एक्स्प्लोर
कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिरात पुजारी पदासाठी भरती; तब्बल 252 जणांचे अर्ज
साडे तीन शक्तिपीठापैकी एक असणाऱ्या कोल्हापूरच्या आंबाबाई मंदिरात पगारी पुजाऱ्यांची भरती केली जाणार आहे. त्यासाठी वृत्तपत्रांमध्ये जाहिरातही प्रसिद्ध करण्यात आली होती. त्यास राज्यभरातून जोरदार प्रतिसाद मिळाला आहे.

कोल्हापूर : साडे तीन शक्तिपीठापैकी एक असणाऱ्या कोल्हापूरच्या आंबाबाई मंदिरात पगारी पुजाऱ्यांची भरती केली जाणार आहे. त्यासाठी वृत्तपत्रांमध्ये जाहिरातही प्रसिद्ध करण्यात आली होती. त्यास राज्यभरातून जोरदार प्रतिसाद मिळाला आहे. गेल्या काही दिवसांमध्ये पगारी पुजारी या पदासाठी 252 अर्ज देवस्थान समिती कडे प्राप्त झाले आहेत. या अर्जामध्ये पुजारी आणि सेवेकरी अशा दोन वर्गामध्ये नेमणूक करण्यात येणार आहेत. गेल्या कित्येक दिवसांपासून अंबाबाई मंदिर कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत आहे. मूर्ती बदलण्यासंदर्भात असो किंवा अंबाबाई मंदिरातील पुजारी असो. काही दिवसापूर्वी एका पुजाऱ्याने आंबाबाईला घागरा चोली नेसवून वाद निर्माण केला होता. त्याप्रकरणानंतर अंबाबाई मंदिरातील पुजारी हे कळीचा आणि वादग्रस्त मुद्दा ठरले होते. त्यासाठी एक उपाय म्हणून पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीने पगारी पुजारी नेमण्याचा निर्णय घेतला होता. पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीने त्या प्रक्रियेला स्थगिती दिली होती. परंतु काही दिवसांपूर्वी विधी व न्याय विभागाने जाहिरातीद्वारे पगारी पुजारी नेमण्याची प्रक्रिया चालू करा, असे आदेश पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीला दिले. न्याय विभागाच्या आदेशानंतर पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीने वृत्तपत्रांमधून पगारी पुजाऱ्यांसाठी जाहिरात प्रसिद्ध करून त्याची अंतिम मुदत 12 फेब्रुवारी अशी दिली होती. मंगळवारी ती मुदत संपली. मंगळवारपर्यंत पगारी पुजारी पदासाठी 252 अर्ज देवस्थान समितीकडे प्राप्त झाले आहेत. या अर्जामध्ये पुजारी आणि सेवेकरी अशा दोन वर्गामध्ये नेमणूक करण्यात येणार आहेत. 15 ते 20 फेब्रुवारीदरम्यान अर्जदारांच्या मुलाखती घेतल्या जाणार आहेत. या मुलाखतींमध्ये अर्जदारांकडून अंबाबाईबद्दलची माहिती, पूजा-अर्चा, मंत्रोच्चार आणि अंबाबाईला साडी नेसवायला येते का? हे पाहिले जाणार आहे.
अंबाबाई मंदिरात एकूण 50 पुजारी आणि सेवेकरी गरजेचे आहेत. परंतु पुजारी आणि सेवेकरी या पदांसाठी देवस्थान समितीकडे 252 अर्ज प्राप्त झाले आहेत. त्यामधून देवस्थान समिती 50 पुजारी आणि 50 सेवेकरी अशी एकूण 100 जणांची करणार आहे. देवस्थान समिती मुलाखती घेत असताना त्यामध्ये त्यांनी कोणत्याही जातीचे बंधन ठेवलेले नाही. हिंदूंमधील सर्व जातींच्या लोकांनी अर्ज करून मुलाखती द्याव्यात, असे आवाहन पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीतर्फे करण्यात आले आहे. महेश जाधव, अध्यक्ष, पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समिती
आणखी वाचा
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
निवडणूक
निवडणूक
निवडणूक























