एक्स्प्लोर
भंडारा- गोंदिया फेरमतदान: आजही मतदान यंत्रात बिघाड
गोंदिया-भंडारा लोकसभा पोटनिवडणुकीत आज फेरमतदान होत आहे. 49 ठिकाणी आज पुन्हा मतदान घेतले जात आहे. 28 मे रोजी मतदानावेळी झालेल्या ईव्हीएम-व्हीव्हीपॅटच्या घोळामुळे केंद्रीय निवडणूक आयोगाने निर्णय घेतला आहे.
गोंदिया: मतदान यंत्रातील बिघाडामुळे गोंदिया-भंडारा लोकसभा पोटनिवडणुकीत आज फेरमतदान होत आहे. 49 ठिकाणी आज पुन्हा मतदान घेतले जात आहे. 28 मे रोजी मतदानावेळी झालेल्या ईव्हीएम-व्हीव्हीपॅटच्या घोळामुळे केंद्रीय निवडणूक आयोगाने निर्णय घेतला आहे.
मात्र आजही मतदान यंत्रातील बिघाडाच्या घटना घडत आहेत.
गोंदिया शहरातील माताटोली येथील मतदान केंद्र 233 वर ईव्हीएम मशीनमध्ये बिघाड झाला. बटण दाबल्यानंतर 10 मिनिटांनी मतदान होत आहे. सकाळी तास-दीडतासभर हा बिघाड होता, तो दूर करण्यात आला. मात्र मतदान यंत्रात सातत्याने होणाऱ्या बिघाडामुळे त्यावरील प्रश्नचिन्ह गडद होत आहे.
49 मतदान केंद्रावर फेरमतदान
भंडारा-गोंदियात मतदान यंत्रामध्ये बिघाड आणि घोळ झाल्याच्या आरोपानंतर आज 49 मतदान केंद्रांवर फेरमतदान होतंय.
सकाळी सातपासून मतदानाची प्रक्रिया सुरु झाली आहे. तसंच फेरमतदान होत असलेल्या क्षेत्रांमध्ये सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.
यात भंडारा विधानसभा मतदारसंघातील 14 केंद्रांवर, साकोली मतदारसंघातील 4 केंद्रांवर, अर्जुनी मोरगावमधील 2, तिरोडातील 8 आणि गोंदियातील 21 मतदान केंद्रांवर फेरमतदान होतंय.
28 मे रोजी भंडारा-गोंदियासाठी मतदान झालं, तेव्हा अनेक ठिकाणी मतदान यंत्रांमध्ये बिघाड होत असल्याचं लक्षात आलं. तसंच काही ठिकाणी मतदान उशीरा सुरु झालं. ज्यामुळे सगळी प्रक्रिया संशयाच्या भोवऱ्यात अडकली होती. त्याची तक्रारही काँग्रेसनं थेट निवडणूक आयोगाकडे केली आहे.
दरम्यान मतदानावेळी झालेल्या घोळामुळे जिल्हाधिकारी अभिमन्यू काळेंची तडकाफडकी बदली करण्यात आली आहे. त्यांच्याजागी कादंबरी बलकवडेंची नेमणूक कऱण्यात आली आहे.
भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघात फेरमतदान होणार आहे :
61-भंडारा विधानसभा- 302- अडयाळ, 320नवेगाव, 318-उमरी, 335-पिंपळगाव, 403-पवनी, 405-पवनी, 374-खैरी दिवाण, 314-पिलांद्री, 317-केसलवाडा,322-पाथरी पुर्नवसन, 362-लोणारा, 363-लोणारा, 428-वलनी, 429-वलनी एकूण 14 केंद्र.
62- साकोली विधानसभा-306-पारडी, 316-मुरमाडी, 292-तई बु., 287- घोडेझरी एकूण 4 केंद्र. 63-अर्जुनी मोर विधानसभा-108-बोथली, 159-मानेरी एकूण 2 केंद्र. 64-तिरोडा विधानसभा- 45-अत्री, 97-दवनीवाडा, 102-पिपरटोला, 108-विहीरगाव, 205- भजेपार, 215-पिंडकेपार, 38-मुरदाळा, 52-पालडोंगरी एकूण 8 केंद्र. 65-गोंदिया विधानसभा- 50-सोनपूरी, 78-चारगाव, 94-रतनारा, 115-कामठा, 116-कामठा, 117-कामठा, 123-लांबटोला, 169-गोंदिया, 176A-गोंदिया, 194-गोंदिया, 200-गोंदिया, 206-गोंदिया, 218-गोंदिया, 225-गोंदिया, 233-गोंदिया,240-गोंदिया, 250-गोंदिया, 253-गोंदिया, 271-गोंदिया, 276-गोंदिया, 303 A- फुलचुर एकूण 21 केंद्र असे एकूण 49 मतदान केंद्रावर फेरमतदान होणार आहे.
पटोलेंच्या राजीनाम्यामुळे पोटनिवडणूक
पूर्वाश्रमीचे भाजपचे आणि आता काँग्रेसमध्ये असलेल्या नाना पटोले यांनी आपल्या खासदारकीचा राजीनामा दिल्यानंतर, गोंदिया-भंडारा लोकसभा मतदारसंघात पोटनिवडणूक घेण्यात आली. या मतदारसंघात 28 मे रोजी मतदान पार पडले.
रिंगणातील उमेदवार
राष्ट्रवादी आणि काँग्रेस या ठिकाणी एकत्र लढत असून राष्ट्रवादीचे मधुकर कुकडे हे उमेदवार आहेत. तर भाजपकडून हेमंत पटले मैदानात आहेत.
भाजपचे हेमंत पटले हे माजी आमदार आहेत, तर राष्ट्रवादीचे मधुकर कुकडे हे तीन वेळा आमदार राहिले आहेत. एकूण 18 उमेदवार रिंगणात असले तरी मुख्य लढत भाजप आणि राष्ट्रवादी-काँग्रेस आघाडीमध्ये आहे.
राष्ट्रवादी आणि काँग्रेस यांनी आघाडी केली असली, तरी ही जागा काँग्रेसला जाईल आणि नाना पटोले उभे राहतील, अशी धारणा होती. मात्र राष्ट्रवादीने जागा सोडली नाही आणि प्रफुल्ल पटेल स्वतःही उभे राहिले नाहीत. मात्र दोघांनी अत्यंत जुनं वैर मिटवलं. दोघांनीही राष्ट्रवादीच्या मधुकर कुकडे यांच्यासाठी प्रचार केला.
राष्ट्रवादीकडून जयंत पाटील, अजित पवार, धनंजय मुंडे येऊन गेले, तर भाजपकडून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी भरपूर जोर लावला आहे.
भंडारा गोंदिया लोकसभा मतदारसंघात सात विधानसभा क्षेत्र असून त्यापैकी सहा भाजप, तर एक काँग्रेसकडे आहे.
संबंधित बातम्या
गोंदिया-भंडाऱ्यात 49 ठिकाणी फेरमतदान
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
कोल्हापूर
महाराष्ट्र
विश्व
व्यापार-उद्योग
Advertisement