एक्स्प्लोर
सांगली जिल्हा बँकेचे 25 लाख लुटले, कर्मचाऱ्यांच्या डोळ्यात चटणी टाकून चोरट्यांचं कृत्य
दोन दुचाकीवरुन चार चोरट्यांनी पाठलाग करुन तासगाव-विसापूर फाट्याजवळ बँक कर्मचाऱ्यांना अडवले. त्यांच्या डोळ्यात चटणी फेकली आणि त्यांच्या हातातील 25 लाख रुपये रक्कम असलेली बॅग हिसकावून घेतली.
सांगली : सांगलीतील तासगाव-विसापूर रस्त्यावर सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेतील 25 लाख रुपयांची रोकड चार चोरट्यांनी लुटली. आज (14 जून) दुपारी 12 च्या सुमारास ही घटना घडली. आश्चर्याची बाब म्हणजे बँक कर्मचारी दुचाकीवरुन 25 लाखांची रक्कम नेत होते.
सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या तासगाव शाखेहून विसापूर शाखेकडे ही रक्कम लिहिली जात असताना विसापूर फाट्याजवळ हा लुटमारीचा प्रकार घडला आहे. धक्कादायक बाब म्हणजे चोरट्यांनी बँक कर्मचाऱ्यांचा पाठलाग करुन त्यांच्या डोळ्यात चटणी टाकली. त्यानंतर त्यांना मारहाण करत रक्कम लंपास केली. या घटनेनंतर तासगाव पोलीस उपअधीक्षक अशोक बनकर आपल्या टीमसह घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी ठिकठिकाणी नाकाबंदी केली आहे. विविध भागात पोलिसांची पथके रवाना झाली आहेत. तर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे (एलसीबी) अधिकारी, कर्मचारी तासगावात दाखल झाले आहेत.
सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या विसापूर शाखेचे दोन कर्मचारी आपल्या दुचाकीवरुन सकळी तासगाव येथील बाजार समितीच्या आवारातील शाखेत पैसे नेण्यासाठी आले होते. तासगाव शाखेतून या कर्मचाऱ्यांनी 25 लाखांची रोकड घेतली. ही रोकड बॅगमध्ये घेऊन दोघेजण आपल्या दुचाकीवरुन विसापूरकडे निघाले. दरम्यान, चोरटे या दोघांच्या पाळतीवर असल्याचे बोललं जात आहे.
बँकेचे कर्मचारी तासगावातून विसापूरकडे जात असताना चोरट्यांनी दुचाकीवरुन त्यांचा पाठलाग केल्याचं समोर येत आहे. दोन दुचाकीवरुन चार चोरट्यांनी पाठलाग करुन तासगाव-विसापूर फाट्याजवळ बँक कर्मचाऱ्यांना अडवले. त्यांच्या डोळ्यात चटणी फेकली आणि त्यांच्या हातातील 25 लाख रुपये रक्कम असलेली बॅग हिसकावून घेतली. यानंतर अवघ्या काही मिनिटात चोरटे ढवळी गावाच्या दिशेने पसार झाले.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
बॉलीवूड
राजकारण
भारत
बीड
Advertisement