एक्स्प्लोर
परभणीतील मृत कोरोना योध्याला 50 लाखांची मदत; कोरोना कवच अंतर्गत मदत देण्याची पहिलीच वेळ
परभणीतील मृत कोरोना योध्याला 50 लाखांची मदत जाहीर करण्यात आली आहे. राज्यातील कोरोना कवच अंतर्गत मदत देण्याची पहिलीच वेळ आहे. उद्या स्वातंत्र्य दिनी पालकमंत्रांच्या हस्ते त्यांचे वितरण केले जाणार आहे.
परभणी : राज्यातील अनेक शासकीय विभागांचे अधिकारी, कर्मचारी कोरोना योद्धा म्हणून काम करत आहेत. त्यामुळे त्यांना विमा कवच देण्यात आले होते. ज्याद्वारे आता कर्तव्य बजावत असताना कोरोनाने मृत्यू पावलेल्या अधिकाऱ्यांना मदत मिळत आहे. राज्यातील पहिली मदत ही परभणीच्या मृत ग्रामविकास अधिकाऱ्यांच्या कुटुंबाला मिळणार आहे.
राज्य शासन आणि परभणी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी बी पृथ्वीराज यांच्या तत्परतेने मृत कोरोना योद्धा रामदास आमले यांच्या कुटुंबाला 50 लाख मंजूर झाले असून उद्या स्वातंत्र्य दिनी पालकमंत्रांच्या हस्ते त्यांचे वितरण केले जाणार आहे.
सेवा देण्यास पुढे या अन्यथा मेस्मा लावू, खासगी डॉक्टरांना ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफांचा इशारा
परभणीच्या गंगाखेड तालुक्यातील सुप्पा येथील ग्रामविकास अधिकारी रामदास आमले हे कर्तव्य बजावत असताना त्यांना कोरोना झाला आणि त्यात त्यांचा 3 ऑगस्ट रोजी मृत्यू झाला. दरम्यान, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी पृथ्वीराज बी. पी. यांनी या घटनेबाबत संबंधितांच्या कुटुंबियांना विमा कवचाची रक्कम मिळावी म्हणून बुधवारी सायंकाळीच संबंधित राष्ट्रीय ग्रामस्वराज्य अभियानाअंतर्गत राज्य प्रकल्प व्यवस्थापन कक्षाद्वारे आमले यांच्या कुटुंबियांना विमा कवच रक्कम म्हणून 50 लाख रुपयांची रक्कम मिळावी यासाठी प्रस्ताव दाखल केला होता. सचिवांबरोबर व्यक्तीशः संपर्क साधून विनंती केली होती. संबंधित खात्याच्या सचिवांनी तात्काळ कारवाई करीत गुरुवारी सायंकाळी या संबंधिता आदेश काढला. उद्या स्वातंत्र्य दिनी पालमंत्र्यांच्या हस्ते आमले यांच्या कुटुंबियांना ही मदत दिली जाणार आहे.
रभणीत महिनाभरात कोरोनाचा उद्रेक
कोरोनाचा संसर्ग सुरु झाल्यानंतर परभणी जिल्ह्यात पहिला रुग्ण आढळला तो 15 एप्रिलला. यांनतर 15 एप्रिल ते 7 जुलै मधील 84 दिवसांत जिल्ह्यात केवळ 154 रुग्ण आढळले होते व 4 जणांचा मृत्यू झाला होता. पंरतु, मागच्या 7 जुलै ते 12 ऑगस्टच्या 36 दिवसांत तब्बल 1098 रुग्ण आणि 56 जणांचा मृत्यू झालाय. त्यामुळे जिल्ह्याचा मृत्यूदर हा 5.5% पोचलाय. जो अत्यंत चिंताजनक आहे. वाढता मृत्यूदर तसेच जिल्ह्यातील आरोग्य यंत्रनेच्या ढिसाळ कारभाराच्या असंख्य तक्रारीवरून खुद्द मराठवाडा विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर 2 दिवस जिल्ह्यात थांबले. कोरोना कक्षासह आरोग्य यंत्रणेचा आढावा घेऊन त्यांनी सर्व अधिकाऱ्यांची यावरून चांगलीच खरडपट्टी काढलीय.
Corona hits inflation | स्पेशल रिपोर्ट | कोरोनामुळे सर्व सामान्यांना महागाईचा फटका
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
रायगड
महाराष्ट्र
महाराष्ट्र
Advertisement