Maratha Reservation : मराठा आरक्षणासाठी कोल्हापुरात रास्ता रोको, वाहतुकीवर परिणाम
आरक्षणाच्या मागणीसाठी कोल्हापुरात मराठा समाजाच्या वतीने आज रास्ता रोको आंदोलन करम्यात आले. कोल्हापुरातील शिवाजी पुलावर मराठा कार्यकर्ते एकवटल्याचे पाहायला मिळाले.
Maratha Reservation : आरक्षणाच्या मागणीवरुन मराठा समाज पुन्हा एकदा आक्रमक झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. आरक्षणाच्या मागणीसाठी कोल्हापुरात मराठा समाजाच्या वतीने आज रास्ता रोको आंदोलन करम्यात आले. कोल्हापुरातील शिवाजी पुलावर मराठा कार्यकर्ते एकवटल्याचे पाहायला मिळाले. यावेळी मराठा समाजाच्या आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी करत रास्ता रोको आंदोलन केले. रास्ता रोको केल्यामुळे वाहतुकीवर मोठा परिणाम झाला आहे. वाहनांच्या लांबच लाबं रांगा लागल्याचे पाहायला मिळाले.
दरम्यान, खासदार संभाजीराजे छत्रपती हे आजपासून आमरण उपोषणाला बसले आहेत. मराठा समाजाला आरक्षण मिळावं आणि त्यांच्या मागण्या पूर्ण व्हाव्यात यासाठी आझाद मैदानावर संभाजीराजे उपोषण करत आहेत. 15 फेब्रुवारीला त्यांनी पत्रकार परिषद घेतली होती. त्यामध्ये त्यांनी आमरण उपोषण करणार असल्याची माहिती दिली होती. एकटे संभाजीराजे जरी उपोषणाला बसणार असले तरी संपूर्ण महाराष्ट्रातून त्यांना मोठा पाठिंबा मिळत आहे. संभाजीराजेंना पाठबळ म्हणून अनेक ग्रामपंचायत, संघटना, तालीम संस्थांमार्फत ग्रामीण, शहर, तालुका, जिल्हा पातळीवर बैठका होत आहेत. केवळ मराठा समाजच नव्हे, तर बहुजन समाजातील लोकांकडूनही मोठ्या प्रमाणात पाठबळ मिळत आहे. महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांतून याबबतची ठराव पत्रे सकल मराठा समाजाकडे पाठविली असून, ती सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रसारित केली जात आहेत.
मराठा आरक्षण आमच्या हक्काचे, जय भवानी जय शिवाजी, एक मराठा लाख मराठ अशा घोषणा यावेळी आंदोलकांनी दिल्या. दरम्यान, यावेळी काही आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात देखील घेतल्याचे पाहायला मिळाले. संभजीराजे मराठा समाजाला आरक्षण मिळावे, यासाठी आझाद मैदानावर उपोषणाला बसले आहेत. त्यांना पाठिंबा देण्यासाठी मराठा समाजाचे कार्यकर्ते बाहेर पडले आहेत.
मराठा समाजाच्या प्रमुख मागण्यांच्या अंमलबजावणीसाठी 26 फेब्रुवारीपासून आझाद मैदान येथे जरी मी एकट्याने उपोषणास बसायचा निर्णय घेतला असला तरी, महाराष्ट्रभरातून तिथे येणाऱ्या मराठा बांधवांना पोलीस प्रशासनाने कोणत्याही प्रकारचा अटकाव करू नये, ही विनंती संभाजीराजेंनी केली आहे. महारष्ट्रातील अनेक ठिकाणाहून मराठा समाजाचे कार्यकर्ते मुंबईत येण्याची शक्यता आहे.
महत्त्वाच्या बातम्या:
- Sambhaji Raje Chhatrapati Protest : मराठा आरक्षणासाठी आजपासून संभाजीराजेंचा एल्गार, मुंबईत आमरण उपोषण
- Yashwant Jadhav : 24 तास उलटले तरी यशवंत जाधव यांच्या घरी छापेमारी सुरूच, रात्रभर शिवसैनिकांची निदर्शने