एक्स्प्लोर
मतदार यादीत नाव नोंदणीसाठी 14 ऑक्टोबरपर्यंत मुदत
मुंबई : राज्यातील आगामी निवडणूकांच्या पार्श्वभूमीवर राज्य निवडणूक आयोगाने मतदार यादीत नावे नोंदवण्याची अंतिम तारीख जाहीर केली आहे. 14 ऑक्टोबरपर्यंत मतदार यादीत नागरिकांना नाव नोंदवता येणार आहे.
ज्या नागरिकांची नावं मतदार यादीत नाहीत, तसंच ज्यांना आपल्या नावात दुरुस्ती करायची आहे, अशा सर्वांसाठी यावर्षीची ही शेवटची संधी असेल. 1 जानेवारी 2017 किंवा त्यापूर्वी वयाची 18 वर्षे पूर्ण केलेल्या नवीन तरुण मतदारांनाही या मतदार यादीत नाव नोंदवता येणार आहे. राज्यभरातील 15 महानगरपालिका, 26 जिल्हा परिषद आणि 296 पंचायत समित्यांच्या आगामी सार्वत्रिक निवडणुकांसाठी मतदान करण्यासाठी मतदार यादीत नावे नोंदवता येणार आहेत.
राज्य निवडणूक आयोगाकडून दरवर्षी ही मोहिम राबवली जाते. यावर्षी नव्याने मतदार होणाऱ्या नागरिकांसाठी 14 ऑक्टोबर ही शेवटची संधी असेल. तसंच स्थलांतर झालेल्या, मयत झालेल्या मतदारांची नावे यादीतून वगळण्याची संधीही नागरिकांना मिळणार आहे. या संधीचा फायदा घेत दिलेल्या मुदतीत नाव नोंदणी करण्याचं आवाहन राज्य निवडणूक आयोगाकडून करण्यात आलं आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
राजकारण
अहमदनगर
क्रीडा
Advertisement