Maharashtra Health Dept Exam Date Update :  आरोग्य विभागाच्या गट क व गट ड पदाची परीक्षा (Maharashtra Health Department Exam) 25 आणि 26 सप्टेंबर रोजी घेतली जाणार होती. मात्र ही परीक्षा आदल्या दिवशी रात्री स्थगित करण्यात आली. यामुळं अनेक विद्यार्थ्यांना त्रास सहन करावा लागला. आता ही आरोग्य विभागातील रद्द झालेली क आणि ड गटातील पदभरतीची परीक्षा 15-16 किंवा 22-23 ऑक्टोबरला होईल अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे.



नुकतीच रद्द झालेली परीक्षा ऐन वेळेला पुढे ढकलण्यात आली. या मागे काही उमेदवाराचं हित हाच मुद्दा असल्याचं टोपे यांनी सांगितलं असलं तरी ऐन वेळेला परीक्षा रद्द झाल्यामुळे परीक्षा केंद्रावरती पोहोचलेल्या लाखो उमेदवारांना मनस्ताप आणि आर्थिक फटका सहन करावा लागला होता. त्यावेळेला रद्द झालेली परीक्षा होणारं की नाही याबद्दलची साशंकता होती. राजेश टोपे यांनी आज मुंबईत आरोग्य विभागाची बैठक घेतली जाईल, या बैठकीत या तारखा निश्चित केल्या जातील. 15 व 16 ऑक्टोबरला रेल्वेची परीक्षा आहे ती पुढे ढकलता आली तर प्राधान्य म्हणून याच तारखेला परीक्षा घेतली जाईल. पुढे ढकलता नाही आली तर 22 किंवा 23 ऑक्टोबरला परीक्षा होईल असे राजेश टोपेंनी सांगितले आहे.


आरोग्य विभागाच्या परीक्षेचा गोंधळ, परीक्षेचं काम दिलेली कंपनी ब्लॅक लिस्टमध्ये? आरोग्यमंत्री म्हणाले परीक्षा होणारच


नेमकं का घडला हा प्रकार 
नोव्हेंबर 2016 मध्ये पंजाब सरकारने NYSA या कंपनीला तेथील गैरकारभार प्रकरणी तीन वर्षासाठी ब्लॅकलिस्ट केले. पुढे उच्च न्यायालयातून ही कंपनी ब्लॅकलिस्ट मधून बाहेर पडली. 2017  ला महाराष्ट्रातील FYJC म्हणजे अकरावी एडमिशन लिस्टचे काम NYSA Asia या कंपनीला दिले गेले, त्यातील पोर्टल मध्ये मोठ्या प्रमाणात तक्रारी समोर येऊन काही काळासाठी या कंपनीचे पोर्टल क्रॅश झाल्यामुळे विद्यार्थांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागला आणि विशेष म्हणजे महाराष्ट्रातील शिक्षण विभागाने या कंपनीवर काहीही कार्यवाही/दंड केला नाही.


Health Department Exam : आरोग्य विभागाची परीक्षा महाराष्ट्रात, केंद्र नोएडात; हॉल तिकीट गोंधळावर राजेश टोपे म्हणाले.... 
 
जुलै 2018 ला उत्तरप्रदेशातील UPSSC च्या अजून एका परीक्षेचे कंत्राट NYSA कडे होते. या परीक्षेत परीक्षेआधीच प्रश्नपत्रिका फोडून पेपर लीक करण्यात आला, काही विद्यार्थांच्या सतर्कतेमुळे ही बाब लक्षात आली त्यामुळे परीक्षेच्या एक दिवस आधी एजंट लोकांना पोलिसांनी पकडुन सदर परीक्षा रद्द करायला लावली. या परीक्षेनंतर UPSSC ने NYSA ला ब्लॅकलिस्ट केले. NYSA याविरुद्ध उच्च न्यायालयात गेल्यावर, UPSSC ने NYSA ची बाजू न ऐकताच ब्लॅकलिस्ट केले, असा ठपका कोर्टाने ठेवला आणि ब्लॅकलिस्ट मधून काढले. आता हे सगळं असताना महाराष्ट्र राज्याच्या आरोग्य विभागाच्या परीक्षेत गोंधळ या कंपनीने घातला त्यानंतर महाराष्ट्र सरकार या कंपनीवर आता नेमकी काय कारवाई करणार हे पाहावं लागेल.