एक्स्प्लोर

कोकणातील आंबा उत्पादकांना भरीव मदत करा, तुटपुंज्या मदतीचा निर्णय मागे घ्या, रामदास कदमांचा सरकारला घरचा आहेर

कोकणातील आंबा बागायतदारांना जाहीर केलेल्या तुटपुंज्या मदतीचा निर्णय मागे घ्या. कोकणातील शेतकऱ्याना भरीव मदत करा, अशी मागणी शिवसेना शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांनी केली

Ramdas Kadam : कोकणातील आंबा बागायतदारांना जाहीर केलेल्या तुटपुंज्या मदतीचा निर्णय मागे घ्या. कोकणातील शेतकऱ्याच्या बाबतीत सहानुभूतीपूर्वक निर्णय घेऊन भरीव मदत करा, अशी मागणी शिवसेना शिंदे गटाचे नेते रामदास कदम (Ramdas Kadam) यांनी केली आहे. यावेळी पाच टक्केही आंबा शेतकऱ्याच्या हातात शिल्लक नाही. कोकणातल्या माणसाची उपजीविका हापूस आंब्यावर चालते. कधी नव्हे त्या मदतीचा हातभार लावला नाही तर शेतकरी आत्महत्या करेल असे कदम म्हणाले. 

20 आणि 25 हजारात काही होत नाही, शेतकऱ्यांना भरीव मदत करा

20 आणि 25 हजारात काही होत नाही. कोकणातील शेतकऱ्याला भरीव मदत करावी अशी मागणी रामदास कदम यांनी केली आहे. कोकणातला शेतकरी कधी आत्महत्या करत नाही, कधी कर्जमाफी मागत नाही. कोकणातला शेतकरी स्वाभिमानी आहे. त्यामुळं यावेळी कोकणातला शेतकरी जगेल अशी मदत करावी अशी मागणी रामदास कदम यांनी केली आहे. 

वारंंवार होणाऱ्या नुकसानामुळे कोकणचा शेतकरी कर्जाच्या खाईत लोटला, सरकारनं दिलेली मदत तुटपुंजी, राजू शेट्टींची टीका

राज्य सरकारने आंबा व काजू उत्पादक शेतकऱ्यांसाठी जाहीर केलेली हेक्टरी 22 हजार रुपयांची आर्थिक मदत तुटपुंजी असल्याची टीका देखील स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रमुख राजू शेट्टी यांनी केली होती. एका बाजूला औषध फवारणी, खते, मजुरी आणि वाहतुकीचा खर्च लाखांच्या घरात गेला असताना, सरकार केवळ 22 हजार रुपये देऊन शेतकऱ्यांचे समाधान करु पाहत आहे. एका आंबा बागेचा वार्षिक खर्च आणि झालेली हानी पाहता, ही रक्कम फवारणीच्या एका हप्त्यासाठीही पुरेशी नाही. वारंंवार होणाऱ्या नुकसानामुळे कोकणचा शेतकरी कर्जाच्या खाईत लोटला गेला आहे. अशा परिस्थितीत सरकारने जाहीर केलेली ही मदत शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळणारी ठरली आहे. राजकारणापलीकडे कोकणातील लोकप्रतिनिधींनी आंबा व काजू बागायतदार यांच्या प्रश्नावर मौन पाळले आहे. आंबा व काजू पीकविमा कंपन्याकडून शेतकऱ्यांना लुबाडले जात आहे. कर्जमाफीमध्येही निकष व अटी घालून शेतकऱ्यांना कर्जमाफीपासून वंचित ठेवले जात असल्याची टीका राजू शेट्टींनी देखील केली होती. राजकारणापलीकडे कोकणातील लोकप्रतिनिधींनी आंबा व काजू बागायतदार यांच्या प्रश्नावर मौन पाळले आहे. आंबा व काजू पीकविमा कंपन्याकडून शेतकऱ्यांना लुबाडले जात आहे. कर्जमाफीमध्येही निकष व अटी घालून शेतकऱ्यांना कर्जमाफीपासून वंचित ठेवले जात असल्याचे राजू शेट्टी म्हणाले. सरकारनं जाहीर केलेल्या मदतीवरुन शेतकरी देखील आक्रमक होताना दिसत आहेत.

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Live blog updates: नाशिक जिल्ह्यात पुन्हा सौम्य भूकंपाचे धक्के; नागरिकांमध्ये चिंता
Maharashtra Live blog updates: नाशिक जिल्ह्यात पुन्हा सौम्य भूकंपाचे धक्के; नागरिकांमध्ये चिंता
Ladaki Bahin Yojana :लाडकी बहीण योजनेतून 92 लाख अपात्र महिलांची नावं कापली, सरकारचा आर्थिक भार कमी झाला, साडेचार लाख सरकारी कर्मचाऱ्यांकडून गैरफायदा
लाडकी बहीण योजनेतून 92 लाख अपात्र महिलांची नावं कापली, सरकारचा आर्थिक भार कमी झाला, साडेचार लाख सरकारी कर्मचाऱ्यांकडून गैरफायदा
Sanjay Raut : इकडल्या बंगल्यातून दिल्लीच्या बंगल्यात जायचंय, मोठा बंगला मिळेल, वहिनीसाहेबांनी मानसिकता करावी, संजय राऊतांचा खोचक टोला
इकडल्या बंगल्यातून दिल्लीच्या बंगल्यात जायचंय, मोठा बंगला मिळेल, वहिनीसाहेबांनी मानसिकता करावी, संजय राऊतांचा खोचक टोला
Mira Bhayandar News: रहिवासी इमारतींमध्ये कुर्बानीवर बंदी; सत्ताधारी भाजपने महासभेत प्रस्ताव केला मंजूर, नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर दंडासह गुन्ह्याची तरतूद
मीरा-भाईंदरमधील रहिवासी इमारतींमध्ये कुर्बानीवर बंदी; सत्ताधारी भाजपने महासभेत प्रस्ताव केला मंजूर, नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर दंडासह गुन्ह्याची तरतूद

व्हिडीओ

Nashik Crime : लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या प्रेयसीकडून हत्या Special Report
Vinod Tawde UP incharge : विनोद तावडेंची कामगिरी, उत्तर प्रदेशची जबाबदारी Special Report
Maharashtra Weather Rain Updates: पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती
Laxman Hake PC : ओबीसींनी ज्यांना मतदान केलं त्या सत्ताधाऱ्यांनी तुम्हाला निर्वस्त्र केलंय
Devendra Fadnavis On Tukaram Mundhe FDA: तुकाराम मुंढेंच्या धडक कारवाईवर फडणवीस पहिल्यांदाच बोलले

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sanjay Raut : इकडल्या बंगल्यातून दिल्लीच्या बंगल्यात जायचंय, मोठा बंगला मिळेल, वहिनीसाहेबांनी मानसिकता करावी, संजय राऊतांचा खोचक टोला
इकडल्या बंगल्यातून दिल्लीच्या बंगल्यात जायचंय, मोठा बंगला मिळेल, वहिनीसाहेबांनी मानसिकता करावी, संजय राऊतांचा खोचक टोला
Sameer Wankhede on Tukaram Mundhe: बेधडक तुकाराम मुंढेंच्या धडाडीने अवघ्या देशात चर्चा, पण समीर वानखेडेंच्या प्रतिक्रियेनं सर्वांच्याच भूवया उंचावल्या! नेमकं म्हणाले तरी काय
बेधडक तुकाराम मुंढेंच्या धडाडीने अवघ्या देशात चर्चा, पण समीर वानखेडेंच्या प्रतिक्रियेनं सर्वांच्याच भूवया उंचावल्या! नेमकं म्हणाले तरी काय
Ganesh Naik: डेटा सेंटरला वीज, पाणी लागतं, नॉइज पोल्युशन होतं, डेटा सेंटर हवं, पंतप्रधानांनी सांगितलं पण या सेंटरला माझा वैयक्तिक विरोध, गणेश नाईक नेमकं काय म्हणाले?
डेटा सेंटरला वीज, पाणी लागतं, नॉइज पोल्युशन होतं, डेटा सेंटर हवं, पंतप्रधानांनी सांगितलं पण या सेंटरला माझा वैयक्तिक विरोध, गणेश नाईक नेमकं काय म्हणाले?
Baba Ramdev on Kangana Ranaut: शिक्षण काय, तारुण्य कसं गेलं, तिचे पहिले कारनामे काय काय होते? ही बिघडलेल्या डोक्याची लक्षणे..' बाबा रामदेव खासदार कंगनावर का भडकले??
शिक्षण काय, तारुण्य कसं गेलं, तिचे पहिले कारनामे काय काय होते? ही बिघडलेल्या डोक्याची लक्षणे..' बाबा रामदेव खासदार कंगनावर का भडकले??
Pune Rent Homes: पुणे पोलिसांची मोठी कारवाई, भाडेकरुंची माहिती न देणाऱ्या 170 घरमालकांवर थेट गुन्हे दाखल, गुन्हेगार, दहशतवाद्यांमुळे महत्त्वाचं पाऊल
पुणे पोलिसांची मोठी कारवाई, भाडेकरुंची माहिती न देणाऱ्या 170 घरमालकांवर थेट गुन्हे दाखल, गुन्हेगार, दहशतवाद्यांमुळे महत्त्वाचं पाऊल
हाॅटेलवर हाॅटेल असलेल्या पाच मजली इमारतीच्या भीषण अग्नितांडवात चार वर्षाच्या चिमुरड्यासह 9 जण जिवंत जळाले; आतापर्यंत 80 जणांना वाचवलं, अग्निकांडानंतर इमारतीचा मालक फरार
हाॅटेलवर हाॅटेल असलेल्या पाच मजली इमारतीच्या भीषण अग्नितांडवात चार वर्षाच्या चिमुरड्यासह 9 जण जिवंत जळाले; आतापर्यंत 80 जणांना वाचवलं, अग्निकांडानंतर इमारतीचा मालक फरार
Pune Crime News: टीव्ही बघताना नराधमाने चिमुरडीला घराबाहेर बोलावलं, शेतात नको ते कृत्य करुन संपवलं, जुन्नरच्या पिंपळवंडीत काय घडलं?
टीव्ही बघताना नराधमाने चिमुरडीला घराबाहेर बोलावलं, शेतात नको ते कृत्य करुन संपवलं, जुन्नरच्या पिंपळवंडीत काय घडलं?
David Warner News : कोर्टाने सुनावली शिक्षा, अन् मीडियाने डेव्हिड वॉर्नरला घेरलं! पण पुढच्याच क्षणी अनर्थ टळला; कोर्टाबाहेर ऑस्ट्रेलियन खेळाडूसोबत काय घडलं?, VIDEO
कोर्टाने सुनावली शिक्षा, अन् मीडियाने डेव्हिड वॉर्नरला घेरलं! पण पुढच्याच क्षणी अनर्थ टळला; कोर्टाबाहेर ऑस्ट्रेलियन खेळाडूसोबत काय घडलं?, VIDEO
Embed widget