एक्स्प्लोर

आरबीआयने मलकापूर अर्बन को-ऑपरेटिव्ह बॅंकेवरील निर्बंध तीन महिने वाढवले, 24 नोव्हेंबरपर्यंत आर्थिक स्थिती सुधारण्याचे बॅंकेला निर्देश

Malkapur Bank : बॅंकेला आपली आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी वेळोवेळी वेळ देण्यात येत आहे. 24 नोव्हेंबरपर्यंत पुन्हा एकदा आर्थिक स्थिती सुधारण्याचे बॅंकेला निर्देश देण्यात आले आहे. 

मुंबई : आरबीआयकडून (RBI) मलकापूर अर्बन को-ऑपरेटिव्ह बॅंकेच्या (malkapur urban cooperative bank) व्यवहारावरील निर्बंध आणखी तीन महिने वाढवले आहेत. आरबीआयनं आपल्या अखत्यारीत येणाऱ्या कलम 35 अ च्या अंतर्गत येणाऱ्या अधिकारांचा वापर करत बॅंकेला आर्थिक स्थिती सुधारण्यास सांगितले. मात्र आर्थिक स्थिती न स्थिरावल्यानं बॅंकिंग रेग्युलेशन ॲक्ट 1949 च्या कलम 56 अंतर्गत 24 नोव्हेंबर 2021 पासून बॅंकेचा व्यवसाय बंद आहे.  बॅंकेला आपली आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी वेळोवेळी वेळ देण्यात येत आहे, ज्यात पुन्हा तीन महिन्यांचा कालावधी देण्यात आला आहे. 24 नोव्हेंबरपर्यंत पुन्हा एकदा आर्थिक स्थिती सुधारण्याचे बॅंकेला निर्देश देण्यात आले आहे. 

दरम्यान, बॅंकेवर निर्बंध जरी असले तरी बॅंकेचा परवाना रद्द करण्यात आलेला नाही. त्यामुळे निर्बंधांसोबत बॅंक व्यवहार करु शकते. मात्र ज्यात ठेवी काढणे किंवा स्विकारण्यावर बॅंकेला मर्यादा आहे

24 नोव्हेंबर 2021 रोजी काय होते बॅंकेवर निर्बंध? 

बॅंकेची आर्थिक स्थिती खराब होत असल्याने ग्राहकांना खात्यातून दहा हजारांहून अधिकची रक्कम काढण्यास मनाई करण्यात आली आहे. सेव्हिंग आणि करन्ट खात्यांसाठी निर्णय लागू करण्यात आला आहे. रिझर्व बॅंकेकडून पुढील सहा महिन्यांपर्यंत निर्बंध घालण्यात आल.  मे महिन्यात पुन्हा ऑगस्टपर्यंत निर्बंध वाढवले होते. आरबीआयच्या पूर्व मंजुरीशिवाय बॅंक कोणतेही लोन रिन्यू करणार नाही.  कोणतीही गुंतवणूक नाही करणार, कोणाकडूनही उधार घेणे किंवा नवीन ठेवी स्विकारणार नाही, कोणतीही मालमत्ता विकण्यासही निर्बंध घालण्यात आले आहे.  

बॅंकेच्या व्यवहारांवर निर्बंध नाही किंवा बॅंकेचे लायसन्स रद्द केले असे देखील नाही. मात्र बॅंकेने आपली आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी प्रयत्न करावेत असे आरबीआयने स्पष्ट निर्देश दिले आहेत. या अगोदर  देखील बॅंकेला केवायसी संदर्भात दोन लाखांचा दंड ठोठावण्यात आला आहे. मलकापूर अर्बन को-आॅपरेटिव्ह बॅंक ही एक हजार कोटी रुपयांची ठेवी असणारी बॅंक आहे. भाजपचे चैनसुख संचेती बॅंकेच्या अध्यक्षपदी आहेत. पुणे, औरंगाबाद, नागपूर, वर्धा, अकोला, जळगाव, भुसावळ, मेहकर, चिखली, भोकरदन, सिल्लोड, मुर्तिजापूर अशा अनेक ठिकाणी बॅंकेचं प्रस्थ आहे.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Chhagan Bhujbal : बीडचं पालकत्व अजितदादांकडे, भुजबळांची तीन शब्दात प्रतिक्रिया; पक्षांतर्गत बदलांवरही ठेवलं बोट 
बीडचं पालकत्व अजितदादांकडे, भुजबळांची तीन शब्दात प्रतिक्रिया; पक्षांतर्गत बदलांवरही ठेवलं बोट 
Gulabrao Patil : दादा भुसे, भरत गोगावलेंचा पालकमंत्रिपदावरून पत्ता कट; मंत्री गुलाबराव पाटील कडाडले, म्हणाले...
दादा भुसे, भरत गोगावलेंचा पालकमंत्रिपदावरून पत्ता कट; मंत्री गुलाबराव पाटील कडाडले, म्हणाले...
Dhananjay Munde : ...तर धनंजय मुंडेंना बीडच्या पालकमंत्रिपदाची जबाबदारी देता येईल; राष्ट्रवादीतील बड्या नेत्याच्या वक्तव्यानं भुवया उंचावल्या
...तर धनंजय मुंडेंना बीडच्या पालकमंत्रिपदाची जबाबदारी देता येईल; राष्ट्रवादीतील बड्या नेत्याच्या वक्तव्यानं भुवया उंचावल्या
गोदामातील साखरेची परस्पर विक्री; माजी आमदारासह 23 जणांवर जिल्हा बँकेची फसवणूक केल्याचा गुन्हा दाखल, सोलापुरात खळबळ
गोदामातील साखरेची परस्पर विक्री; माजी आमदारासह 23 जणांवर जिल्हा बँकेची फसवणूक केल्याचा गुन्हा दाखल, सोलापुरात खळबळ
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Bharat Gogawale : रायगड पालकमंत्री पदाबाबतचा निकाल न पटणारा,भरत गोगावलेंची प्रतिक्रियाABP Majha Marathi News Headlines 11 AM TOP Headlines 11 AM 19 January 2024Dhananajay Munde Shirdi : शिर्डीमध्ये अजित पवार आणि धनंजय मुंडे एकाच हॉटेलमध्ये मुक्कामीSaif Ali Khan Accused : वांद्रे ते ठाणे व्हाया दादर, हल्ल्यानंतर आरोपी कुठे कुठे गेला?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Chhagan Bhujbal : बीडचं पालकत्व अजितदादांकडे, भुजबळांची तीन शब्दात प्रतिक्रिया; पक्षांतर्गत बदलांवरही ठेवलं बोट 
बीडचं पालकत्व अजितदादांकडे, भुजबळांची तीन शब्दात प्रतिक्रिया; पक्षांतर्गत बदलांवरही ठेवलं बोट 
Gulabrao Patil : दादा भुसे, भरत गोगावलेंचा पालकमंत्रिपदावरून पत्ता कट; मंत्री गुलाबराव पाटील कडाडले, म्हणाले...
दादा भुसे, भरत गोगावलेंचा पालकमंत्रिपदावरून पत्ता कट; मंत्री गुलाबराव पाटील कडाडले, म्हणाले...
Dhananjay Munde : ...तर धनंजय मुंडेंना बीडच्या पालकमंत्रिपदाची जबाबदारी देता येईल; राष्ट्रवादीतील बड्या नेत्याच्या वक्तव्यानं भुवया उंचावल्या
...तर धनंजय मुंडेंना बीडच्या पालकमंत्रिपदाची जबाबदारी देता येईल; राष्ट्रवादीतील बड्या नेत्याच्या वक्तव्यानं भुवया उंचावल्या
गोदामातील साखरेची परस्पर विक्री; माजी आमदारासह 23 जणांवर जिल्हा बँकेची फसवणूक केल्याचा गुन्हा दाखल, सोलापुरात खळबळ
गोदामातील साखरेची परस्पर विक्री; माजी आमदारासह 23 जणांवर जिल्हा बँकेची फसवणूक केल्याचा गुन्हा दाखल, सोलापुरात खळबळ
Hasan Mushrif : ना कोल्हापूर, ना सांगली, मुश्रीफांच्या गळ्यात थेट वाशिमचे पालकत्व! श्रद्धी, सबुरी अन् आता इलाज नाही म्हणत मुश्रीफ पालकमंत्रीपदावर म्हणाले तरी काय?
ना कोल्हापूर, ना सांगली, मुश्रीफांच्या गळ्यात थेट वाशिमचे पालकत्व! श्रद्धी, सबुरी अन् आता इलाज नाही म्हणत मुश्रीफ पालकमंत्रीपदावर म्हणाले तरी काय?
Saif Ali Khan Attack: मुंबई पोलिसांनी सुतावरुन स्वर्ग गाठला! बाईकच्या नंबर प्लेटवरुन सैफ अली खानच्या हल्लेखोराला शोधलं
सीसीटीव्ही फुटेजमधील 'त्या' बाईकवरचा चेहरा पाहताच मुंबई पोलिसांची ट्युब पेटली अन् चक्रं फिरली
Raigad Guardian Minister : भरत गोगावलेंना मंत्रिपदाचा कोट मिळाला पण पालकमंत्रीपदाचा मुकूट दूर राहिला; रायगडमध्ये अदिती तटकरेंसोबतचा वाद वाढणार?
भरत गोगावलेंना मंत्रिपदाचा कोट मिळाला पण पालकमंत्रीपदाचा मुकूट दूर राहिला; रायगडमध्ये अदिती तटकरेंसोबतचा वाद वाढणार?
तो 17 वर्षांचा, ती 16 वर्षांची, इन्स्टावरून ओळख अन् लैंगिक संबंध; गरोदर होताच मुंबईतून गोळ्या पाठवल्या, गर्भपात करून अर्भक नाल्यात फेकले
तो 17 वर्षांचा, ती 16 वर्षांची, इन्स्टावरून ओळख अन् लैंगिक संबंध; गरोदर होताच मुंबईतून गोळ्या पाठवल्या, गर्भपात करून अर्भक नाल्यात फेकले
Embed widget