एक्स्प्लोर

राज ठाकरे कधी पवार साहेबांच्या विरोधात बोलतात, तर कधी भाजपच्या; म्हणून त्यांचा एकच आमदार : रोहित पवार 

Rohit Pawar on Raj Thackeray : राज ठाकरे यांची भूमिका नेहमी बदलत राहिली आहे. त्यामुळेच त्यांच्याकडे एकच आमदार आहे. अशी बोचरी टीका राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते आणि आमदार रोहित पवार यांनी केलीय. 

Nagpur News नागपूर : मनसे प्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray)  हे कधी भाजपच्या बाजूने बोलतात, तर कधी त्यांच्या विरोधात बोलतात. तसेच ते कधी पवार साहेबांच्या बाजूने बोलतात तर कधी त्यांच्यावर टीका करतात. त्यांची भूमिका नेहमी बदलत राहिली आहे. त्यामुळेच त्यांच्याकडे एकच आमदार आहे. अशी बोचरी टीका राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते आणि आमदार रोहित पवार (Rohit Pawar)  यांनी केलीय. 

रोहित पवार हे आज नागपुरात (Nagpur News) असून त्यांनी आज केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेतली. माझ्या मतदारसंघातून दोन नॅंशनल हायवे जाणार आहे. याबाबत चर्चा झाली. नितीन गडकरी (Nitin Gadkari) हे नेहमी मदत करतात. विकासकामात कुठेही राजकारण न आणता ते विरोधीपक्षातील लोकांनाही  मतद करतात. मतदारसंघातील विकास कामांबाबत ही भेट घेतली असून आमच्यात सविस्तर चर्चा झाल्याची प्रतिक्रिया रोहित पवारांनी दिली. त्यावेळी ते बोलत होते. 

राज ठाकरे त्यांच्यावरची विश्वासहार्ता कुठेतरी कमी होत चालली आहे- रोहित पवार

राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्या कडे एक नाशिकची महानगरपालिका होती. मात्र नंतरच्या परिस्थितीत त्यांचं कोणीही निवडून आलं नाही, यावरूनच दिसते की त्यांच्यावरची विश्वासहार्ता कुठेतरी कमी होत चालली आहे. ते आज पवार साहेबांबद्दल बोलत आहे. काही दिवसापूर्वी ते मोदी साहेबांबद्दल बोलत होते. माझी त्यांना विनंती आहे की, भाजप एखाद्या पक्षाचा वापर दुसऱ्या पक्षाचे मत कमी किंवा विभागणी करण्यासाठी करत असतो. तुमचा तसा वापर होऊ नये. तुम्ही मराठी अस्मिता, संविधान आणि महाराष्ट्र धर्मावर विश्वास ठेवणारे नेते आहात. त्यामुळे भाजप तुमचं फक्त मत खाण्यासाठी वापर करून घेईल, ते फक्त होऊ देऊ नका एवढी माझी त्यांना विनंती असल्याचेही रोहित पवार म्हणले. 

वरुन आदेश आला नको तिथेही नाचत बसायचं

शिवसेना ठाकरे गटाचे नेते आणि आमदार आदित्य ठाकरे हे आज छत्रपती संभाजीनगरच्या दौऱ्यावर आहेत. यावेळी भाजपकडून आदित्य ठाकरेंच्या विरोधात आंदोलन करत घोषणाबाजी करण्यात आलीय. तर यावेळी भाजप आणि शिवसेनेचे कार्यकर्ते आमणे-सामने आल्याचे बघायला मिळाले. यावर बोलताना  रोहित पवार म्हणाले की, भाजप कशाचं आणि कुठे आंदोलन करते, हे पण त्यांना कळत नाही. वरुन आदेश आला की इथे नाचत बसायचं, राज्यात सामान्य कुटुंबातील महिला सुरक्षित नाही आणि हे काल्पनिक विषय काढून आंदोलन करत आहे. कोणतं तरी काल्पनिक प्रकरण काढून आणि त्यावर आंदोलन करतात, हे भाजपच्या कार्यकर्त्यांनाही कळत नाही. कुठे आंदोलन करायचं आणि कशाचं करायचं ते ही त्यांना कळत नसल्याची टीका केलीय.

हे ही वाचा 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Ind vs Eng 4th T20 : हार्दिक पांड्या OUT, 'या' 3 खेळाडूंची एन्ट्री... कर्णधार सूर्या घेणार मोठा निर्णय; चौथ्या टी-20 सामन्यात 'ही' असणार भारताची प्लेइंग-11
हार्दिक पांड्या OUT, 'या' 3 खेळाडूंची एन्ट्री... कर्णधार सूर्या घेणार मोठा निर्णय; चौथ्या टी-20 सामन्यात 'ही' असणार भारताची प्लेइंग-11
Budget  2025 :निर्मला सीतारामन 1 फेब्रुवारीला अर्थसंकल्प सादर करणार, कमोडिटी बाजार सुरु राहणार, शेअर बाजाराचं काय?
निर्मला सीतारामन 1 फेब्रुवारीला अर्थसंकल्प सादर करणार, शनिवारी कमोडिटी अन् शेअर बाजार सुरु राहणार की बंद?
Ajit Pawar in Beed: अजित पवारांनी बीडमध्ये सगळ्यांची खरडपट्टी काढली, गुन्हेगारांना इशारा; धडाकेबाज भाषणाची जोरदार चर्चा
बीडचा चार्ज हाती घेताच अजितदादांचं धडाकेबाज भाषण, गुन्हेगारांना इशारा, स्वपक्षीयांचे कान टोचले
Ambadas Danve:'जय भवानी जय शिवाजी म्हणत मतं मिळवण्याचे दिवसे गेले', अंबादास दानवेंचा शिवसैनिकांना अजब सल्ला, म्हणाले..
'जय भवानी जय शिवाजी म्हणत मतं मिळवण्याचे दिवसे गेले', अंबादास दानवेंचा शिवसैनिकांना अजब सल्ला, म्हणाले..
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

MNS Melava Raj Thackeray: राज ठाकरेंच्या उपस्थितीत मुंबईत मनसेचा मेळावा, NSCI डोम येथे आयोजनBeed Ajit Pawar : बीडमध्ये अजितदादांचा दरबार, जिल्हा नियोजन समितीची बैठकTop 70 News : टॉप 70 बातम्यांचा वेगवान आढावा : 7 AM : 30 Jan 2025 : ABP MajhaNitesh Rane : नितेश राणे म्हणतात परीक्षा केंद्रावर बरखाबंदी हवी, भाजप नेत्यांंचा मागणीला पाठिंबा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ind vs Eng 4th T20 : हार्दिक पांड्या OUT, 'या' 3 खेळाडूंची एन्ट्री... कर्णधार सूर्या घेणार मोठा निर्णय; चौथ्या टी-20 सामन्यात 'ही' असणार भारताची प्लेइंग-11
हार्दिक पांड्या OUT, 'या' 3 खेळाडूंची एन्ट्री... कर्णधार सूर्या घेणार मोठा निर्णय; चौथ्या टी-20 सामन्यात 'ही' असणार भारताची प्लेइंग-11
Budget  2025 :निर्मला सीतारामन 1 फेब्रुवारीला अर्थसंकल्प सादर करणार, कमोडिटी बाजार सुरु राहणार, शेअर बाजाराचं काय?
निर्मला सीतारामन 1 फेब्रुवारीला अर्थसंकल्प सादर करणार, शनिवारी कमोडिटी अन् शेअर बाजार सुरु राहणार की बंद?
Ajit Pawar in Beed: अजित पवारांनी बीडमध्ये सगळ्यांची खरडपट्टी काढली, गुन्हेगारांना इशारा; धडाकेबाज भाषणाची जोरदार चर्चा
बीडचा चार्ज हाती घेताच अजितदादांचं धडाकेबाज भाषण, गुन्हेगारांना इशारा, स्वपक्षीयांचे कान टोचले
Ambadas Danve:'जय भवानी जय शिवाजी म्हणत मतं मिळवण्याचे दिवसे गेले', अंबादास दानवेंचा शिवसैनिकांना अजब सल्ला, म्हणाले..
'जय भवानी जय शिवाजी म्हणत मतं मिळवण्याचे दिवसे गेले', अंबादास दानवेंचा शिवसैनिकांना अजब सल्ला, म्हणाले..
Akshay Shinde Encounter: अक्षय शिंदेच्या बोटांचे ठसे पावसात वाहून गेले, फॉरेन्सिक रिपोर्ट उघड करणाऱ्या शिंदे गटाच्या नेत्याला अक्षय शिंदेच्या वकिलांची नोटीस
शिंदे गटाच्या मंत्र्याने गोपनीय माहिती बाहेर फोडली; अक्षय शिंदेच्या वकिलांनी धाडली मंत्र्यांना नोटीस
Mutual Fund SIP : शेअर बाजारातील गुंतवणुकीनं नुकसान? 'या' म्युच्यूअल फंड SIP तून अपेक्षाभंग,कमाई ऐवजी तोटा, आता पुढं काय?   
शेअर बाजारात सातत्यानं घसरण, 'या' म्युच्यूअल फंडातील एसआयपीतून कमाई ऐवजी नुकसान, आता पुढं काय?
Dhananjay Munde : दिल्लीवारी धनंजय मुंडेंचं मंत्रिपद वाचवणार का? राजीनाम्याचा फैसला कुणाच्या कोर्टात? 
दिल्लीवारी धनंजय मुंडेंचं मंत्रिपद वाचवणार का? राजीनाम्याचा फैसला कुणाच्या कोर्टात? 
Ajit Pawar in Beed: अजित पवारांनी बीडमध्ये पाऊल ठेवताच धनुभाऊ स्वागताला पोहोचले, डीपीडीसीच्या बैठकीकडे सर्वांच्या नजरा
अजित पवारांनी बीडमध्ये पाऊल ठेवताच धनुभाऊ स्वागताला पोहोचले, डीपीडीसीच्या बैठकीकडे सर्वांच्या नजरा
Embed widget