एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
दानवेंच्या घरासमोर शेतकऱ्यांच्या मुलांचं अन्नत्याग उपोषण
जालना: शेतकऱ्यांबद्दल वादग्रस्त वक्तव्य करणारे भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्या राजीनाम्यासाठी त्यांच्या भोकरदन येथील घरासमोर अन्नत्याग उपोषण सुरु करण्यात आलं आहे.
आज सकाळपासून शेतकऱ्यांच्या मुलांनी हे उपोषण सुरु केलं आहे.
जोपर्यंत भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे आपल्या पक्षपदाचा आणि खासदारकीचा राजीनामा देणार नाहीत, तोपर्यंत उपोषण सोडणार नाही, असा पवित्रा या उपोषणकर्त्यांनी घेतला आहे.
दोन दिवसापूर्वी दानवे यांनी जालन्यातील पक्ष कार्यकर्त्यांच्या बैठकीत कार्यकर्त्यांने तूर खरेदी संदर्भात विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर देताना वादग्रस्त वक्तव्य केलं होतं.
या वक्तव्याचे काल दिवसभर विरोधकांच्या आंदोलनाने राज्यभरात पडसाद उमटले. तर आज दानवे यांच्या भोकरदन येथील घरासमोर अन्नत्याग उपोषण सुरु करण्यात येऊन दानवे यांनी केलेल्या वक्तव्याचा निषेध करण्यात येतोय.
'दानवेंच्या जिभेचा शेंडा कापा'
भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्या जिभेचा शेंडा कापून आणणाऱ्याला 5 लाख रुपयाचं बक्षीस देणार असल्याची ऑफर शेतकरी संघटनेच्या वतीने देण्यात आली आहे.
जालन्यात शेतकरी संघटनेच्या वतीने पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना जिल्हाधिकाऱ्यांमार्फत निवेदन देण्यात आलं आहे. या निवेदनात दानवे यांच्या वक्तव्याचा तीव्र शब्दात निषेध करण्यात आला आहे. बेताल वक्तव्य करुन शेतकऱ्यांना हिणवणाऱ्या दानवेंच्या जिभेचा तुकडा तोडून आणून देणाऱ्यास 5 लाखांची रक्कम बक्षीस म्हणून देण्यात येणार असल्याचं जाहीर करण्यात आलं आहे.
शेतकऱ्याला मानवाकडून अपेक्षा, दानवाकडून नाही : राज ठाकरे
शेतकऱ्यांना मानवाकडून अपेक्षा आहे. भाजपच्या दानवाकडून नाही, असं म्हणत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवेंवर निशाणा साधला आहे.
दानवे काय म्हणाले?
राज्य सरकारने एवढी तूर खरेदी केली, तरी रडतात XXX, अशा शब्दात रावसाहेब दानवे यांनी शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळलं. कापसाला, तुरीला, डाळीला भाव नाही असली गाणी बंद करा, अशी मुक्ताफळं दानवेंनी उधळली. याशिवाय दानवे यांनी असंसदीय भाषेचा वापरही केला होता.
…तर शेतकऱ्यांची दिलगिरी व्यक्त करतो : रावसाहेब दानवे
मी कार्यकर्त्यांबद्दल अपशब्द वापरला, शेतकऱ्यांबद्दल नाही, असा दावा भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी केला आहे. शेतकऱ्यांची मनं दुखावली असतील तर दिलगिरी करतो असं म्हणत त्यांनी सशर्त माफी मागितली. त्यामुळे झालेल्या चुकीबद्दल दानवे माफी मागत आहेत, की उपकार करत आहेत, असा प्रश्न आता विचारला जात आहे.
संबंधित बातम्या :
बेताल बरळणाऱ्या दानवेंवर विरोधकांची तोफ
दानवेंच्या तोंडाला काळं फासा, 50 हजार रुपये मिळवा, मनसेची घोषणा
‘दानवे पदावर राहणं विरोधकांच्या फायद्याचं’, शरद पवारांचा खोचक टोला
शेतकऱ्यांना मानवाकडून अपेक्षा, भाजपच्या दानवाकडून नाही : राज ठाकरे
‘कर्जमाफी नको, दानवे आणि मुख्यमंत्र्यांचा राजीनामा हवा’
दानवेंच्या तोंडाला काळं फासा, 50 हजार रुपये मिळवा, मनसेची घोषणा
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
Advertisement