Siddheshwar Yatra Solapur : सोलापूरच्या सिद्धेश्वर यात्रेवर निर्बंध, फक्त 50 लोकांना परवानगी
सोलापूरचे ग्रामदैवत सिद्धेश्वर यात्रेवर (Siddheshwar Yatra Solapur ) निर्बंध घालण्यात आले आहेत. यात्रेसाठी फक्त 50 लोकांनाच उपस्थित राहता येणार आहे. वाढत्या कोरोनामुळे (Corona) हा निर्णय घेतला आहे

सोलापूर : वाढत्या कोरोनाच्या (Corona) पार्श्वभूमीवर सोलापूरचे ग्रामदैवत श्री सिद्धेश्वर यात्रेवर (Siddheshwar Yatra Solapur ) प्रशासनाकडून निर्बंध घालण्यात आले आहेत. सिद्धेश्वराच्या यात्रेसाठी प्रशासनाकडून फक्त 50 लोकांनाच परवानगी देण्यात आली आहे.
श्री सिद्धेश्वर हे सोलापूरचे ग्रामदैवत आहे. त्याबरोबरच सोलापूर परिसरासह पंचक्रोशीतील भाविकांचे श्रध्दास्थान आहे. दरवर्षी श्री सिध्दरामेश्वरांची मोठी यात्रा सोलापुरात भरते. यंदा 12 ते 16 जानेवारीदरम्यान ही यात्रा होणार आहे. परंतु, सध्या कोरोना रूग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. त्यामुळे यात्रेवर प्रशासनाकडून निर्बंध घालण्यात आले आहेत.
गेल्या दोन वर्षांपासून कोरोनाच्या महामारीमुळे ही यात्रा प्रशासनाने घालून दिलेल्या नियमानुसार करण्यात आली. यंदाही वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने यात्रेवर निर्बंध घातले आहेत. प्रशासनाने घालून दिलेल्या नियमांचे पालन करून फक्त 50 लोकांच्या उपस्थितीत ही यात्रा पार पडणार आहे. या 50 लोकांमध्ये 15 पुजारी आणि इतर 35 लोकांचा समावेश असणार आहे. या 50 लोकांची यादी दोन दिवस आधी मंदिर समितीकडून सोलापूर प्रशासनाला सादर करावी लागणार आहे. प्रशासनाने परवानगी दिल्यानंतरच या 50 लोकांना यात्रेतील विविध विधींना हजर राहता येणार आहे. त्याबरोबरच यात्रेतील विधी करत असताना सुरक्षित आंतराचे पालन करूनच हे विधी करण्यात यावेत, असे प्रशासनाने जाहीर केलेल्या परिपत्रकात नमूद करण्यात आले आहे.
यात्रेत दरवर्षी तैलाभिषेकासाठी सात नंदीध्वजाची पायी मिरवणूक काढण्यात येते. परंतु, यंदा या मिरवणुकीला परनानगी देण्यात आली नाही. नंदीध्वज वाहनातून नेहले जाणार आहेत. त्याबरोबरच संमती कट्ट्यावरील विवाह सोहळ्याला फक्त 50 जणच उपस्थित राहतील. संमती ककट्ट्यावरील सोहळ्याला उपस्थित राहणाऱ्या 50 लोकांनी कोरोना लशीचे दोन्ही डोस घेणे गरजेचे आहे.
शोभेच्या दारूकामासह सुगडी पूजनाला परवानगी नाकारण्यात आली आहे. प्रशानाने घालून दिलेल्या नियमांचे काटेकोर पालन करूनच यात्रा पार पाडावी लागणार आहे. सोलापूर महापालिकेचे आयुक्त पी. शिवशंकर यांनी याबाबचे आदेश दिले आहेत.
महत्वाच्या बातम्या
- नवीन वर्षाच्या सुरुवातील वस्त्रोद्योगाला काहीसा दिलासा, सोलापूर चेंबर ऑफ कॉमर्सने मानले अर्थमंत्र्यांचे आभार
- आता मित्र-नातेवाईकांकडून बिनधास्त उधारी मागा..., Google Pay आणि पेटीएमचं 'Split फीचर'
- सोलापूर ड्रेनेज दुर्घटना : मृतांच्या नातेवाईकांना पालिकेकडून १० लाखांची मदत, महापौर श्रीकांचना यन्नम यांची माहिती
Before You Go
Analogue paneer Special Report : महाराष्ट्रात ॲनालॉग पनीरवर वर्षभराची बंदी, तुकाराम मुंढेंचा तडाखा
महत्त्वाच्या बातम्या






















