कोल्हापूर : पूरग्रस्तांना तातडीने मदत मिळावी आणि इतर काही मागण्यांसाठी माजी खासदार राजू शेट्टी यांनी जलसमाधी आंदोलनाचा इशारा दिला होता. त्याप्रमाणे स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या काही कार्यकर्त्यांनी आक्रमक होत कृष्णा नदीत उड्या मारल्या. मात्र प्रशासनाआधी आंदोलनाचा इशारा लक्षात पूर्ण तयारी केली होती. म्हणून या सर्वांना सुखरुप बाहेर काढलं गेलं आहे. नदीत पात्रात आधीच जीवरक्षक बोटी आणि रेस्क्यू फोर्स तेथे तैनात करण्यात आले होते. 


राजू शेट्टी यांच्या नेतृत्वात काढलेल्या पदयात्रेत मोठ्या प्रमाणात शेतकरी, कार्यकर्ते सहभागी झाले आहेत. पूरग्रस्तांना 2019 च्या निकषांप्रमाणे मदत मिळावी यासाठी राजू शेट्टी यांनी हे आंदोलन उभं केलं आहे. आज 4 वाजेपर्यंत सरकारने आमच्या मागण्या मान्य केल्या नाहीत तर जलसमाधीचा इशारा राजू शेट्टी यांनी दिला होता. नृसिंहवाडी येथील कृष्णा-पंचगंगा संगमावर जलसमाधी आंदोलन करण्यात येणार आहे. त्या पार्श्वभूमीवर पोलिसांता मोठा बंदोबस्त परिसरात लावण्यात आला आहे.


राजू शेट्टींच्या आंदोलनाची प्रशासनाने घेतली दखल आहे. रात्रीपासून प्रशासनाचा राजू शेट्टींशी संवाद सुरू आहे. नृसिंहवाडी पर्यंत विनाअडथळा सोडण्याची शेट्टींची मागणी आहे. अडवण्याचा प्रयत्न केल्यास प्रत्युत्तर देणार असल्याचं राजू शेट्टी यांनी म्हटलं आहे. संवादाची दारे नेहमीच उघडी, मला हा प्रश्न प्रतिष्ठेचा करायचा नाही असं म्हणत राजू शेट्टींनी सरकारला पुन्हा एकदा 4 वाजेपर्यंतची वेळ दिली आहे.  


राजू शेट्टी यांच्या आंदोलनादरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून नृसिंहवाडी येथील पंचगंगा नदीवरील पुलावर दोन्ही बाजूचे लोखंडी कठडे दोरीच्या साहाय्याने बंदिस्त केले होते. पुलावर पोलीस बंदोबस्त देखील मोठा आहे. परिसरातील अनेक दुकानेही बंद करण्यात आली होती. मोठा बंदोबस्त असल्याने परिसराला छावणीचं रुप आलं आहे.


संबंधित बातम्या