(Source: ECI/ABP News/ABP Majha)
अदर पुनावाला पुण्याचे, त्यांनी लसींबाबत महाराष्ट्राला झुकतं माप द्यावं : राजेश टोपे
अदर पुनावाला पुण्याचे असल्याने आणि सीरम इन्स्टिट्यूट महाराष्ट्रात असल्याने पुनावाला यांनी महाराष्ट्राला झुकतं माप द्यायला पाहिजे असं आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी म्हटलं आहे.
जालना : अदर पुनावाला पुण्याचे असल्याने आणि सीरम इन्स्टिट्यूट महाराष्ट्रात असल्याने पुनावाला यांनी महाराष्ट्राला झुकतं माप द्यायला पाहिजे असं आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी म्हटलं आहे. राज्य सरकारकडे लसीसाठी निधी आहे. सरकार खर्च करायला तयार आहे पण लस नसल्याने कमी गतीने लसीकरण करावे लागतेय, असं टोपे म्हणाले.
पुढील काळात राज्यात अधिक वेगाने लसीकरण होणार असून लसी साठी लागणारी कोणतीही किंमत राज्य सरकार द्यायला तयार आहे असेही ते म्हणाले. सरकारकडे लसीसाठी निधी असून लस उपलब्ध नसल्याने लसीकरणाची गती कमी होत असल्याचं देखील आरोग्यमंत्री टोपे म्हणालेत.
Corona Vaccine: लसींचा 'राजकीय' डोस! खरं कोण? पुनावाला की मोदी सरकार...
टोपे म्हणाले की, आम्हाला लसीकरण 18 ते 44 वाढवायचं आहे. यासाठी लागणारी किंमत ही राज्य सरकार लगेच द्यायला तयार आहे. परंतु आपल्याला अधिक जास्त झुकतं माप मे व जून महिन्यात द्यायला हवं. जेणेकरून आपल्याला अधिक गतीनं लसीकरण करता येईल. आज लस उपलब्ध नसल्याने, आपल्या जवळ निधी आहे आपण खर्च करायला तयार आहोत, विकत घ्यायला तयार आहोत पण उपलब्ध नसल्याने आज आपल्याला 18 ते 44 वयोगाटातील लसीकरण ते कमी गतीनं करावं लागत आहे, असंही यावेळी राजेश टोपेंनी सांगितलं.
Adar Poonawala : लसींच्या पुरवठ्याबाबत अदर पुनावाला यांचं स्पष्टीकरण, म्हणाले...