एक्स्प्लोर
ऊर्जामंत्र्यांच्या व्हॉट्सअॅप ग्रुपवर अश्लील फोटो, अधिकारी निलंबित
चक्क ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी तयार केलेल्या व्हॉट्सअॅपग्रुपवर अश्लील पोस्ट केल्यानं एका मुख्य अभियंत्याला निलंबित करण्यात आलं आहे.
रत्नागिरी: चक्क ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी तयार केलेल्या व्हॉट्सअॅपग्रुपवर अश्लील फोटो पोस्ट केल्यानं एका मुख्य अभियंत्याला निलंबित करण्यात आलं आहे. व्ही.एस खोकले असं या अधिकाऱ्याचं नाव असून ते रत्नागिरीतल्या पोफळी इथल्या जल विद्युत केंद्रात काम करतात.
ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी एनर्जी मिनिस्टर लाईव्ह नावाचा व्हॉट्सअॅप ग्रुप तयार केला आहे. त्यात राज्यातले वरिष्ठ अधिकारीही आहेत. याच ग्रुपवर खोकले यांनी अश्लिल फोटो पोस्ट केला होता. त्यामुळं त्यांना निलंबित करण्यात आलं.
निलंबनाचे आदेश काढण्यात आले असून, त्यांची बाजू ऐकून घेऊन पुढील कारवाई करण्यात येईल, असं सांगण्यात येत आहे.
'एनर्जी मिनिस्टर लाईव्ह' या ग्रुपवर खोकले यांनी 14 जुलैला रात्री एक अश्लील फोटो पोस्ट केला. मात्र हे वर्तन
सेवानियम क्र. 86-3 अनुसुची ग व सेवानियम 88 क नुसार गैरकृत्यात मोडतात, असं सांगून त्यांच्यावर तात्काळ शनिवारी निलंबनाचे आदेश बजावण्यात आले.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
कोल्हापूर
महाराष्ट्र
विश्व
व्यापार-उद्योग
Advertisement