Rajya Sabha Election Update : राजीव सातव (Rajeev Satav) यांच्या निधनामुळं रिक्त झालेल्या महाराष्ट्रात राज्यसभेच्या (Maharashtra) एका जागेसाठी निवडणूक होण्याचं टळलं आहे. कारण भाजपचे उमेदवार संजय उपाध्याय (BJP Sanjay Upadhyay) यांनी या निवडणुकीतून माघार घेतली आहे. त्यामुळं राज्यसभा निवडणूक (Rajya Sabha Election)बिनविरोध होणार असल्याचं स्पष्ट झालं आहे. उपाध्याय यांनी माघार घेतल्यानं काँग्रेसच्या रजनी पाटील (rajani patil) यांची राज्यसभेवर जाण्याची वाट मोकळी झाली आहे. त्यांच्या विजयाची आता केवळ औपचारिकता बाकी आहे. 


राज्यसभा निवडणुकीच्या निमित्ताने भाजप महाविकास आघाडी सरकारची अग्निपरीक्षा पाहणार?


काय म्हणाले संजय उपाध्याय
संजय उपाध्याय यांनी म्हटलं आहे की, पक्षाच्या नेत्यांचा निर्णय मान्य करून मी उमेदवारी अर्ज मागे घेतला.  माझ्यावर विश्वास टाकला त्याबद्दल मी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचे आभार मानतो.  कोअर कमिटीच्या बैठकीत अर्ज मागे घेण्याबाबत निर्णय झाला. काँग्रेस नेत्यांनी निवडणूक बिनविरोध व्हावी अशी विनंती केली होती, त्यानुसार आम्ही उमेदवारी अर्ज मागे घेण्याची निर्णय घेतला असं उपाध्याय म्हणाले. 


Rajya Sabha By-Election : राज्यसभेच्या सहा जागांसाठी निवडणूक जाहीर, राजीव सातवांच्या रिक्त जागी कुणाला संधी?


आज अर्ज माघारी घेण्याचा अंतिम दिवस होता. जर भाजपने अर्ज माघारी घेतला नसता तर या एका जागेसाठी 4 ऑक्‍टोबरला मतदान होणार होतं.  एकाच जागेसाठी निवडणूक असल्याने आणि महाविकास आघाडीकडे तूर्तास बहुमत असल्याने निवडणूक फारशी अवघड नव्हती मात्र तरी यासाठी रिस्क न घेता काँग्रेस नेत्यांनी भाजप नेत्यांसोबत बिनविरोध निवडणुकीबाबत चर्चा केली होती.  


Rajani Patil : राजीव सातव यांच्या निधनामुळं रिक्त जागी काँग्रेसकडून रजनी पाटील यांना राज्यसभेसाठी उमेदवारी 
 
राजीव सातव यांच्या निधनामुळं  रिक्त जागी काँग्रेसकडून रजनी पाटील यांना उमेदवारी देण्यात आली. सोनिया गांधींकडून या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आलं. रजनी पाटील या माजी खासदार आहेत. त्या सध्या जम्मू-काश्मीरच्या प्रभारी आहेत. राज्यात विधान परिषदेसाठी राज्यपाल नियुक्त आमदारांच्या यादीत नाव होतं. पण त्याऐवजी त्यांना राज्यसभेवर संधी दिली आहे. रजनी पाटील या सोनिया गांधी यांच्या अत्यंत विश्वासू वर्तुळातील आहेत.