एक्स्प्लोर

हॉटेल रिट्रीटमध्ये नेमकं काय घडलं? एकनाथ शिंदेंना बाजूला करुन उध्दव ठाकरे मुख्यमंत्री कसे झाले? रामदास कदमांनी केला गौप्यस्फोट    

हॉटेल रिट्रीटमध्ये ज्या आमदारांची सभा झाली त्या सभेत कडवट शिवसैनिक एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री करायचं आहे असं उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनीच म्हटलं होतं, असा गौप्यस्फोट रामदास कदम यांनी केला.

Ramdas Kadam : हॉटेल रिट्रीटमध्ये ज्या आमदारांची सभा झाली त्या सभेत कडवट शिवसैनिक एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री करायचं आहे असं उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनीच म्हटलं होतं, असा गौप्यस्फोट शिवसेना शिंदे गटाचे नेते रामदास कदम (Ramdas Kadam) यांनी केला. एका रात्रीत अस नेमकं काय घडलं की एकनाथ शिंदे यांना बाजूला करुन उध्दव ठाकरे मुख्यमंत्री झाले. याची अधिक माहिती घेतली तर गोगावले काय म्हणाले ते कळेल. गोगावलेलनंतर रामदास कदम यांनी देखील उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल केला. 

वर्षाचे डोहाळे नेमके कोणाला लागले हे स्पष्ट होईल. बाप मुख्यमंत्री बेटा कॅबिनेट मंत्री आणि नेता रामदास कदम आउट. सगळा महाराष्ट्र आश्चर्यचकित झाल्याची टीका रामदास कदम यांनी उद्धव ठाकरेंवर केली. शिवसेना प्रमुखांनी हयातभर कुठलेही पद घेतलं नाही. सगळी पदे शिवसैनिकांना दिल्याचे रामदास कदम म्हणाले. बाळासाहेब असते तर हे होऊ दिलं नसते असे रामदास कदम म्हणाले. 

कोणत्या वेळेला कोणता निर्णय घ्यायचा यात शरद पवारांचा हात कोणी धरु शकत नाही

शरद पवार आणि अजित पवार यांच्या युतीच्या मुद्यावर देखील रामदास कदम यांनी प्रतिक्रिया दिली. शरद पवार परिपक्व राजकीय नेते आहेत. कोणत्या वेळेला कोणता निर्णय घ्यायचा याबाबत त्यांचा कोणी हात धरु शकत नाही. महाराष्ट्राच्या जनतेला संभ्रमात ठेवण्यापेक्षा त्यांनी एक घाव दोन तुकडे केले. मातोश्रीवर या उलट सुरु आहे असे रामदास कदम म्हणाले. 

उध्दव ठाकरेंची इज्जत निघून चालली आहे

महाराष्ट्राच्या जनतेच्या मनात जे आहे ते होईल या उध्दव ठाकरेंच्या वक्तव्यावर रामदास कदम यांनी  टीका केली आहे. मनसेचे 6 नगरसेवक फोडले ते महाराष्ट्राच्या मनात होतं?
वरळीत तुमचा मुलगा उभा राहिला त्याला मनसेने पाठिंबा दिला आणि राज यांचा मुलगा दादरमधून उभा राहिला तेव्हा तुम्ही त्याला पडलात अशी टीका देखील रामदास कदमांनी केली. 
दोगलेपणा पहायचा असेल तर उध्दव ठाकरेंकडे बघा. उध्दव ठाकरेंची इज्जत निघून चालली आहे. मनसेसोबत आल्यावर इज्जत वाचेल अस त्यांना वाटत असेल. त्यामुळं ते मनसेचा कुठलाही प्रस्ताव मान्य करतील असेही रामदास कदम म्हणाले. 

मुंबईतील मराठी माणूस उध्दव ठाकरेंमुळं हद्दपार झाला

मुंबईतील मराठी माणूस उध्दव ठाकरेंमुळं हद्दपार झाल्याचा आरोप देखील रामदास कदम यांनी केला आहे. महानगरपालिकेत 25 वर्षात सत्तेत असताना तुम्ही काय केलं? असा सवाल देखील रामदास कदम यांनी केला. महानगर पालिका उध्दव ठाकरेंकडे कधीच येणार नाही असेही रामदास कदम म्हणाले. 

भ्रष्टाचार थांबवण्याचे काम मुख्यमंत्री करत असतील तर त्यांचे अभिनंदन 

मंत्र्यांच्या खासगी PA वरुन रामदास कदम यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर खोचक प्रतिक्रिया दिली आहे. मुख्यमंत्र्यांच्या भूमिकेचं मी स्वागत करतो. तोलून मोजून मापून निवडायचं त्यांच्याकडे यंत्र असेल तर अधिक चांगल आहे. भ्रष्टाचार थांबवण्याचे काम मुख्यमंत्री करत असतील तर त्यांचे अभिनंदन असे रामदास कदम म्हणाले. मुंबई गोवा महामार्गाच्या कामावरून रामदास कदम यांनी पुन्हा नाराजी व्यक्त केली आहे. समृद्धी महामार्ग तीन वर्षात होतो आणि आमचा हायवे 15 वर्षात होत नाही, याचे दुःख होते. निकृष्ट कामामुळे आमचा शेतकरी उद्ध्वस्त झाला आहे. काम पूर्ण होण्याआधी महामार्गावर खड्डे पडल्याचे रामदास कदम म्हणाले. कुठूनही या माणगाव मध्ये दोन तास थांबवाच लागतं.कोकणावर सातत्याने अन्याय होतोय. जल संधारण आणि पाटबंधारेसाठी कोकणावर अन्याय होतोय. कोकणानाने असं तुमचं कोणत पाप केलं? असा सवाल रामदास कदमांनी केला. 

महत्वाच्या बातम्या:

Disha Salian & Aaditya Thackeray: ...तर उद्धव ठाकरे अन् आदित्य ठाकरे देश सोडून... रामदास कदमांचं मोठं वक्तव्य

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Sai Sudharsan Debut : 'सुदर्शन'चा सूर्योदय! IPL 2025 मध्ये ऑरेंज कॅप जिंकला, वनडे-टी20 गाजवले... आता कसोटीतही साई सुदर्शनचे पदार्पण
'सुदर्शन'चा सूर्योदय! IPL 2025 मध्ये ऑरेंज कॅप जिंकला, वनडे-टी20 गाजवले... आता कसोटीतही साई सुदर्शनचे पदार्पण
लाडक्या बहि‍णींसाठी गुड न्यूज, महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी 9 टक्के व्याजदराने कर्ज मिळणार
लाडक्या बहि‍णींसाठी गुड न्यूज, महिलांना स्वंयपूर्ण उद्योजक बनवण्यासाठी 9 टक्के व्याजदरानं कर्ज मिळणार
भाजपची सत्ता असलेल्या मुंबई जिल्हा बँकेच्या संचालकपदी ठाकरे गटाच्या तेजस्वी घोसाळकरांची नियुक्ती; पक्ष प्रवेशावर शिक्कामोर्तब?
भाजपची सत्ता असलेल्या मुंबई जिल्हा बँकेच्या संचालकपदी ठाकरे गटाच्या तेजस्वी घोसाळकरांची नियुक्ती; पक्ष प्रवेशावर शिक्कामोर्तब?
1 जुलैपासून बँकिंग नियम बदलणार! नेमके नवीन बदल काय होणार याबाबत सविस्तर माहिती 
1 जुलैपासून बँकिंग नियम बदलणार! नेमके नवीन बदल काय होणार याबाबत सविस्तर माहिती 
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Mumbai Local Train Fight : मध्य रेल्वेच्या महिला डब्यात तुंबळ हाणामारी, व्हिडिओ व्हायरल
Santosh Deshmukh son : संतोष देशमुखांचा मुलगा, पुतण्या सदाभाऊंच्या शाळेत, टाळ्या वाजवून स्वागत
Eknath Khadse on Devendra Fadnavis : VIP कक्षात बसले, पण फडणवीसांची भेट झालीच नाही, खडसे म्हणतात...
Ajit Pawar Baramati Absent | अजित पवारांनी बारामतीच्या कार्यक्रमाला दांडी मारली
Shiv Sena War | संजय राऊत यांचा एकनाथ शिंदेंना जोरदार पलटवार | 'कमन किल मी'चा मुद्दा

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sai Sudharsan Debut : 'सुदर्शन'चा सूर्योदय! IPL 2025 मध्ये ऑरेंज कॅप जिंकला, वनडे-टी20 गाजवले... आता कसोटीतही साई सुदर्शनचे पदार्पण
'सुदर्शन'चा सूर्योदय! IPL 2025 मध्ये ऑरेंज कॅप जिंकला, वनडे-टी20 गाजवले... आता कसोटीतही साई सुदर्शनचे पदार्पण
लाडक्या बहि‍णींसाठी गुड न्यूज, महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी 9 टक्के व्याजदराने कर्ज मिळणार
लाडक्या बहि‍णींसाठी गुड न्यूज, महिलांना स्वंयपूर्ण उद्योजक बनवण्यासाठी 9 टक्के व्याजदरानं कर्ज मिळणार
भाजपची सत्ता असलेल्या मुंबई जिल्हा बँकेच्या संचालकपदी ठाकरे गटाच्या तेजस्वी घोसाळकरांची नियुक्ती; पक्ष प्रवेशावर शिक्कामोर्तब?
भाजपची सत्ता असलेल्या मुंबई जिल्हा बँकेच्या संचालकपदी ठाकरे गटाच्या तेजस्वी घोसाळकरांची नियुक्ती; पक्ष प्रवेशावर शिक्कामोर्तब?
1 जुलैपासून बँकिंग नियम बदलणार! नेमके नवीन बदल काय होणार याबाबत सविस्तर माहिती 
1 जुलैपासून बँकिंग नियम बदलणार! नेमके नवीन बदल काय होणार याबाबत सविस्तर माहिती 
सातारा जिल्ह्यात पर्यटनासाठी जाताय? मग बातमी आपल्यासाठी; धरणे, कास पठारसह महाबळेश्वरमधील पर्यटनस्थळांवर 19 ऑगस्टपर्यंत बंदी
सातारा जिल्ह्यात पर्यटनासाठी जाताय? मग बातमी आपल्यासाठी; धरणे, कास पठारसह महाबळेश्वरमधील पर्यटनस्थळांवर 19 ऑगस्टपर्यंत बंदी
Eknath Khadse on Devendra Fadnavis : भेटीसाठी VIP कक्षात बसले, पण फडणवीसांची भेट झालीच नाही; आता एकनाथ खडसे म्हणतात...
भेटीसाठी VIP कक्षात बसले, पण फडणवीसांची भेट झालीच नाही; आता एकनाथ खडसे म्हणतात...
कर्णधार शुभमन गिलची 'कसोटी', भारत विरुद्ध इंग्लंड पहिला कसोटी सामना आजपासून सुरु, प्लेइंग 11मध्ये कोणाला संधी? 
कर्णधार शुभमन गिलची 'कसोटी', भारत विरुद्ध इंग्लंड पहिला कसोटी सामना आजपासून सुरु, प्लेइंग 11मध्ये कोणाला संधी? 
Iran-Israel Conflict: ट्रम्प यांनी युद्धापासून दोन आठवडे हात झटकले; इस्त्रायल इराणवर ढीगभर मिसाईल डागूनही आण्विक कार्यक्रम का थांबवू शकत नाही? अमेरिकेचीच मदत का लागणार??
ट्रम्प यांनी युद्धापासून दोन आठवडे हात झटकले; इस्त्रायल इराणवर ढीगभर मिसाईल डागूनही आण्विक कार्यक्रम का थांबवू शकत नाही? अमेरिकेचीच मदत का लागणार??
Embed widget