एक्स्प्लोर

भाजपचा ‘स्वाभिमानी’शी घटस्फोट, सेनेशी लग्न, अन् राणेंशी लफडं : तुपकर

सदाभाऊ खोत यांच्या जाण्यानंतर स्वाभिमानाला हवा असलेला गावरान चेहरा आपणच असल्याचे तुपकरांनी या मेळाव्यात दाखवून देत, शब्दा-शब्दाला उपस्थितांची हशा आणि टाळ्या मिळविल्या.

पंढरपूर : भाजपपासून दूर गेलेल्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून आता मोदी आणि फडणवीस सरकारवर टोकाच्या शेरेबाजीला सुरुवात झाली आहे. पंढरपूर तालुक्यातील उपरी येथे झालेल्या शेतकरी मेळाव्यात खासदार राजू शेट्टी यांच्या उपस्थितीत रविकांत तुपकर यांनी आज भाजपवर तुफानी टोलेबाजी केली. सदाभाऊ खोत हे पक्षातून गेल्यानंतर स्वाभिमानीला हवा असलेला गावरान चेहरा आपणच असल्याचे तुपकरांनी या मेळाव्यात दाखवून देत, शब्दा-शब्दाला उपस्थितांची हशा आणि टाळ्या मिळविल्या. “भाजपला सत्तराव्या वर्षी लेकरु झालाय, तेही आमच्यामुळे. त्यामुळे त्याचा थाट वेगळा असणारच. लगीन जमवताना कै गोपीनाथराव मुंडे आणि श्री श्री रविशंकर यांच्या उपस्थितीत मोदींनी भरभरुन आश्वासने दिली. पण काहीच झाले नाही. पण आमच्याशी लगीन करून आम्हालाच हात लावू देत नव्हती ही कमलाबाई. सुरुवातीला वाटतेय लाजतीय, पण नंतर तिचे रंग समजू लागल्यावर आम्ही घटस्फोट घेतला. आता हिचे लगीन शिवसेनेसोबत आहे आणि लफडं नारायण राणे सोबत सुरु आहे.”, अशा शब्दात तुपकर यांनी केंद्र आणि राज्यातील भाजप सरकारला लक्ष केले. यानंतर बोलताना खासदार राजू शेट्टी यांनी साखरेच्या पडलेल्या भावाबाबत केंद्र सरकारला जबाबदार धरत, जबाबदार असणाऱ्यांची चौकशी करून तातडीने कारवाई करण्याची मागणी केली. “वास्तविक यावर्षी गरजे एवढेच साखरेचे उत्पादन झाले असून गेल्यावर्षीच साठा देखील शिल्लक नसताना साखरेचे दार पडण्यामागे काही बडे व्यापारी आणि साखर कारखानदार आहेत.”, असा शेट्टी यांनी आरोप केला. गेल्या काही दिवसात जादा साखर खरेदी केलेले व्यापारी आणि जादा साखर विकलेल्या कारखानदारांची चौकशी केल्यास हा घोटाळा उघड होईल, असेही शेट्टी म्हणाले. त्याचवेळी, फायद्यात 70-30 च्या नियमानुसार शेतकऱ्यांना फायदा द्यावा लागू नये यासाठी कारखानदार असले उद्योग करीत असतील तर त्यांच्या नरडीवर पाय देऊन शेतकऱ्यांचा हिस्सा मिळवू, असा इशाराही यावेळी राजू शेट्टी यांनी दिला.

महत्त्वाच्या बातम्या

पुढाऱ्यांनी 60 वर्षानंतर थांबायला हवं, राजीनामा द्यायला हवा; इंदुरीकर महाराजांकडून नेतेमंडळींना 'निवृत्ती'चा सल्ला
पुढाऱ्यांनी 60 वर्षानंतर थांबायला हवं, राजीनामा द्यायला हवा; इंदुरीकर महाराजांकडून नेतेमंडळींना 'निवृत्ती'चा सल्ला
मंगेश चिवटेंसाठी रामराजेंची बॅटींग, म्हणाले, तुम्ही काळजी करू नका; संजीवराजेंचाही भाजपला इशारा, आता माघार नाही
मंगेश चिवटेंसाठी रामराजेंची बॅटींग, म्हणाले, तुम्ही काळजी करू नका; संजीवराजेंचाही भाजपला इशारा, आता माघार नाही
मुंबईकरांनो घाबरु नका, 2 दिवस सायरनचा आवाज येणार; महापालिकेकडून नागरिकांना आवाहन, प्रोटोटाइप चाचणी
मुंबईकरांनो घाबरु नका, 2 दिवस सायरनचा आवाज येणार; महापालिकेकडून नागरिकांना आवाहन, प्रोटोटाइप चाचणी
याद रखना, हिसाब होगा! राहुल गांधींचा आवाज दाबता येणार नाही, संघर्ष आणखी तीव्र होणार, हर्षवर्धन सपकाळ आक्रमक 
याद रखना, हिसाब होगा! राहुल गांधींचा आवाज दाबता येणार नाही, संघर्ष आणखी तीव्र होणार, हर्षवर्धन सपकाळ आक्रमक 

व्हिडीओ

Rahul Gandhi Protest : राहुल गांधी, प्रियांका गांधी पोलिसांच्या ताब्यात UNCUT VIDEO
Rahul Gandhi : ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी दिल्लीत हायहोल्टेज ड्रामा, पोलिसांनी राहुल गांधींना पुन्हा उचललं
Sunetra Pawar : दादा खूप मोठ्या मनाचे होते,मी नाही; सुनेत्रा पवारांचा बंडखोरांना इशारा
Navnath Ban PC : रोहित पवारांवर गंभीर आरोप, नवनाथ बन यांची स्फोटक पत्रकार परिषद : ABP Majha
Rohini Khadse MPSC Protest Pune: काळ्याकुट्ट भुवया घेऊन..अगं बाई तू ये..रोहिणी खडसेंनी तोफ डागली, VIDEO

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rahul Gandhi : ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी आक्रमक, पोलिसांनी राहुल गांधींना पुन्हा उचललं
Rahul Gandhi : ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी आक्रमक, पोलिसांनी राहुल गांधींना पुन्हा उचललं
पुढाऱ्यांनी 60 वर्षानंतर थांबायला हवं, राजीनामा द्यायला हवा; इंदुरीकर महाराजांकडून नेतेमंडळींना 'निवृत्ती'चा सल्ला
पुढाऱ्यांनी 60 वर्षानंतर थांबायला हवं, राजीनामा द्यायला हवा; इंदुरीकर महाराजांकडून नेतेमंडळींना 'निवृत्ती'चा सल्ला
मंगेश चिवटेंसाठी रामराजेंची बॅटींग, म्हणाले, तुम्ही काळजी करू नका; संजीवराजेंचाही भाजपला इशारा, आता माघार नाही
मंगेश चिवटेंसाठी रामराजेंची बॅटींग, म्हणाले, तुम्ही काळजी करू नका; संजीवराजेंचाही भाजपला इशारा, आता माघार नाही
मुंबईकरांनो घाबरु नका, 2 दिवस सायरनचा आवाज येणार; महापालिकेकडून नागरिकांना आवाहन, प्रोटोटाइप चाचणी
मुंबईकरांनो घाबरु नका, 2 दिवस सायरनचा आवाज येणार; महापालिकेकडून नागरिकांना आवाहन, प्रोटोटाइप चाचणी
Jayant Patil: पंढरपूरमध्ये शक्तिपीठ महामार्गासाठी पोलिस बंदोबस्तात जबरदस्तीने मोजणी, सरकारमध्ये बसलेल्यांना किंमत मोजावी लागेल; जयंत पाटलांचा इशारा
पंढरपूरमध्ये शक्तिपीठ महामार्गासाठी पोलिस बंदोबस्तात जबरदस्तीने मोजणी, सरकारमध्ये बसलेल्यांना किंमत मोजावी लागेल; जयंत पाटलांचा इशारा
दुष्काळामुळे भीषण परिस्थिती; धरणातील पाण्याच्या रक्षणासाठी खाकी, धामणा धरणावर पोलीस बंदोबस्त
दुष्काळामुळे भीषण परिस्थिती; धरणातील पाण्याच्या रक्षणासाठी खाकी, धामणा धरणावर पोलीस बंदोबस्त
Pune Police: पुणे पोलीस दलातील पोलिस उपनिरीक्षकाने राहत्या घरी डोक्यात गोळी झाडून आयुष्याचा शेवट कला
पुणे पोलीस दलातील पोलिस उपनिरीक्षकाने राहत्या घरी डोक्यात गोळी झाडून आयुष्याचा शेवट कला
नवनाथ बन यांच्याकडून चारित्र्यहननचा प्रयत्न,व्हिडिओतील तरुणी माध्यमांसमोर; म्हणाली, शिवराज माझ्या भावासारखा
नवनाथ बन यांच्याकडून चारित्र्यहननचा प्रयत्न,व्हिडिओतील तरुणी माध्यमांसमोर; म्हणाली, शिवराज माझ्या भावासारखा
Embed widget