एक्स्प्लोर

इतर नेत्यांना ईडीने बोलावलं, राजू शेट्टी मात्र स्वत:च ईडी कार्यालयात पोहोचले

कडकनाथ कोंबडी पालन व्यवसायाच्या माध्यमातून शेतकऱ्यांची जवळपास 500 कोटींची फसवणूक झाल्याचा प्रकार समोर आला आहे.

मुंबई : विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर विरोधी पक्षातील अनेक नेत्यांना चौकशीसाठी ईडी कार्यालयात बोलावलं जात आहे. पण स्वाभिमान शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी हे मात्र स्वत:च बॅलार्ड पिअर इथल्या ईडी कार्यालयात पोहोचले. कडकनाथ कोंबडी प्रकरणी ईडीमार्फत चौकशी करण्याची मागणी राजू शेट्टी यांनी केली आहे. कडकनाथ कोंबडी पालन व्यवसायाच्या माध्यमातून शेतकऱ्यांची जवळपास 500 कोटींची फसवणूक झाल्याचा प्रकार समोर आला आहे. कडकनाथ संबंधीची कंपनी कृषीराज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्या नातेवाईकांची असल्याचा आरोप राजू शेट्टी यांनी केला आहे. यावरुन राजू शेट्टी आणि कृषीराज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्यात नव्या वादाला सुरुवात झाली आहे. कडकनाथ कोंबडी पालन व्यवसायात गुंतवणूक केल्यास भरघोस नफा मिळवून देण्याचं आमिष 'महारयत अ‍ॅग्रो इंडिया प्रायव्हेट लिमिटेड कंपनी'ने दिले होते. यामध्ये गुंतवणूक करणाऱ्या राज्यभरातील शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणावर फसवणूक झाली होती. यानंतर संचालक मंडळवर गुन्हाही दाखल झाला आहे. ही कंपनी सदाभाऊ खोत यांच्या नातेवाईकांची असल्याचा आरोप राजू शेट्टी यांनी केला होता. तर, खोत यांनी हे आरोप फेटाळून लावले आहेत. मागील काही दिवसात कोहिनूर स्क्वेअर प्रकरणात मनसे अध्यक्ष राज ठाकरेंसह नितीन सरदेसाई यांना ईडीने चौकशीसाठी बोलावलं होतं. मात्र आता कडकनाथ घोटाळ्याची चौकशी ईडी करावी ही मागणी करण्यासाठी राजू शेट्टी स्वत:च ईडी कार्यालयात पोहोचले. रक्कम गुंतवा, पक्षी पाळा, अंडी व कोंबड्या विका सांगली जिल्ह्यात कडकनाथ कुक्कुटपालनाची शक्कल लढवित गुंतवणुकीची भन्नाट योजना सुरू केली आहे. ‘रक्कम गुंतवा, पक्षी पाळा, अंडी व कोंबड्या विका’ असं या योजनेचे स्वरुप आहे. यात प्रोजेक्ट मालकास एकूण 75 हजार रुपयांची गुंतवणूक करावी लागते. पक्षी घेताना 40 हजार आणि राहिलेले 35 हजार 3 महिन्यांनतर अशा दोन टप्प्यात रक्कम घेतली जाते. या कालावधीत 200 पक्षांच्या युनिटसाठी कंपनीकडून खाद्य, औषधे, लस, भांडी दिली जातात. तीन महिन्यानंतर कंपनी शेतकर्‍याकडे 100 मादी आणि 20 नर ठेवून 80 पक्षी घेऊन जाते. 4 ते 5 महिन्यानंतर पक्ष्यांनी अंडी देणे सुरु केल्यानंतर कंपनी पहिली 2 हजार अंडी प्रतिनग 50, दुसरी दोन हजार अंडी 30 व तिसरी 3500 अंडी 20 रुपये या दराने घेऊन जाते. यातून शेतकर्‍याला एका वर्षात 2 लाख 30 हजार आणि 375 रुपयाप्रमाणे 120 पक्ष्यांच्या विक्रीतून 45 हजार असे पावणे तीन लाख देण्याचे आमिष दाखविले. 75 हजारांच्या बदल्यात वर्षभरात मोठा परतावा मिळत असल्याने तसेच दोन टप्प्पात रक्कम द्यायची असल्याने अनेक शेतकरी या योजनेला सहजासहजी बळी पडले आहेत.

शेतकऱ्यांची फसवणूक

वाळवा तालुक्यातील कापूरवाडी येथील संतोष कदम यांनी 600 कडकनाथ कोंबड्याचे शेड उभारले आहे. 7 लाख 20 हजार रुपये या व्यवसयात गुंतवले, मात्र आता तो अडचणीत आला आहे. दीड महिन्यात 75 हजार खाद्यावर खर्च केले आहेत. हजारो अंडी घरात पडून आहेत. कोंबड्यांना खाद्य देण्यासाठी आता हाती पैसा नसल्याने झाडाची पाने या कडकनाथ कोंबड्यांना घालण्याची वेळ संतोषवर आली आहे. बायकोच्या बचतगटावर कर्ज काढून, दागिने गहाण ठेवून संतोषने हा व्यवसाय वाढवला, मात्र आज हा व्यवसायच अडचणीत आल्याने या संतोषवर संकट ओढवलं आहे. संतोष सारखीच स्थिती अनेकांची आहे. संबंधित बातम्या 'कडकनाथ’ कुक्कुटपालनात शेतकऱ्यांची फसवणूक, जवळपास 500 कोटी अडकले आरोप सिद्ध करावे अन्यथा भरचौकात विष्टा खावी, राजू शेट्टींवर टीका करताना सदाभाऊ खोतांची जीभ घसरली साडेआठ तासांच्या चौकशीनंतर राज ठाकरे ईडी कार्यालयाबाहेर, गरज पडल्यासच पुन्हा बोलावणार
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Team India Announced for Champion Trophy 2025 : शुभमान गिल उपकॅप्टन, विकेटकीपिंगसाठी के एल राहुलला प्राधान्य, चॅम्पियन्स ट्रॉफीच्या टीमची 5 वैशिष्ट्ये!
शुभमान गिल उपकॅप्टन, विकेटकीपिंगसाठी के एल राहुलला प्राधान्य, चॅम्पियन्स ट्रॉफीच्या टीमची 5 वैशिष्ट्ये!
Beed News : बीडमध्ये महिला सरपंचाकडे खंडणीची मागणी, महिलेचा गंभीर इशारा; म्हणाल्या, आम्हाला न्याय द्या,नाहीतर...
बीडमध्ये महिला सरपंचाकडे खंडणीची मागणी, महिलेचा गंभीर इशारा; म्हणाल्या, आम्हाला न्याय द्या,नाहीतर...
India Squad For Champions Trophy Live : तब्बल 14 महिन्यांनी टीम इंडियाच्या तोफेची वापसी, बुम बुम बुमराह सुद्धा फिट; चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी कोणाकोणाला मिळाली संधी?
तब्बल 14 महिन्यांनी टीम इंडियाच्या तोफेची वापसी, बुम बुम बुमराह सुद्धा फिट; चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी कोणाकोणाला मिळाली संधी?
Israeli attacks on Gaza : 50 हजार निष्पाप जीव गेल्यानंतर तब्बल 469 दिवसांनी इस्रायलची शस्त्रसंधीला मान्यता; पहिल्या टप्प्यात हमास 33 ओलिसांची सुटका करणार
50 हजार निष्पाप जीव गेल्यानंतर तब्बल 469 दिवसांनी इस्रायलची शस्त्रसंधीला मान्यता; पहिल्या टप्प्यात हमास 33 ओलिसांची सुटका करणार
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 3 PM : 18 Jan 2025 : ABP Majha : Maharashtra PoliticsRohit Sharma : कर्णधार रोहित शर्माची निवड समिती अध्यक्षांसह मॅरेथॉन चर्चाSandeep Kshirsagar : वाल्मीक कराडला धनंजय मुंडेंचं संरक्षण; संदीप क्षीरसागरांचा सर्वात मोठा आरोपSSC HSC Hall Ticket : १०-१२ बोर्ड परीक्षेच्या हॉल तिकीटावर जात प्रवर्ग, अनेकांकडून आश्चर्य व्यक्त

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Team India Announced for Champion Trophy 2025 : शुभमान गिल उपकॅप्टन, विकेटकीपिंगसाठी के एल राहुलला प्राधान्य, चॅम्पियन्स ट्रॉफीच्या टीमची 5 वैशिष्ट्ये!
शुभमान गिल उपकॅप्टन, विकेटकीपिंगसाठी के एल राहुलला प्राधान्य, चॅम्पियन्स ट्रॉफीच्या टीमची 5 वैशिष्ट्ये!
Beed News : बीडमध्ये महिला सरपंचाकडे खंडणीची मागणी, महिलेचा गंभीर इशारा; म्हणाल्या, आम्हाला न्याय द्या,नाहीतर...
बीडमध्ये महिला सरपंचाकडे खंडणीची मागणी, महिलेचा गंभीर इशारा; म्हणाल्या, आम्हाला न्याय द्या,नाहीतर...
India Squad For Champions Trophy Live : तब्बल 14 महिन्यांनी टीम इंडियाच्या तोफेची वापसी, बुम बुम बुमराह सुद्धा फिट; चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी कोणाकोणाला मिळाली संधी?
तब्बल 14 महिन्यांनी टीम इंडियाच्या तोफेची वापसी, बुम बुम बुमराह सुद्धा फिट; चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी कोणाकोणाला मिळाली संधी?
Israeli attacks on Gaza : 50 हजार निष्पाप जीव गेल्यानंतर तब्बल 469 दिवसांनी इस्रायलची शस्त्रसंधीला मान्यता; पहिल्या टप्प्यात हमास 33 ओलिसांची सुटका करणार
50 हजार निष्पाप जीव गेल्यानंतर तब्बल 469 दिवसांनी इस्रायलची शस्त्रसंधीला मान्यता; पहिल्या टप्प्यात हमास 33 ओलिसांची सुटका करणार
Ajit Pawar : ठाकरे गटानंतर अजितदादांच्या राष्ट्रवादीचा स्वबळाचा नारा? पक्षातील नेते म्हणाले, 'शक्य असेल तिथे एकत्र, नाहीतर...'
ठाकरे गटानंतर अजितदादांच्या राष्ट्रवादीचा स्वबळाचा नारा? पक्षातील नेते म्हणाले, 'शक्य असेल तिथे एकत्र, नाहीतर...'
'डंकी' मार्गाने युरोप गाठण्याच्या प्रयत्नात 44 पाकिस्तानींचा समुद्रात बुडून मृत्यू, 'डंकी'च्या नादात जगभरात 2024 मध्ये10 हजार जणांचा अंत
'डंकी' मार्गाने युरोप गाठण्याच्या प्रयत्नात 44 पाकिस्तानींचा समुद्रात बुडून मृत्यू, 'डंकी'च्या नादात जगभरात 2024 मध्ये10 हजार जणांचा अंत
Sunil Shinde : BEST बसचा आणखी एक प्रताप; आमदार सुनील शिंदे दादर परिसरात थोडक्यात बचावले
BEST बसचा आणखी एक प्रताप; आमदार सुनील शिंदे दादर परिसरात थोडक्यात बचावले
Santosh Deshmukh Case : संतोष देशमुख प्रकरणातील सर्व आरोपींना व्हिसीद्वारे कोर्टात करणार हजर; एसआयटीकडून विशेष खबरदारी, सुनावणीकडे लक्ष
संतोष देशमुख प्रकरणातील सर्व आरोपींना व्हिसीद्वारे कोर्टात करणार हजर; एसआयटीकडून विशेष खबरदारी, सुनावणीकडे लक्ष
Embed widget