एक्स्प्लोर
राणेंचे सहकारी काका कुडाळकर भाजप सोडून पुन्हा काँग्रेसमध्ये
मुंबईत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्या उपस्थितीत 21 डिसेंबर रोजी काका कुडाळकर पक्षप्रवेश करणार आहेत.
सिंधुदुर्ग : भाजपचे काका कुडाळकर भाजपच्या 'कमळा'ची साथ सोडून काँग्रेसचा 'हात' पकडणार आहेत. भाजपचे जिल्हा प्रवक्ते काका कुडाळकर यांची काँग्रेसमधील घरवापसी निश्चित झाली आहे. कुडाळकर कोणे एके काळी नारायण राणेंचे सहकारी होते.
मुंबईत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्या उपस्थितीत 21 डिसेंबर रोजी कुडाळकर पक्षप्रवेश करणार आहेत. भाजपमध्ये काका कुडाळकर यांची घुसमट होत असल्याचं म्हटलं जातं.
माजी जिल्हा परिषद अध्यक्ष असणारे काका कुडाळकर एके काळी माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांचे सहकारी होते. मात्र 2014 च्या निवडणुकांच्या वेळी काका कुडाळकर आणि माजी आमदार राजन तेली यांनी एकाच वेळी राणेंपासून फारकत घेतली होती. राणेंसोबत काँग्रेसमध्ये असणारे काका कुडाळकर भाजपमध्ये गेले होते.
काँग्रेसला येणारे अच्छे दिन पाहून काका कुडाळकर यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला. मुंबईतील गांधी भवनमध्ये त्यांचा पक्षप्रवेश होणार आहे. काका कुडाळकर यांच्या काँग्रेस प्रवेशाने कुडाळ-मालवण विधानसभा मतदार संघातील राजकीय समीकरणे बदलण्याची चिन्हं आहेत.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
बॉलीवूड
भारत
बीड
व्यापार-उद्योग
Advertisement