एक्स्प्लोर
आत्महत्या केलेल्या पत्नीच्या सरणावर उडी, कसबसं वाचवलेल्या पतीची विहिरीत उडी घेऊन आत्महत्या
चंद्रपुरात तीन महिन्यांपूर्वी लग्न झालेल्या जोडप्याचा करुण अंत झाला. गोंडपीपरी तालुक्यातील भंगाराम-तळोधी गावात पतीने पत्नीच्या सरणावर उडी घेतली. त्यातून कसंबसं बाहेर काढल्यानंतर त्याने विहिरीत उडी घेऊन आयुष्य संपवलं. या नवविवाहित दाम्पत्याने असं जीवन संपवल्याने हळहळ व्यक्त होत आहे.
चंद्रपूर : चंद्रपूर जिल्ह्यात अवघ्या तीन महिन्यांपूर्वी लग्न झालेल्या एका जोडप्याचा करुण अंत झाला. गर्भवती पत्नीने आत्महत्या केली. परंतु तिचा विरह सहन न झाल्याने पतीने तिच्या सरणावर उडी घेतली. सरणातून त्याला कसंबसं बाहेर काढलं, पण त्याने जवळच्या विहिरीत उडी घेऊन आयुष्य संपवलं. भंगाराम तळोधी गावातील या धक्कादायक घटनेने हळहळ व्यक्त होत आहे.
भंगाराम-तळोधी इथल्या रुचिता चिट्टावारचा विवाह किशोर खाटीक नावाच्या तरुणाशी 19 मार्च रोजी झाला होता. ती आपल्या पतीसह चंद्रपूरला वास्तव्यास होती. काही दिवसांपूर्वीच ती माहेरी म्हणजेच भंगाराम-तळोधी गावात आली होती. रविवारी (21 जून) संध्याकाळच्या सुमारास ती घराबाहेर पडली आणि परतलीच नाही. तिने गावलागतच्या विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली होती. ती तीन महिन्यांची गर्भवती असल्याची माहिती कुटुंबियांनी दिली. तिच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यासाठी चिता पेटली आणि या पेटत्या चितेवर तिच्या पतीने उडी घेतली.
या प्रकाराने अंत्यसंस्काराला उपस्थित लोकांमध्ये एकच खळबळ उडाली. अंत्यसंस्काराला उपस्थित असलेल्या लोकांनी धाडस करुन त्याला सरणावरुन कसंबसं बाहेर काढलं. पण तोपर्यंत तो चांगलाच भाजला होता. मात्र किशोर इथेच थांबला नाही. सरणावरून बाहेर काढताच त्याने लोकांना चुकवून जवळच असलेल्या विहिरीत उडी घेऊन आपलं जीवन संपवलं.
रुचिताने आत्महत्या का केली, हा तपासाचा विषय असतानाच तिच्या पतीनेही असं टोकाचं पाऊल उचलून एका वेगळ्या चर्चेला जन्म दिला आहे. या नवदाम्पत्याच्या अकाली आणि अनपेक्षित आत्महत्येमुळे लोकांमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे.
पत्नीच्या आत्महत्येनंतर सरणावर उडी घेत पतीनेही जीवन संपवलं; चंद्रपुरातील घटना
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
पुणे
भारत
शेत-शिवार
Advertisement