एक्स्प्लोर
Advertisement
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
मुंबई-गोवा महामार्गावर भीषण अपघात, 5 जणांचा मृत्यू
मुंबई-गोवा महामार्ग लोणेरे येथे झालेल्या भीषण अपघात तब्बल पाच जणांचा मृत्यू झाला आहे.
![मुंबई-गोवा महामार्गावर भीषण अपघात, 5 जणांचा मृत्यू Road accidents on the Mumbai-Goa highway 5 people dead मुंबई-गोवा महामार्गावर भीषण अपघात, 5 जणांचा मृत्यू](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2018/03/08090727/accident-.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
रायगड : मुंबई-गोवा महामार्ग लोणेरे येथे झालेल्या भीषण अपघात तब्बल पाच जणांचा मृत्यू झाला आहे. दोन ट्रकची समोरासमोर झालेली धडक आणि त्यामुळे ट्रकला लागलेल्या भीषण आगीत काही जणांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समजते आहे.
दरम्यान, यावेळी मागून वेगात येणाऱ्या मोटरसायकल स्वारानेही ट्रकला जोरदार धडक दिली. ज्यात त्याचाही मृत्यू झाला. हा अपघात आज पहाटेच्या दरम्यान घडला.
हा अपघात एवढा भीषण होता की त्यामध्ये दोन्ही ट्रकचा अक्षरश: चक्काचूर झाला. दरम्यान अपघातानंतर महामार्गावर काही काळ वाहतूक कोंडीही झाली होती. सध्या पोलीस घटनास्थळी पोहचले असून मृतांची ओळख पटवण्याचं काम सुरु आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
क्रिकेट
क्राईम
फॅक्ट चेक
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)