एक्स्प्लोर
महसूल खात्याकडून बदलीचे अधिकार काढले, मुख्यमंत्र्यांचे निर्देश
मुंबई : महसूल खात्यातील बदल्यांचे सर्व अधिकार विभागीय आयुक्तांना देऊन मुख्य़मंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महसूल खाते सांभाळलेल्या माजी मंत्री एकनाथ खडसे यांना चपराक दिली आहे.
महसूलमंत्री या नात्याने निर्णय घेतल्यानंतर कोणत्याही प्रकारचे वाद निर्माण व्हायला नकोत, या हेतूने महसूल खात्याच्या मंत्रिस्तरावरील काही महत्त्वाच्या अधिकारांचे विकेंद्रीकरण करण्यात आले असल्याचे मुख्यमंत्री कार्यालयाकडून सांगण्यात येत आहे. पण या निर्णयामुळे महसूलमंत्र्यांचे अधिकार संपणार आहेत.
सद्यस्थितीत विविध प्रकारच्या सेवा, मुलकी सेवा, जमीन आणि जमीनविषयक कायदे आदींसह त्यांची अंमलबजावणी, यामुळे महसूल खात्याचे महत्त्व इतर खात्यांच्या तुलनेने वाढले होते.
पण आता महसूल विभागातील गट 'अ' ते गट 'ड' पदापर्यंतच्या कर्मचाऱ्यांच्या बदल्यांचे आधिकार विभागीय आयुक्त, उपजिल्हाधिकारी, तहसीलदार यांना दिल्याने महसूल मंत्र्यांचे पंख छाटले असल्याचे बोलले जात आहेत.
मुख्यमंत्र्यांच्या या निर्णयामुळे स्थानिक स्वराज्य संस्था आणि जिल्हा परिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर लोकप्रतिनीधींना आपल्या पसंतीचा महसूल अधिकारी मिळण्याच्या स्वप्नांना तडा गेला आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
बातम्या
नाशिक
महाराष्ट्र
Advertisement