेच 16 वर्षात कंत्राटदाराने एकूण 673 कोटी 49 लाख इतका टोल वाहनधारकांकडून वसूल केला आहे. प्रत्यक्ष बांधकाम खर्चाच्या 13 पट नफा आयडियल कंपनीने कमावला.
आयआरबीने पथकर वसूल कराराचं उल्लंघन केल्याचा आरोप तावडे यांनी केला आहे. आयआरबीनं टोलवसुली थांबवावी यासाठी चंद्रहास तावडे यांनी मुख्यमंत्र्यांना निवेदन दिलं आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
रायगड
भारत
नाशिक
Advertisement