एक्स्प्लोर
पुण्यात सर्वपक्षीयांकडून ईव्हीएमची अंत्ययात्रा

पुणे: महापालिका निवडणुकीत ईव्हीएम मशीनमध्ये घोटाळा केल्याचा आरोप करत पुण्यात पराभूत उमेदवारांनी आंदोलन केलं. झाशीची राणी चौकात भाजप वगळता सर्वपक्षीय पराभूत उमेदवारांनी ईव्हीएम मशिनची अंत्ययात्रा काढली. त्यानंतर वैकुंठ स्मशानभूमीत ईव्हीएम मशिनवर प्रतिकात्मक अंत्यसंस्कार करण्यात आले. या आंदोलनामुळं जंगली महाराज रस्त्यावर मोठी गर्दी झाली होती. इथेच भाजपचं कार्यालय असल्यानं आंदोलक उमेदवारांनी जोरदार घोषणाबाजी करत या घोटाळ्याची चौकशीची मागणी केली. आंदोलनानंतर सर्व पराभूत उमेदवारांची संभाजी उद्यानात बैठकही झाली. राज्यातल्या अनेक भागात ईव्हीएम मशिन्ससंदर्भात तक्रारी येत आहेत. त्यामुळं खरंच ईव्हीएम मशिन्समध्ये काही घोटाळा झाला का याचीच चर्चा सर्वत्र सुरु झाली आहे.
आणखी वाचा
महत्त्वाच्या बातम्या
भारत
व्यापार-उद्योग
मुंबई
नागपूर























