Ratan Tata Pet Dog: रतन टाटांना अखेरचा निरोप द्यायला सर्व मित्र आले; लाडका 'गोवा'ला पाहताच अनेकांचे डोळे पाणावले
Ratan Tata Pet Dog: रतन टाटा यांना देशभरातून श्रद्धांजली वाहण्यात येत आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली टाटा समूहाने अनेक क्षेत्रात अभूतपूर्व प्रगती केली. त्यांच्या निधनाने इंडस्ट्रीतील एका युगाचा अंत झाला आहे.
Ratan Tata Pet Dog: भारतातील आघाडीच्या उद्योगपतींपैकी एक आणि टाटा सन्सचे अध्यक्ष रतन टाटा यांचे वयाच्या काल (बुधवारी) ८६ व्या वर्षी निधन झाले. त्यांच्या निधनाच्या बातमीने देशभरात शोककळा पसरली आहे. आता त्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी जनसागर लोटला आहे. यावेळी त्याच्या खास श्वानांनी देखील त्यांना श्रद्धांजली वाहिली.'पद्मविभूषण' पुरस्काराने सन्मानित 86 वर्षीय टाटा यांचे बुधवारी रात्री 11.30 वाजता मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात निधन झाले. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यावर उपचार सुरू होते.
रतन टाटा यांच्या निधनानंतर त्यांच्या लाडक्या 'गोवा'नेही त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली आहे. 'गोवा' नावाचा हा श्वान रतन टाटांच्या अगदी जवळचा होता. टाटांना तो काही वर्षांपूर्वी गोवा राज्यात सापडला होता, त्यानंतर त्याचे नाव 'गोवा' ठेवण्यात आले होते. हा कुत्रा रतन टाटा यांच्यासोबत मुंबईतील बॉम्बे हाऊसमध्ये राहत होता आणि त्यांच्या आयुष्याचा महत्त्वाचा भाग बनला होता.
रतन टाटांना अखेरचा निरोप देण्यासाठी लाडका 'गोवा'ही दाखल
— Ankita Shantinath Khane (@KhaneAnkita) October 10, 2024
#RatanTataPassedAway #RatanTata #Goa pic.twitter.com/dycPlbcAvT
रतन टाटा यांचे व्यावसायिक जीवन जितके प्रेरणादायी होते, तितकेच त्यांचे वैयक्तिक जीवनातील प्राण्यांवरील प्रेमही अद्वितीय होते. 'गोवा' त्यांच्या हृदयाच्या अगदी जवळ होता आणि टाटांनी प्राण्यांबद्दल नेहमीच संवेदनशीलता दाखवली. रतन टाटा यांना देशभरातून श्रद्धांजली वाहण्यात येत आहे. त्यांच्या निधनाने इंडस्ट्रीतील एका युगाचा अंत झाला आहे.
मालकाला श्रद्धांजली वाहण्यासाठी आलेला गोवा देखील उदास दिसत होता. रतन टाटा एकदा गोव्यात गेले होते तेव्हा हा श्वान त्यांच्या मागे लागला होता, त्यानंतर रतन टाटा यांनी या श्वानाला सोबत घेऊन मुंबईला नेले आणि त्याचे नाव गोवा ठेवले. मुंबईतील बॉम्बे हाऊसमध्ये 'गोवा' इतर श्वानांसह राहतो.
रतन टाटांचं श्वानांशी अनोखं प्रेम
रतन टाटाचे दोन श्वान, टिटो (जर्मन शेफ्रे) आणि टँगो (गोल्डन रिट्रीव्हर) हे त्याच्या जीवनाचा एक महत्त्वाचा भाग होता. त्याच्या पाळीव प्राण्यांच्या कुत्र्यांच्या मृत्यूचा संदर्भ घेत टाटा म्हणाले, "माझ्या कुत्र्यांवरील माझे प्रेम नेहमीच आणि आयुष्याच्या शेवटपर्यंत राहील. जेव्हा माझे एका मागोमाग एक पाळीव प्राणी निघून गेले, तेव्हा मी खूप दु:खी होतो, काही वर्षांनंतर माझे घर इतके खाली झाले होते की, मी पुन्हा दुसर्या श्वानाला माझ्या आयुष्याचा एक भाग बनविला. "
श्वानांसाठी नवी मुंबईत बांधले 165 कोटी रुपयांचे रुग्णालय
रतन टाटा नेहमीच त्याच्या औदार्य आणि साध्या स्वभावासाठी ओळखले जात असे. श्वानांशी त्यांचे असलेले विशेष प्रेम कोणापासून लपलेले नव्हते. काही वर्षांपूर्वी त्यांनी कुत्र्यांसाठी एक अत्याधुनिक हॉस्पिटल उघडले. रुग्णालयाच्या उद्घाटनाच्या वेळी ते म्हणाले, "मी कुत्र्यांना माझ्या कुटुंबाचा भाग म्हणून मानतो." रतन टाटा यांनी सांगितले होते की त्यांनी त्यांच्या आयुष्यात अनेक पाळीव प्राण्यांचे संगोपन केले आहे आणि म्हणूनच त्यांना प्राण्यांच्या रुग्णालयांचे महत्त्व लक्षात येते. नवी मुंबईतील या 5 मजली हॉस्पिटलमध्ये 200 पाळीव प्राण्यांचा एकाच वेळी उपचार केला जाऊ शकतो. हे रुग्णालय तयार करण्यासाठी तब्बव 165 कोटी रुपये खर्च केल्याचे सांगण्यात येते.