एक्स्प्लोर
Advertisement
मोदी 'सरकार 2' मध्ये रावसाहेब दानवेंना मंत्रीपद, 'हा' नेता होणार भाजप प्रदेशाध्यक्ष
भारतीय जनता पक्षाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांना नरेंद्र मोदींच्या 'सरकार 2' मध्ये मंत्रीपद दिले जाणार असल्याचे बोलले जात आहे.
मुंबई : भारतीय जनता पक्षाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांना नरेंद्र मोदींच्या 'सरकार 2' मध्ये मंत्रीपद दिले जाणार असल्याचे बोलले जात आहे. जालना लोकसभा मतदार संघातून दानवे सलग पाचव्यांदा खासदार झाले आहेत. त्यामुळे याचे चांगले फळ दानवेंना मिळेल अशी अपेक्षा त्यांच्या कार्यकर्त्यांना आहे. दानवेंना केंद्रीय मंत्रीपद मिळाल्यानंतर ते प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा देतील, त्यामुळेच रिक्त झालेल्या प्रदेशाध्यपदावर कोणाची वर्णी लागणार याबाबतही भाजप नेत्यांमध्ये चर्चा सुरु आहे.
2014 साली एनडीएचे सरकार आल्यानंतर दानवे यांना मोदी सरकारमध्ये ग्राहक संरक्षण राज्यमंत्रीपद दिले होते. परंतु अवघ्या दीड वर्षात दानवे यांना महाराष्ट्रात धाडण्यात आले. यावेळी पुन्हा एकदा एनडीएचे बहुमताचे सरकार निवडून आले आहे. आज नरेंद्र मोदी दुसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेणार आहेत. मोदींसह त्यांच्या मंत्रीमंडळातील प्रमुख नेते आज मंत्रीपदाची शपथ घेतील. त्यामध्ये दानवेदेखील असतील, अशी चर्चा सुरु आहे.
महाराष्ट्रातून कोण कोण?
शिवसेनेच्या गोटातून अरविंद सावंत यांना मंत्रीपद मिळणार आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, अकोल्याचे खासदार संजय धोत्रे यांचाही पहिल्यांदाच कॅबिनेटमध्ये समावेश होणार आहे. मोदींच्या आधीच्या मंत्रिमंडळातील भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी, रेल्वेमंत्री पियुष गोयल, केंद्रीय मानव संसाधन मंत्री प्रकाश जावडेकर आणि सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांचं स्थान नव्या सरकारमध्येही कायम असेल.
VIDEO | शिवसेनेला कोणतं मंत्रिपद मिळणार? | एबीपी माझा
दरम्यान, माजी मंत्री सुभाष भामरे आणि सुरेश प्रभू यांचा दुसऱ्या मंत्रिमंडळात समावेश होणार नसल्याची माहिती आहे. भामरे संरक्षण राज्यमंत्रिपदाची धुरा सांभाळत होते, तर प्रभू यांच्याकडे वाणिज्य मंत्रालयाची धुरा होती.
भाजपचे प्रदेशाध्यक्ष कोण?
भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांना केंद्रात मंत्रीपद मिळाल्यास महाराष्ट्रात भाजपचे प्रदेशाध्यक्षपद कुणाला मिळणार यावर आता चर्चा होऊ लागली आहे. भाजपच्या पहिल्या फळीतील चंद्रकांत पाटील, गिरीश महाजन आणि पंकजा मुंडे यांची नावं पुढे आली आहेत.
VIDEO | मोदी तब्बल 21 मंत्र्यांना नारळ देण्याची शक्यता | एबीपी माझा
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
कोल्हापूर
निवडणूक
पुणे
निवडणूक
Advertisement