एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
राज्यासह देशभरात राम जन्मोत्सवाचा उत्साह, मंदिरं भाविकांनी फुलली
राज्यासह देशभरात रामनवमी मोठ्या उत्साहात साजरी केली जात आहे.
मुंबई : राज्यासह देशभरात रामनवमीनिमित्त राम जन्मोत्सवाचा उत्साह पाहायला मिळत आहे. श्रीरामाचं जन्मस्थान असलेल्या अयोध्येत रामजन्माचा सोहळा साजरा करण्यात आला. तसंच राज्यातील मंदिरंही रामनवमीनिमित्त गर्दीनं फुलली आहेत.
रामनवमीनिमित्त विठ्ठल मंदिरात थंडगार विड्याच्या पानांची सजावट करण्यात आली. विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीने 11 हजार विड्याच्या पानांनी विठ्ठल आणि रुक्मिणीच्या गाभाऱ्यात ही सजावट करण्यात आली आहे. विठ्ठल मंदिरात पहिल्यांदाच अशी पानाची सजावट केली आहे. आज रामनवमीनिमित्त भाविकांनी मंदिरात दर्शनासाठी मोठी गर्दी केली आहे. ही आकर्षक सजावट भाविकांना सुखावत आहे.
बुलडाणा जिल्हातील शेगावमध्येही राम जन्मोत्सवाचा सोहळा मोठ्या उत्सवात साजरा करण्यात आला. यावेळी भाविकांनी मोठ्या संख्येने गर्दी करत संत गजानन महाराजाचे दर्शन घेतलं. दुपारी श्रींच्या पालखीसह शोभायात्रा काढण्यात आली. या नगरपरीक्रमेत सेवाधारी टाळकरी सहभागी झाले होते.
रामनवमीनिमित्त शिर्डीत साईबाबांच्या दर्शनासाठी पहाटेपासूनच भाविकांनी मोठी गर्दी केली होती. रामनवमी उत्सवाच्या आज मुख्य दिवशी साईसमाधीच्या दर्शनासाठी राज्यभरातून पालख्यांबरोबर आलेल्या पदयात्रींसोबतच हजारो साईभक्त शिर्डीत दाखल झाले आहेत. साईबाबा समाधी मंदिराचे आज सर्वांना दर्शन मिळावे यासाठी साईबाबांचे मंदिरही रात्रभर खुले राहणार आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
Advertisement