एक्स्प्लोर
आरबीआयचा आता 500, 100 च्या नोटा छापण्यावर भर!
मुंबई : नोटाबंदीनंतर फक्त 2000 रुपयांच्या नोटा जास्त प्रमाणात छापल्यानंतर बाजारात सुट्ट्या पैशांचा मोठा चलन तुटवडा निर्माण झाला. त्यामुळे आरबीआयने आता हा चलनकल्लोळ लक्षात घेत 500 आणि त्यापेक्षा कमी मुल्यांच्या नोटा छापण्याचं काम सुरु केलं आहे.
माहिती अधिकार कार्यकर्ते अनिल गलगली यांनी भारतीय रिजर्व बँकेकडे नवीन चलनाबाबत सोबत जुन्या चलनाची विविध माहिती मागितली होती. यापूर्वी जुने चलन आणि नवीन चलन 2000 च्या मुद्रणाची माहिती दिली होती.
सध्या भारत प्रतिभूती मुद्रण आणि मुद्रा निर्माण निगम लिमिटेडने एसपीएमसीआईएलच्या अंतर्गत असलेल्या प्रेस मध्ये 500 च्या नोटा आणि त्यापेक्षा कमी मूल्याच्या नोटांचे मुद्रण केले गेले आहे. 500 च्या नवीन नोटांच्या छापण्यासाठी लागणाऱ्या खर्चावर अंदाजे खर्च अजून निश्चित केला गेला नाही, अशी माहिती आरबीआयने दिली.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
नाशिक
क्राईम
राजकारण
Advertisement