एक्स्प्लोर
पुण्यातली दरोडेखोरांची टोळी गजाआड, एक किलो सोने, 10 किलो चांदीसह 81 लाखांचा मुद्देमाल जप्त
घरफोड्या, जबरी चोऱ्या करणाऱ्या चार सराईत गुन्हेगार आणि एक सोनार अशा पाच जणांच्या टोळीला अटक करण्यात आली आहे. अधिक चौकशीत त्यांच्याकडून चोरीचे 50 गुन्हे उघडकीस झाले आहेत.
पुणे : घरफोड्या, जबरी चोऱ्या करणाऱ्या चार सराईत गुन्हेगार आणि एक सोनार अशा पाच जणांच्या टोळीला अटक करण्यात आली आहे. अधिक चौकशीत त्यांच्याकडून चोरीचे 50 गुन्हे उघडकीस झाले आहेत. त्यांच्याकडील 1 किलो सोन्याचे दागिने, 10 किलो चांदीचे दागिने आणि वस्तू, 3 लाख रुपये रोख, 6 चारचाकी वाहने, विदेशी बनावटीचे पिस्टल असा 81 लाख रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
उजालासिंग प्रभुसिंग टाक (27), गोरखसिंग गागासिंग टाक (29) बल्लूसिंग प्रभुसिंग टाक (वय -30), जलसिंग रजपुतसिंग दुधानी (26) आणि सोने व्यापारी सत्यनारायण देवीलाल वर्मा (43) अशी अटक केलेल्या गुन्हेगारांची नावं आहेत. या आरोपींकडे कसून चौकशी केली असता त्यांनी पुणे शहर, पुणे ग्रामीण व पिंपरी-चिंचवड परिसरात वेळोवेळी गंभीर स्वरुपाच्या घरफोडी आणि जबरी चोऱ्या केल्याचे निष्पन्न झाले आहे.
पोलीस शिपाई नासिर देशमुख, सुधीर सोनवणे, नवनाथ खताळ, महेश कांबळे हे कर्मचारी 10 ते 15 दिवसांपूर्वी घरफोडी चोरी करणाऱ्या गुन्हेगारांचा शोध घेण्यासाठी वानवडी परिसरात पेट्रोलिंग करत होते. त्यावेळी नासिर देशमुख व सुधीर सोनवणे यांना खबऱ्याकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे घरफोडी करणाऱ्या आरोपींना तपास पथकाच्या मदतीने सापळा रचून ताब्यात घेण्यात आले.
दरोडेखोरांकडे केलेल्या अधिक चौकशीत त्यांनी वानवडी, कोथरूड, दत्तवाडी, कोरेगाव पार्क, भारती विद्यापीठ, हडपसर, कोंढवा, मार्केटयार्ड, खडकी, वाकड, निगडी, भोसरी, विश्रांतवाडी, डेक्कन, लोणीकाळभोर, यवत, शिक्रापूर या पोलीस ठाण्याच्या अंतर्गत केलेले 50 गुन्हे उघडकीस झाले आहेत.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
पुणे
विश्व
छत्रपती संभाजी नगर
Advertisement